नमस्कार मित्रांनो, बेलाचे झाड हे अतिशय पवित्र अशी एक वनस्पती आहे. बेलाचे झाड जर आपल्या घराच्या आसपास असेल तर आपल्या घरात सुख समृध्दी येते. आपल्याला मान सन्मान,यश,किर्ती या सर्वांची प्राप्ती होते. जर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असतील तर या झाडाच्या प्रभावामुळे त्या सर्वांपासून आपला बचाव होतो.
हे एक दिव्य असे अलौकिक वनस्पती आहे. शिवपुराणात असा उल्लेख येतो की सर्व तीर्थांचे पुण्य फळ बेलाच्या झाडाच्या मुळांमध्ये स्थित आहे. महादेवांना बेलाचे पान अतिशय प्रिय आहे. फक्त एका बेलाच्या पानानेही महादेव आपल्यावर प्रसन्न होतात.इतके महत्त्व या बेलाच्या पानाचे आहे. बेलाच्या पानाचे झाड आपल्या घराच्या आसपास जरूर लावावे.
आज आपण बेलाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला असावे, याचे कोणकोणते फायदे आहेत, यापासून कोणकोणते लाभ मिळवता येतात तसेच बेलाच्या झाडाचे उपाय जाणून घेणार आहोत. काही व्यक्ती म्हणतात की, बेलाचे झाड घरात असू नये परंतु हे अगदी चुकीचे आहे. बेलाचे झाड हे अतिशय पवित्र व दिव्य आहे. त्याशिवाय महादेवांना अतिप्रिय आहे. म्हणून हे झाड घराच्या आसपास लावणे खूप शुभ असते.
बेलाचे पान हे कधीही शिळे होत नाही. एकदा आपण बेलाचे पान महादेवना अर्पण केले की तेच पान पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून आपण महादेवांना अर्पण करू शकतो. एकच बेलाचे पान आपण अनेकवेळा महादेवांना अर्पण करून पुण्य फळाची प्राप्ती करू शकतो. जोपर्यंत बेलाचे पान वाळत नाही किंवा तुटत नाही तोपर्यंत बेलाचे पान वारंवार वापरू शकतो.
महादेवाना प्रसन्न करून आपली इच्छा व मनोकामना पूर्ण करण्यासाठी बेलाचे पान हे एकमात्र साधन आहे. बेलाच्या झाडाचे पूजन केल्याने काशीयात्रा केल्याचे पुण्य मिळते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की बेलाचे झाड जे व्यक्ती लावतात त्यांचा वंशही पुढे पुढे वाढत जातो आणि जे व्यक्ती बेलाचे झाड तोडतात त्यांचा वंश तेथेच खुंटतो. जर एखादी प्रेतयात्रा जात असेल आणि ते शव बेलाच्या झाडाखालून गेले तर त्या मृतात्म्याला मोक्षाची प्राप्ती होते.
जर घराच्या अंगणात अगदी समोर बेलाचे झाड लावलेले असेल तर आपल्या घरात कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही आणि घरात नेहमी सुख व समृध्दी बनलेली राहील. घरात कोणत्याही प्रकारचे वादविवाद, अपयश,भांडणतंटे राहणार नाहीत. बेलाचे झाड जर घराच्या उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य दिशेला लावलेले असेल तर घरच्या सदस्यांच्या मान सन्मानात वृध्दी होते.
त्यांना यशाची प्राप्ती होते. त्यांचा नावलौकिक चारही दिशांना पसरतो. त्यांना अधिकारीचे पद मिळते. जर घराच्या उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला बेलाचे झाड लावले तर आपल्या घरात सुख समृध्दीचा वास होतो. देवी लक्ष्मीचे आपल्या घरात स्थायी वास्तव्य राहते. घराच्या अंगणात जर बेलाचे झाड असेल तर आपल्या घरावर कोणतेही वाईट शक्ती प्रभाव टाकू शकत नाही. कोणत्याही प्रकारची करणी, तंत्रमंत्र आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव दाखवू शकत नाही.
घरावर तसेच घरातील सदस्यांवर कोणाचीही वाईट दृष्ट बेलाच्या झाडांमुळे पडू शकत नाही, इतके दिव्य वनस्पती आहे बेलाचे झाड. तर आपल्या घरात पुढे बेलाचे झाड व मागच्या बाजूला केळीचे झाड असेल तर आपल्या घरात देवी लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य राहते. या दोन्ही झाडांचे दररोज मनोभावे पूजन करावे. जर फक्त ही दोन झाडे आपल्या घरात असतील तर कधीही कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आपल्याला भेडसावणार नाही.
आपल्या घरात सदैव सुख,शांतता, समृध्दी,ऐश्वर्य व वैभव राहील. आपल्या घरात अपार धनसंपत्ती येईल. देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरात सदैव राहील. बेलाचे झाड हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे तर केळीचे झाड हे श्रीहरी विष्णूचे प्रतीक आहे. म्हणून ज्या घरात ही दोन्ही झाडे असतात त्या घरात साक्षात श्रीहरी विष्णू समवेत देवी लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य असते यात अजिबात शंका नाही.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.