कमरेचे दुखणे मुळापासून बरा करणारा घरगुती रामबाण उपाय आपण आज बघणार आहोत यामुळे कमरेच्या दुखण्यापासून सुटका होणार आहे कमरेचे दुखणे वाढत्या वयामुळे असो किंवा तासनतास बैठे काम केल्यामुळे कुठल्याही कारणाने असले तरी त्यापासून आपल्याला फायदा होणार आहे
आज आपल्याला दोन उपाय सांगणार आहे या उपायाने आपल्याला कुठलाही साईड-इफेक्ट न होता फायदाच होणार आहे यासाठी आपल्याला पहिला पदार्थ लागणार आहे तमालपत्र म्हणजेच तेजपान मसाल्या साठी म्हणून याचा वापर आपण नेहमीच करतो परंतु शरीरासाठी तो अत्यंत उपयोगी आहे कारण तमाल पत्रा मध्ये कॉपर पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम ही पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात आणि मासपेशी मध्ये अडकलेल्या ज्या नसा आहेत त्या देखील यामुळे मोकळ्या होण्यास मदत होते
आणि हिवाळ्यात जर आपण याचा काढा करून दिला तर खोकल्याची उबळ लागणे सर्दी किंवा गळ्याला कुठले इन्फेक्शन झालेले असेल तर या काढ्यामुळे लगेच आराम मिळतो यासाठी आपल्याला लागणार आहे तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल हे तेल घेतांना मात्र कच्च्या घाणीचे शुद्ध तेल यासाठी वापरायचे आहे येथे अर्धी वाटी भरून तिळाचे तेल घेतले आहे आणि त्यात तीन ते चार तमालपत्र बारीक करून टाकायचे आहे आणि हे मंद आचेवर छान परतून घ्यायचे आहे म्हणजे यातील पूर्ण औषधी गुण हे तेलात उतरायला हवे
हे जोपर्यंत तयार होत आहे तोपर्यंत आपण पुढचा उपाय बघू या एक चमचा ओवा हातावर घेऊन कुसकरून घ्यायचा आहे आणि तो एक बाऊलमध्ये ठेवायचा आहे ओवा जेवढा घेतला तेवढाच म्हणजे एक चमचा जिरे घ्यायचे आहे एका पात्रात दोन कप पाणी घेऊन त्यात हे ओवा व जिरे टाकायचे आहे आणि दोन तमालपत्र घेऊन हे देखील हाताने बारीक करून घ्या आणि या मध्ये टाकून द्या मंद आचेवर उकळू द्यायचे आहे
तिकडे दुसऱ्या बाजूला ठेवलेले तेल देखील छान तयार झाले आहे हे मिश्रण गार होऊ द्यायचे आहे जीर्या मध्ये देखील मिनरल्स कार्बोहायड्रेट प्रोटीन मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम कॅल्शियम विटामिन ही पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात आणी जिर्यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होऊन शरीरातील नको असलेले टॉक्झीन बाहेर टाकले जातात
आणि ओव्यामध्ये देखील फॅट्स कार्बोहायड्रेट प्रोटीन फायबर मिनरल्स कॅल्शियम फॉस्फरस पोषक तत्वे भरपूर असतात आणि यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास पोटांचे विकार गॅस यासारखे त्रास तर निघून जातात परंतु जिरे आणि ओव्यांमध्ये जे नॅचरल ऑइल असते ते आपल्या हाडांना बळकट करण्यास खूप फायदेशीर ठरते जे आपण दोन ग्लास पाणी घेतलेले आहे ते एक ग्लास व्हायला हवे इथपर्यंत आपल्याला उकळून घ्यायचे आहे
याचे औषधी गुण पूर्णपणे या पाण्यात उतरले जातात उकळल्यावर हे छान गाळून घ्यायचे आहे आणि कोमट झाल्यावर त्यात एक चमचा मध टाकावे तुम्ही डायबेटीक पेशंट असाल तर यामध्ये मध नाही टाकले तरी चालेल या तयार झालेल्या मिश्रणाचे दोन भाग करायचे आहे आणि सकाळी नाश्त्यानंतर एक भाग घेऊन घ्यायचा आहे आणि एक भाग रात्री जेवणानंतर झोपायच्या आधी पिऊन घ्यायचा आहे
ज्या वेळेस आपल्याला प्यायचे आहे त्यावेळी यात मधाचा वापर करायचा आहे
आणि आपण उकळून तयार केलेल्या तेलाचा वापर करताना कमरेवर छान मसाज करून घ्यायचा आहे अर्धा तास मसाज करून हे तेल असेच राहू द्यायचे आहे आणि अर्ध्या तासानंतर थोडे पाणी कोमट करून घ्या आणि त्या पाण्यात खायचे मीठ एक चमचा टाकायचे आहे या पाण्यात एक नॅपकिन डिप करून कमरेवर याचा शेक द्यायचा आहे
असे तुम्ही सात आठ दिवस केले तरी कमरेचे कितीही दुखणे असो ते बरे होते तीन ते चार वेळेस चांगले शेकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ केली तरी चालेल रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला नक्की फरक जाणवेल
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही