गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी 1 तासात दुखणे गायब आज लावा उद्या पळायला लागाल

वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक दुखण्यापैकी एक दुखणं म्हणजे गुडघेदुखी अनेकांना गुडघेदुखीचा त्रास हा अगदी पस्तिशीपासून सुरु होतो. चालताना किंवा दैनंदिन हालचाली करताना गुडघ्याच्या सांध्यांमध्ये दुखत राहते. त्यामुळे चालतना अगदी नकोसे होऊन जाते. गुडघे दुखीची कारणं ही अनेक आहेत.

वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या गुडघे दुखीकडे दुर्लक्ष करुन चालत नाही. कारण याकडे दुर्लक्ष केल्यामुळे चालण्याच्या अनेक तक्रारी होऊ शकतात. जो पर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत चालता यावे ही प्रत्येकाची इच्छा असते. कोणत्याही काठीचा आधार न घेता आपल्या दोन पायांवर चालणे ही अभिमानाची गोष्ट असते.

पण वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी किंवा वजन वाढीमुळे येणारी गुडघे दुखी योग्यवेळी जाणून घ्यायला हवी. जर ती योग्यवेळी जाणून घेतली तर गुडघे दुखीवर घरगुती उपचार देखील करता येतात. गुडघेदुखीच्या याच त्रासापासून मोकळे करण्यासाठी आम्ही गुडघेदुखीवर रामबाण उपाय शोधून काढले आहेत ते जाणून घेऊन या

आलं आर्थरायटीससाठी आलं हे फारच फायदेशीर ठरते हे अनेक अभ्यासांती सिद्ध झाले आहे. आल्याचे फायदे अनेक आहेत. पण आल्याच्या अर्काच्या सेवनामुळे गुडघेदुखी कमी होण्यास मदत मिळते. आर्थरायटीसचा त्रास कमी होण्यासाठी आल्याचे सेवन किंवा आल्याचा अर्क गुडघ्यांना लावण्यास सांगितला जातो. आल्याचा अर्क लावल्यामुळेच गुडघेदुखीपासून सुटका मिळते.

वजन नियंत्रित ठेवणे हल्लीच्या काळात वाढते वजन हे अनेकांसाठी आरोग्याचा गंभीर विषय आहे. जंक फूडचे अति सेवन खाण्याच्या चुकीच्या सवयी या सगळ्यामुळे वजन वाढणे हे आता अगदी साहजिक झाले आहे. वजन वाढून गोल गरगरीत होणे हे इतर कोणत्याही कारणासाठी नाही तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच हानिकारक झाले आहे.

जर तुमचे वजन सतत वाढत राहिले तर त्याचा परिणाम हा तुमच्या गुडघ्यांवर होतो. तुमच्या शरीराचा वाढता भार जर गुडघ्यांना पेलला नाही तर गुडघेदुखीची तक्रार ही अगदी कमी वयातच सुरु व्हायला लागते. त्यामुळे गुडघे दुखीवर रामबाण उपाय म्हणजे वजन कमी करणे.

जर तुम्ही आदर्श वजन तसेच ठेवण्यात यशस्वी झालात तर तुमचा गुडघेदुखीचा त्रास हा आपोआप कमी होण्यास मदत मिळते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करण्याचा डाएट नक्की करा. म्हणजे योग्य पद्धतीने वजन कमी करण्यास मदत करेल.

अॅक्युपंचर ही देखील गुडघे दुखीवर चांगली पद्धत आहे. एखाद्या दुखण्यावर काही ठराविक पाँईट्स दाबले की दुखणे कमी होते. ही एक पद्धत असून यालाच अॅक्युपंचर असे म्हटले जाते. अॅक्युपंचर हे एक संवेदनात्मक संप्रेरक असल्यामुळे वेदनेत आराम मिळण्यासाठी ही अॅक्युपंचर हे फारच फायदेशीर ठरते.

अॅक्युपंचर करण्याचा विचार करत असाल तर त्याचे योग्य प्रशिक्षण असलेल्यांकडूनच तुम्ही हे अॅक्युपंचर करुन घ्यायला हवे. अॅक्युपंचर करताना अगदी मसाज प्रमाणेच त्याचा प्रेशर आणि प्रेशर पाॅईंट हे ठरलेले असतात. त्यामुळे अॅक्युपंचरचा वापर करुन तुम्ही गुडघेदुखीच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.

बर्फाचा शेक गुडघे दुखीवर घरगुती उपाय करण्याचा विचार करत असाल तर बर्फाचा उपयोग हा अगदी सगळीकडे केला जातो. बर्फ एका कपड्यात घेऊन किंवा एखाद्या कपड्यात बर्फाचे खडे घेऊन किंवा आईस पॅकची पिशवी घेऊन गुडद्याच्या आजुबाजूला फिरवा. अनेकदा गुडघेदुखीमुळे गुडघे लाल होतात. गुडघ्यांना सूज येते.

बर्फ हे त्यावर कमालीचे काम करते. बर्फाचा शेक दिल्यामुळे पायांना आराम मिळतो. सूज कमी होते. त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने पायांना बर्फाचा शेक द्यावा. नक्की आराम मिळेल. बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक हा गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी होतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.