अभिनेता सुयश टिळक यांचा साखरपुडा संपन्न बघा कोण आहे होणारी पत्नी

सध्या कलर्स मराठीवर सुरू असणारी मालिका शुभमंगल ऑनलाईन आणि या मालिकेतील अभिनेता सुयश टिळक हा आज आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे.

ती म्हणजे त्याने खास औचित्य साधून आपला साखरपुडा झाल्याचं सांगितल आहे त्याने आपल्या एका पोस्टच्या माध्यमातून आपला साखरपुडा आयुषी भावे हिच्यासोबत संपन्न झाल्याची बातमी चाहत्यांना दिली.

त्याने आयुषी हिचा वाढदिवस या निमित्ताने ही पोस्ट शेअर केली आहे सुयश ने आपल्या इंस्टाग्राम मध्ये लिहिल आहे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुंदर बनवणारी स्त्री हॅप्पी बर्थडे लव्ह आणि त्याने ही पोस्ट आयुषी भावे टॅग केली आहे.

तुझ्याबरोबर माझा आयुष्य पूर्ण झालं आहे आणि मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी सुंदर जीवनसाथी मिळाली मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आम्ही आता ऑफिशियल एंगेज झालो.

असून सर्व प्रियजनांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने एक नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत जुलै महिन्याच्या सुरुवातीला हा साखरपुडा पार पडल्याचं समजत आहे या दोघांनी साउथ इंडियन स्टाइल मध्ये साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहे.

आयुषीने देखील खास फोटो शेअर केले आहेत आणि त्याच बरोबर सुंदर कॅप्शन देखील लिहिला आहे तो म्हणाला हॅपी बर्थडे आणि मी हो म्हटलं सुयश सध्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेमध्ये दिसून येत आहे.

आधी तो आपल्याला का रे दुरावा या मालिकेमध्ये दिसून आला होता त्याचं काम आणि त्याचा अभिनय यामुळे प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच प्रसिद्ध झाला तर या नवीन दांपत्याला आणि त्यांच्या एंगेजमेंटला खूप शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published.