नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये रोज रात्री झोपतांना, सकाळी उठल्यावर स्वामींच्या फोटो समोर बसून किंवा मूर्ती समोर बसून बोला या चार ओळी. स्वामींची कृपा तुमच्यावर सात ते आठ दिवसा मधेच होईल श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो स्वामी हे आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेत असतात व ते आपल्या भक्तांवर कसलेही संकट येऊ देत नाहीत. पण मित्रांनो आपण पण स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी नेहमी करायला पाहिजेत. त्यांचा मंत्र जाप केलं पाहिजे. स्वामींच नामस्मरण केलं पाहिजे.
स्वामींची श्रद्धापूर्वक भक्ती केली पाहिजे. कारण मित्रांनो ज्यांच्या जीवनात आहेत स्वामी समर्थ, त्यांच्या जीवनात कसलाच नाही अनर्थ. म्हणून मित्रांनो रोज सकाळ, संध्याकाळ स्वामींच्या फोटो समोर मूर्ती समोर बसून या चार ओळी आपण नक्की म्हटल्या पाहिजेत.
तर मित्रांनो त्या चार ओळी अश्या आहेत. हे स्वामी समर्था तू जे मला या पृथ्वीवर मनुष्य जीवीत पाठवला आहे, मग ज्या कामासाठी मला पाठवला आहे ते काम तू माझ्या कडून करून घे. व त्यासाठी लागणारे गुण व कौशल्य माझ्यामध्ये विकसित कर.
आणि मला तुला पाहिजे तसं अपेक्षित परिणाम साध्य कर. हे समर्था हे सर्व करत असताना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे. जेणेकरून अहंकार रूपी रोगाची मला लागण होणार नाही. आणि मी तुझ्या भक्तीपासून लांब जाणार नाही. हे स्वामी समर्था तुझं या लेकरावर लक्ष राहूदे.
या लेकराला तुझ्या पायाशी राहूदे आणि पायाशी घे. या भक्ताला सतत तुझ्या कृपाशीर्वादाचा हाथ माथी ठेव. व सर्वांना सुखी, समाधानी आरोग्यदायी संपन्न ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर सर्वांना सुखात आनंदात राहूदे. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.