कणिक मळतांना वस्तू टाका शुभ मंगल घडेल धन दौलत येईल

आपल्या जीवनात जर का दुःख असेल घरात वादविवाद भांडण-तंटे होत असतील, घरात नेहमी पैशांची चणचण राहत असेल,आपल्या तिजोरीत पर्स, पाकिटात खडखडाट असेल. आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा उपाय करा. हा उपाय आपण दररोज ही करू शकतो. उपाय अगदी साधा व सोपा आहे.

परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे. जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल, तर सोमवारी, शुक्रवारी व बुधवारी या आठवड्याच्या तीन दिवशी तरी हा उपाय जरूर करावा. हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो. शुक्र हा ऐश्वर्या व सुखाचा कारक आहे. शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर्य मिळते.

आपल्याला धनसंपत्ती मिळते. तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्र ही मजबूत होतो. चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे. म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल. जिकडे तिकडे आपली वाह वाह होईल. सगळीकडे आपल्या मताचा आदर होईल. समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल. आणि पीठ हे सूर्याचं कारक आहे.

म्हणून जर पीठातली ही वस्तू आपण टाकली. तर आपला सूर्य ही मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल. उपाय अगदी साधा आहे. हा उपाय आपण सहज दररोज करू शकतो. प्रत्येकाच्या घरात कणित दररोज मळली जाते. कणिक मळताना फक्त त्या पिठात एक वस्तू टाकायची आहे.

प्रत्येक घराचे किचन हे त्या घराचा आत्मा असतो. कारण येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते. त्याद्वारेच घरातील सर्वांना उर्जा प्राप्त होत असते. आपले शरीर हे अन्नमय असते. आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणेच आपले शरीर बनते. आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते.

असे म्हणतात कि जैसा खाओगे अन्न वैसा ही होगा मन. म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणेच आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून स्त्रियांनी स्वयंपाक करताना. नेहमी हसत मुखाने, आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करीत करीत स्वयंपाक बनवावा. काही स्त्रिया स्वयंपाक करताना वाद विवाद करतात.

भांडण तंटे करतात चिडचिड व आदळ आपट करतात. मग स्वयंपाकात त्याच लहरी उतरतात. व ते अन्न खाणाऱ्याच्या मनातही तीच तरंगे निर्माण होतात. मग घरात भांडण तंटे वाद विवाद होतच राहतात. तुम्ही अनुभव घेतलाय का की आपण स्वयंपाक करताना ज्या गोष्टीचा विचार करतो, ज्या गोष्टीबद्दल चर्चा करतो ती बाद जेवण करताना बोललीच जाते.

ज्या गोष्टीवर जेवण करताना चर्चा नक्कीच होते. हा तो स्वयंपाकावर पडलेला प्रभाव असतो. आपण जर भगवंतांचे नामस्मरण करीत हसत खेळत स्वयंपाक केला तर जेवण करतांना ही भगवंतांचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते. आज आपण बोलणार आहोत पीठा विषयी आपण कणिक मळतो किंवा घरातील स्त्रिला कणिक माळतांना पाहतो.

कणिक मळली की ती स्त्री ती तशीच गोल गोल करून ठेवत नाही, तर त्या कणकेच्या गोळ्यावर हातांच्या बोटांचे ठसे उडवते. हे आपण नेहमीच पाहतो. असे का बरे करत असतील स्त्रिया? गोल गोल गोळा करून तसाच का ठेवला जात नाही? याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या पित्रांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेचे पिंड बनवतो.

त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते. ते अगदी मऊ गुळगुळीत गोल गोल केलेले असते. त्यावर बोटे उमठवलेली नसतात. म्हणजेच ज्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात, गोल गरगरीत गोळा केलेला असतो. त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते. त्या गोळ्याला पित्र वाईट शक्ती ग्रहण करतात.

म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली दोन चार बोटे उमठवावी. म्हणजे त्या कणकेवर पित्रांचा व वाईट शक्तींचा अधिकार राहत नाही. त्या कणकेच्या पोळ्या देवांच्या नैवेद्यासाठी तसेच घरातील सर्वांच्या खाण्यासाठी योग्य बनतात. म्हणून जर तुम्हाला माहीत नसेल तर या कणिक मळली की सर्वात आधी त्यावर आपल्या बोटांचे ठसे उमठवावेत.

आणि तरच त्याच्या पोळ्या कराव्यात. आता आपण पाहूयात कणिक करताना त्यात कोणत्या वस्तू टाकावे ते. ज्यावेळी आपण कणिक मळतो त्यावेळी त्यामध्ये अगदी थोडेसे तूप व चिमठभर साखर टाकावी. साखर अगदी चिमूठभरच टाकावी. पोळ्या गोड करायच्या नाहीत परंतु उपाय म्हणून आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे. आपण हा उपाय दररोज करू शकतो.

जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवारी तरी जरूर करावा. या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्यांची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होते. दररोज स्वयंपाक झाला तर सर्वात आधी जी पोळी बनवतो ती पोळी गाय ला खायला द्यावी. म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होईल.

आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्या वर होईल. दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा. म्हणजे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील. बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटची जी चपाती असते ती कुत्र्यांना खायला दिली जाते. कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते.

आणि शत्रूंची पीडा ही नष्ट होते. म्हणून कुत्र्याला हि पोळी खायला जरूर द्यावी. परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी आपण कुत्र्याला देऊ शकतो. परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी.

व ती छान मस्त मऊ पोळी घरातील जी गृहिणी आहे, जी घरची लक्ष्मी आहे तिने खावी. यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते. आपले घर नेहमी अन्न धान्य व धनसंपत्तीने भरलेले राहते. हा उपाय करून आपण आपल्या घरात सुख समृद्धी व धनसंपत्तीची प्राप्ती करू शकतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.