गुडीपाडवा विधिवत कसा साजरा करावा जाणून घ्या

या वर्षी गुडीपाडवा 13 एप्रिल 2021 आला आहे. गुडीपाडवा हा महाराष्ट्रातील आणि कोकण वाशीयांसाठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. आज आम्ही युम्हाला गुडीपाडव्याची पूजा विधी पाहणार आहोत. तसेच गुडीपाडव्याच्या पूजेला काय साहित्य लागेल हे सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुडीपाडव्याच्या दिवशी लवकर उठावे आणि स्नान करावे आणि सूर्योदय झाल्यानंतर आपल्या घरची गुडी उभा करावी. गुडीपाडव्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजन करण्याची परंपरा पहिल्या पासून चालत आलेली आहे.

महत्वाचे म्हणजे या दिवशी शालेय साहित्य पाटी वह्या यांचे सुद्धा पूजन करावे. शाळेचा पाटी पूजन विधी पाटीवर चंद्र सूर्य सरस्वती ची रांगोळी किंवा सरस्वतिच्या प्रतिमेचे पूजन करावे आणि त्यावर हळद व कुंकू वहावे. अक्षता वाहव्यात या नंतर फुले अर्पण करावीत.

आणि त्यांना नैवेद्य दाखवून धूप आणि दीप अर्पण करावे. सरस्वती देवीला मनापासून नमस्कार करावा याप्रमाणे नव्या पंचांगाला हळद कुंकू आणि फुले वाहावीत आणि नमस्कार करावा. गुडी ही उंच बांबू पासून तयार केली जाते. सकाळी उठल्यावर बांबू स्वच्छ धुवून घ्यावा.

आणि त्या नंतर या गुडी च्या वरच्या टोकाला केसरी रंगाचे कापड गुंडाळतात अथवा साडी गुंडाळतात. आणि त्या नंतर गुडीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने झेंडूच्या फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचे किंवा चांदीचे फुलपात्र त्यावर ठेवतात.

गुडी ज्या ठिकाणी लावणार आहेत ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्या आणि त्या नंतर गुडी चा बांबू पाटावर उभा करतात तयार केलेली गुडी दारात किंवा उंच गचित किंवा गॅलरीत लावतात. गुडीची काठी तिथे नित बांधतात. काठीला गंध फुले अक्षता वाहव्यात.

गुडीची विधिवत पूजा करावी आणि गुडीला निरंजन लावून उदबत्ती दाखवावी आणि दूध साखरेचा किंवा पेढ्याचा नैवेद्य दाखवावा दुपारी गुडीला पुरणपोळीचा किंवा गोडा धोडाचा नैवेद्य दाखवावा. संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी गुडीला हळद कुंकू फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे.

या दिवशी आनंद साजरा करत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतन ही केले जाते. तुम्हा सर्वांना गुडीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.