आपल्या मनात निगेटिव आणि वाईट विचार आल्यावर काय करायचे?

मनामध्ये खूप निगेटिव विचार येतात कितीही प्रयत्न केला तरी ते थांबतच नाही हे मनातले वाईट विचार थांबवायचे कसे आपण हे नकारात्मक विचारांबद्दल एका वेगळ्या दृष्टीने बघणार आहोत मनामध्ये वाईट विचार येतात का त्याच्या मुळावर घाव घालावा लागेल. इंग्लिश मध्ये शब्द आहे गिगो म्हणजे गारबेज इन गारबेज आऊट म्हणजे.

कचरा आतमध्ये टाकला तर कचरा बाहेर पडेल आणि आपले आयुष्य हे गीगो वर चालते. जर तुमच्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये कचरा असेल तर बाहेर काय पडेल कचरा पण जर तुमच्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये मन असेल तर तुमची विचार सुद्धा मंगल आणि मधूर असतील त्यामुळे आपल्याला खूपच जागृत व्हावा लागेल.

सावध व्हावे लागेल की आपण आपल्या मनाच्या हार्ड डिस्क मध्ये काय साठवतोय रामायणामधील कैकयी प्रभू रामाला वर खूप प्रेम करायची असं म्हणतात की ती कौशल्या पेक्षा जास्त श्रीरामा वर प्रेम करत होती. पण ज्या वेळेस तिला मंथराची संगत लाभली तेव्हा त्याचे मन खराब झाले आणि मनात वाईट विचार यायला सुरुवात झाली.

आणि मग तिने दशरथ ला सांगून भगवान श्री रामांना वनवासात पाठवले आणि आपला मुलगा भरत त्याला सिंहासनावर बसवले. तेव्हा वाईट विचार आला कुठून हा वाईट विचार आला मंथराच्या संगतीतून तसेच आपण सुद्धा विचार केला पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये मंथरा कुठून कुठून प्रवेश करते.

ही मंथरा येऊ शकते वर्तमानपत्रातून हे मंत्र येऊ शकते टीव्ही पाहण्यातून चित्रपट पाहण्यातून ही मंथरा येऊ शकते तुमच्या संगतीतून तुमचे नातेवाईकांकडून किंवा इंटरनेट मधून ह्या सर्व गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये मंथरा तेच काम करतात आणि आपल्या मनामध्ये कचरा टाकतात. हा कचरा जेव्हा आपल्या अंतर मनामध्ये जातो तेव्हा आपल्या चित्तामध्ये असे वाईट विचार यायला सुरुवात होते.

त्यामुळे मूळ आक्रमण करणे खूप गरजेचे आहे नाहीतर निगेटिव्ह विचार मधून बाहेर पडणे खूप अवघड जाईल त्यामुळे आपल्या मनाची हार्ड डिस्क ज्याला आपण अंतर्मन म्हणतो. त्याचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे आणि एखाद्याचे मन निगेटिव विचारांनी भरलेले आहे सारखी मनात वाईट विचार येत असतील मग अशा स्थितीमध्ये काय केले पाहिजे मित्र लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही या वाईट विचार मनात सतत विचार करत असता त्यांना खतपाणी घालतात.

तेव्हा हे विचार तुमच्या अंतर्मनात घर करून राहतात आणि मग त्यांना बाहेर काढणे खूप कठीण होऊन जाते अशा वेळी खूप गरजेचे आहे की आपण आपल्या मनातल्या गोष्टी एखाद्या समजदार व्यक्तीबरोबर किंवा अशा व्यक्तीबरोबर जो तुम्हाला चांगला मार्ग दाखवेल. त्याच्या बरोबर शेअर केल्या पाहिजे ज्यामुळे होईल काय हे नीगेटिव विचार आहे ते पृष्ठभागावर आहेत.

जे हळूहळू मनामध्ये भविष्यकाळात घर निर्माण करणार होते ते बाहेर येतील त्यामुळे आपले हृदय कोणाकडेतरी मोकळे केले पाहिजे. ज्याप्रकारे महाभारतामध्ये अर्जुन गोंधळलेल्या मनस्थितीत मध्ये होता स्वतःला दुर्बल समजत होता तेव्हा त्याने काय केले भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर आपले मन मोकळे केले. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला त्याला भगवद्गीतेचे ज्ञान दिले.

त्यामुळे मनाचे निगेटिव्ह विचार एखाद्या समजदार व्यक्तीबरोबर शेअर केल्याने आपला त्रास कमी होतो कारण ते विचार काही प्रमाणात का होईना बाहेर पडलेले असतात. दुसरे असे की आपल्या मनाच्या हार्ड डिस्कला शुद्ध करायची असेल तर त्याच्यावर आपण सारखं आठवतो तो चांगला असला पाहिजे ते कसे करायचे आपण सातत्याने चांगली पुस्तके वाचली पाहिजे.

चांगले ऐकले पाहिजे चांगल्या लोकांची संगत धरली पाहिजे त्याने काय होईल सतत तुमच्या मनामध्ये चांगले विचार घोळत राहतील आणि नियम हा आहे की जे विचार तुम्ही सतत मनामध्ये घोळत होता ते अंतर मनामध्ये मूळ करतात आणि कालांतराने त्याच प्रकारचे विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात.

त्यामुळे जास्तीत जास्त चांगले वाचन करा चांगले ऐका चांगल्या लोकांच्या संगतीत राहा आणि लोकांमधील चांगले बोला आणि एकदा का तुमचे अंतर्मन शुद्ध झाले नंतर वाईट विचार आले तर ते जास्त वेळ टिकणार नाही कारण तुमच्या मनामध्ये चांगले विचारांचे प्रमाण जास्त असेल.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.