अप्रतिम दत्त अनुभव ऐसा योग येणे नाही

आज पुन्हा एकदा श्री राजीव दत्तात्रय मनोहर यांच्या पुस्तकात संकलित केलेले आहेत शब्दबद्ध केले आहेत त्यापैकीच हा एक अनुभव २५ जानेवारी 2014 माझे एक मित्र श्री आणि सौ चेपे यांचा फोन आम्हाला आला आणि बोलले की आमच्याबरोबर माहुर ला चलता का आम्ही लगेच तयार झालो दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही माहूरला जायला निघालो माहूरला जायला आम्हाला तब्बल पाच तास लागले

या वेळामध्ये आमच्या गप्पा खूपच रंगल्या गप्पांमध्ये आम्ही ठरवले की आधी अनुसया मातेचे दर्शन घ्यायचे आणि दत्तशिखरावर जायचे आणि मगच रेणुकेचे दर्शन घ्यायचे असं हे सर्व ठरवून आम्ही अनुसूया आश्रमाचे गड चढू लागलो चढता चढता पुन्हा गप्पांचा ओघ सुरू झाला त्यांनी म्हटले की माझे बायको ही अत्री गोत्र उत्पन्न आहे अनुसया पुत्री आहे

ही गोष्ट आमच्याबरोबर चढतअसलेल्या माणसाने ऐकले आणि तो मला म्हणाला की तुम्ही अनुसया मातेची ओटी भरा आणि मगच पुढे दत्तशिखरावर जा मग आम्ही दत्तशिखरावर पोहोचलो त्या ठिकाणी खूप गर्दी होती प्रथमच दत्तशिखरावर गेल्यामुळे आम्हाला फारशी काही माहिती नव्हती तिथल्या एका माणसाने आम्हाला सर्व माहिती दिली

आणि आम्ही दर्शनासाठी लाईनीत उभे राहिलो गर्दी फार होती जागा पण अडचणीची होती शिवलिंगाचे मागून दर्शन घ्यावे लागणार होते श्री व सौ चेपे यांनी दर्शन घेतले आणि मी त्यांच्या मागे होतो माझ्या पुढे सौ ऋतुजा होती मी वाकून नमस्कार केल्यावर एका व्यक्तीने माझ्या हातात नारळ दिले तो माणूस कुठून आला हे मला काहीच कळले नाही मी तो नारळ घेतला मंदिराच्या बाहेर आलो

तेव्हा ते म्हणाले की राजू तुला महाराजांनी कारंजा चे तिकीट दिले तेव्हा आम्ही त्यांची थट्टा केली नंतर आम्ही रेणुकेचे दर्शन घेतले रेणुकेचा अभिषेक आणि ओटी भरून चार वाजताच्या सुमारास आम्ही खाली उतरलो देवीच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे भूक तहान हे अगदी विसरलेलो होतो ही आमची जठराग्नी उतरल्यावर जागा झाला एका शाकाहारी भोजनमध्ये आम्ही जेवण करायला सुरुवात केली

जेवताना चेपे दांपत्य आम्हाला कारंजा जाण्यास बोलू लागले आणि दोघांनी त्यावर लक्ष दिले नाही पण त्या दोघांची माहूर होऊन कारंजा च्या रस्त्यावर जाण्याची माहिती मिळवणे सुरु होते ते सारखे म्हणत होते की कारंजा जाऊ आम्ही दोघेही नकार देत होतो मग शेवटी जायचे ठरले आम्ही संध्याकाळी सहाच्या सुमारास माहूर होऊन कारंजा ला जायला निघालो साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान आम्ही गुरु मंदिरात पोहोचलो

कारण त्यावेळी मंदिरात कीर्तन सुरू होते आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन मंदिराच्या ऑफीसमध्ये आलो मंदिरात खूप गर्दी होती मी ऑफिसात महाराजांच्या मूर्तीची विचारणा केली त्या अधिकाऱ्याने सांगितले ही ज्यांच्याजवळ मूर्तीची कारभार आहे ते संध्याकाळी साडेसात वाजता येथे मुर्त्या ठेवतात त्या खोलीला कुलुप लावून गेले आणि त्यामुळे आता कुर्ती मिळणे अशक्य तेवढ्यात एक वृद्ध गृहस्थाने माझ्या खांद्यावर थाप मारली

आणि म्हणाले तुम्हाला मूर्ती पाहिजे आहे ना मी त्यांना म्हणालो की तुमचा माणूस मूर्ती वाल्या खोलीला कुलुप लावून घरी गेला आता मला मूर्ती कशी मिळणार आम्ही नागपूर हुन आलो आहोत मला आत्ताच नागपूरला परत जाणे भाग आहे तेवढं ते म्हणाले ही घ्या मूर्ती मला आश्चर्य वाटले आश्चर्यचकित होऊन त्या माणसाकडे पाहू लागलो तो म्हणाला तुम्ही मागच्या वर्षी नरसिंह जयंतीला आले होते

तेव्हा पण तुम्हाला मूर्ती मिळाली नव्हती आता ही आणली आहे ती घ्या मी त्या मूर्तीच्या बॉक्स जवळ ते उघडून पहायला गेलो तेवढ्यात त्याने म्हटले मूर्ती पॅक केलेली आहे जशी मूर्ती महाराजांनी पाठवलेली आहे ती तशीच आहे उघडायची काहीही गरज नाही आम्ही दोघे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागलो ती मूर्ती मंदिराच्या आवारात असलेल्या उंबराच्या झाडाला लावून नमस्कार करून नागपूरसाठी निघालो

सुमारे रात्री एक वाजता आम्ही घरी पोहोचलो घरी येऊन जेव्हा मूर्ती आम्ही पाहिले तर आमच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या महाराजांना साष्टांग दंडवत केला अशा प्रकारे नृसिंह सरस्वती महाराज आमच्या घरी आले त्यांची ही किमया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *