घराचा उंबरठा असा असेल तर घर पैशांनी भरून जाईल

आपल्या घराचा उंबरठा कसा असावा याचेसंबंधी वास्तुशास्त्र मध्ये काही नियम सांगितले आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत घराचा उंबरठा हा घराच्या सीमारेषेचे प्रतीक आहे किडा मुंगी सरपटणारे प्राणी यांच्यापासून घराचे संरक्षण व्हावे. तसेच अदृश्य शक्तीने घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा खूप महत्वाचा आहे.

अदृश्य शक्तींना घराबाहेरच थांबवण्याचे काम उंबरठा करत असते म्हणून प्रत्येक घराला उंबरठा असायलाच हवा आता पाहूया हा उंबरठा कसा असावा. मित्रांनो सध्या अनेक घरांमध्ये मार्बलचा कडप्पाचे उंबरठा बसवले जातात पण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराला लाकडाचा उंबरठा असावा आपण जुन्या काळात देखील पाहिले असेल तर.

प्रत्येक घराला लाकडाचा उंबरठा असायचा कडप्पे किंवा मार्बलचा उंबरठा हे अलीकडच्या काळात आलेले आहे. लाकडाचा उंबरठा हा उत्तम मानला जातो उंबरठा संबंधी आपण अनेक नियम ऐकले असतीलच असे की उंबरठ्यावर बसू नये उंबरठ्याला पाय लागू देऊ नये उंबरठ्यावर उभा राहून शिकू नये.

तसेच आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत उंबरठ्यावर उभे राहून करू नये ज्यावेळी आपल्या घरात कोणी येते तेव्हा आपल्या घरामध्ये उभारून त्यांचे स्वागत करावे. ते जेव्हा बाहेर जातील तेव्हा घराच्या बाहेर उभे राहून त्यांना निरोप द्यावा दोन्ही वेळी आपण उंबरठ्यावर उभे राहू नये दोन्ही वेळी आपण उंबरठ्यावर उभे राहू नये.

किंवा इतरांना देखील उंबरठ्यावर उभे राहू देऊ नये मित्रांनो उंबरठा हा किती महत्त्वाचा आहे आपल्याला लक्षात येईल की जेव्हा नवी नवरी घरामध्ये प्रवेश करते. ग्रुहप्रवेश करते तेव्हा या उंबरठ्या वरतीच धान्याने भरलेले माप ओलांडून ती प्रवेश करते लक्ष्मीचे पाऊल यांनीही प्रवेश करते तर हा उंबरठा लाकडाचा असेल तर त्यामुळे चुंबकीय शक्ती आपल्या घरामध्ये बंदिस्त होऊन जाते बाहेर येत नाही.

आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घर प्रवेश करणार असेल तर हा उंबरठा त्याला अडथळा निर्माण करतो कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये येऊ देत नाही आपल्या घराचा उंबरठा रोज आपण स्वच्छ करावा उंबरठा जवळ रांगोळी काढावी.

ज्या घरामध्ये उंबरठ्याची पूजा केली जाते लक्ष्मीचा स्थायी निवास राहतो त्या घरांमध्ये लक्ष्मी प्रवेश करते तसेच जर आपण उंबरठया जवळ रोज रांगोळी काढली त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते उंबरठा पाहून तिथे रांगोळी पाहून बाहेरच्या व्यक्तीला देखील घरातील वातावरणाचा अंदाज येतो.

मित्रांनो दर अमावस्या-पौर्णिमेला आपल्या घरावरून नारळ ओवाळून उंबराच्या जवळ आवश्य फोडावा त्यामुळे आपल्या घराला कोणाची वाईट नजर लागत नाही घराचा मुख्य दरवाजा सोबतच आपल्या घरातील टॉयलेट आहे बाथरूम आहे तिथे उंबरठा असावा.

जुन्या काळामध्ये टॉयलेट हे घराच्या बाहेर असायचे त्यामुळे येणारी नकारात्मक ऊर्जा शक्ती घरात प्रवेश करत नव्हती हल्लीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम असते या दोघी ठिकाणीसुद्धा उंबरथा अवश्य असावा. जेणेकरून त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करणार नाही.

उंबरठ्यावरती अडून राहते घराची कळा अंगनावरूनच कळते आणि अंगणातील प्रमुख भाग म्हणजे उंबरठा हा उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा. त्याच्या संबंधीचे नियम अवश्य पाळावा घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल धनधान्य वृद्धी होईल आणि आर्थिक अडचण कधी येणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.