कामात खूप अडथळे येत असतील काम पूर्ण होत नसेल तर करा हा उपाय

मित्रांनो जर तुमचे एखादे काम अडलेले असेल. खूप प्रयत्न करून सुद्धा ते काम यशस्वी होत नसेल. तर त्यासाठी काही सोपे मार्ग सोपे उपाय आपल्याला करता येतात. आणि त्यातीलच दोन सोप्पे उपाय आज आम्ही तुमच्यासाठी सांगणार आहोत. मित्रानो हे उपाय अतिशय सोपे आहेत. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने हे उपाय केला.

तर तुमचे जे अडलेले काम आहे ते पूर्ण होईल. ही अडलेली कामे कोणतीही असू शकतात. प्रत्येक कामा मध्ये यश मिळवून देणारा असा हा उपाय आहे. तर मित्रानो तुम्ही एखादे काम करण्यासाठी बाहेर पडता. आपल्या घराच्या बाहेर पडताना उंबऱ्या बाहेर पाहिल्यादा डावा पाय टाकत चला.

लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही घरा बाहेर पडताय एखादे महत्वाचे काम करण्यासाठी त्यावेळी तुमचा डावा पाय प्रथम उंबऱ्या बाहेर पडायला हवा तसे तर उजवा पाय शुभ मानले जातो. मात्र तुमचे एखादे अडलेले काम पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील. तर मित्रानो डावा पाय तुम्ही उंबऱ्या बाहेर टाकून.

पूढे चालायला सुरुवात करा तुम्हाला दिसेल की तुमची अडलेली कामे पूर्ण होऊ लागलेली आहेत. मित्रानो ज्यांना हा उपाय करून सुद्धा फरक पडत नसेल तर तुम्ही याच्या जोडीला दुसरा एक उपाय करू शकता. ज्यावेळी तुम्ही घराबाहेर एखादे काम करण्यासाठी पडाल.

त्यावेळी एखादे तुलसी पत्र आपल्या तोंडामध्ये टाका तुळशीचे जे पान असते ते आपल्या तोंडामध्ये टाकून तुम्ही ते काम करण्यासाठी जा तुम्ही जाता जाता हे पान चावून चघळून खाऊन टाकू शकता. मित्रानो लक्षात ठेवा हिंदू धर्म शास्त्रा मध्ये पवित्र अशी वनस्पती मानली गेलेली आहे.

तसेच तुळशीला विष्णू प्रिया असेही संबोधले जाते. म्हणजे तुळस ही भगवान विष्णुना अतिशय प्रिया आहे. मित्रांनो या ज्या तीन देवता आहेत. ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यापैकी ब्रह्मा म्हणजेच ब्रह्मदेव यांना निर्मितीचे प्रतीक मानले जाते. या श्रुष्टि चे ते निर्माता आहेत.

तसेच भगवान विष्णू याना जी श्रुष्टि निर्माण केली आहे. तिच्या पालन पोषणाची जबाबदारी सोपवली आहे. म्हणजेच श्रुष्टि चे पालनकर्ता म्हणून भगवान विष्णूना ओळखले जाते. तर भगवान शिवशंकर हे विनाशाचे प्रतीक आहेत. आणि मित्रांनो आपण जे तुळशी पत्र तोंडात टाकलेले आहे.

ही तुळस विष्णुना खूप प्रिय आहे. आणि म्हणूनच जे काही काम आपण हाती घेतलेले आहे. ते काम पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णूचा आशीर्वाद या जगाचा पालनकर्ता म्हणून खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

घराबाहेर कामा निमित्त बाहेर पडताना तुळशी पत्र तोंडात टाकून चगळत चगळत खाऊन टाकू शकता. तुम्हाला असे वाटत असेल की पैशा अभावी तुमची काही कामे अडली असतील. तर ही कामे लवकरच मार्गी लागतील. असे हे दोन उपाय तुम्ही नक्की करून पहा. आणि पूर्ण श्रद्धेने ही कामे करत चला.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.