आयुष्यभर कोणतीच गोळी लागणार नाही पित्त आणि शरीरातील उष्णता पोट चुटकित साफ

नमस्कार मित्रांनो, आठवड्यात फक्त एक दिवस हा उपाय करा तुमच्या शरीरात कितीही पित्त असूद्या किंवा उष्णता असूद्या पूर्णपणे निघून जाईल. सध्याच्या काळात शरीर मजबूत असण्याची अत्यंत गरज आहे. कुठल्याही संक्रमणाशी लढायचे असेल तर प्रतिकारशक्ती मजबूत असणे तितकच महत्वाचं आहे.

त्यातही एखाद्या व्यक्तीचं पित्त वाढलं असेल, मळमळ होत असेल किंवा अपचन होत असेल आणि ढेकर येणे,गॅसेस होणे या समस्या होत असतील, रक्त अशुद्ध झाल्याने वारंवार त्वचारोग किंवा त्वचेशी निगडित समस्या होत असतील तर हा उपाय अत्यंत खास असून हा उपाय आठवड्यात एक दिवस करायचा आहे.

उपाय कसा करायचा? त्यात कोणकोणते घटक वापरायचे हे जाणून घेऊया. हा उपाय अगदी सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होते, शरीर आतून मजबूत बनते, सर्दी, खोकला, कफ यावरही नियंत्रण मिळते.

या उपायासाठी पहिला घटक लागणार आहे ती म्हणजे कडुनिंबाची पाने. कडुनिंबाचे झाड प्रत्येकाच्या घराशेजारी, इकडे तिकडे असते, खेड्यामध्ये तर नक्कीच असते. शहरामध्ये जर तुम्हाला मिळाले नाही तर काय वापरावे हेदेखील पाहूया.

कडुनिंबाच्या झाडाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. याचे मूळ, पान,फुल,फळ,साल,खोड या सर्व गोष्टी अनेक रोगांवर उपयोगी आहेत असं आयुर्वेदात सांगितले आहे. या कडुनिंबाच्या पानामध्ये निंबिन, निंबेनिम, निंबेडिम हे कडू घटक असतात. हे कडू असल तरी शरीरासाठी खूप उपयुक्त असते.

आणि निसर्गात मिळणाऱ्या जेवढ्या कडू वनस्पती, कडू गोष्टी आहेत त्या आपल्या शरीरासाठी नक्कीच उपयोगी असतात आणि त्या कोणत्या ना कोणत्या रोगावर उपचार म्हणून वापरण्यात येतात. आपल्याला आजच्या उपायासाठी कडुनिंबाची साधारणतः तीन ते चार पाने लागणार आहेत. ही पाने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर ती वाटून घ्यायची आहेत.

शरीर निरोगी राहण्यासाठी अजून एक उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. ते म्हणजे साधारणतः पाव चमचा हळद संध्याकाळी एक ग्लास कोमट पाण्यात टाकून जर झोपण्यापूर्वी घेतले तर आपले शरीर वज्राप्रमाणे मजबूत होते आणि आपल्याला कुठलाही रोग स्पर्श करत नाही. मात्र हा उपाय साधारणतः सहा महिने ते एक वर्ष सलग करावा लागतो. तो छोट्या मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना चालतो.

आता वाटलेल्या पानांमध्ये दुसरा पदार्थ मिक्स करायचा आहे ते म्हणजे गूळ. या उपायासाठी जर सेंद्रिय गूळ मिळाला तर ठीक अन्यथा आपल्याकडे जो गूळ असेल तो वापरू शकता. साधारणतः त्या पानामध्ये बसेल एवढ्या आकाराचा गूळ घेऊन या मिश्रणाची आपल्याला गोळी करायची आहे. ज्यांना कडूंनिबाची पाने मिळणार नाहीत त्यांनी आयुर्वेदिक स्टोअर मधून कडुनिंबाच्या पानाच्या गोळ्या मिळतात त्या वापरू शकता.

या गोळ्या व्यक्तीला खूप त्रास होत असेल तर सलग ११ दिवस रोज सकाळी उपाशी पोटी घेऊन त्यावर एक कप गायीचे दूध घायचे आहे आणि ज्यांना आपले शरीर फक्त मजबूत ठेवायचे आहे त्यांनी आठवड्यात फक्त एकवेळा ही गोळी बनवून घ्यायची व त्यावर एक कप गायीचे दूध घ्यायचे आहे.

कडुनिंबाची पाने वाळवून त्याची पावडर तुम्ही घरी तयार करू शकता. याला कोणताही साईड इफेक्ट नाही. फक्त ज्या व्यक्तींना शुगर असेल अशा व्यक्तींनी गूळ वापरू नये. त्यांनी फक्त पावडर घ्यावी आणि त्यावर दूध घ्यावे. या उपायाने शरीर वजनासारखे मजबूत होते आणि आपल्याला कोणताही रोग होत नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.