घरात मुलगी का असावी ?

आज आपला समाज इतका पुढारलेला असूनही आपण बहुतेक ठिकाणी बघतो की मुलगी जन्माला आली तर नाते मुरडली जातात आणि मुलगा झाला की पेढे वाटले जातात सर्वांना अपेक्षा असते की आपल्याला एक तरी मुलगा जरूर असावा मुलगी नसली तर चालेल परंतु मुलगा हवा वंशाला दिवा हवा पणती नसेल तर काही हरकत नाही असा सर्वांचाच आग्रह असतो पहिली मुलगी झाली

तर दुसरा मुलगा व्हावा अशी अपेक्षा ठेवली जाते व गर्भ धारण केला जातो परंतु जर पहिला मुलगा झाला तर मुलीची अपेक्षा केली जात नाही आजही मुलीला ओझे समजले जाते हे आपल्या समाजाची शोकांतिका आहे परंतु जसे आपले मृत्यूनंतर आपल्याला मोह माया ममता राग द्वेष या सर्वांपासून सोडविण्यासाठी आपले डोके फोडण्यासाठी मुलगा असावा लागतो त्याप्रमाणेच आपण एका मुलीला तिच्या वाडीलांकडून कन्यादानात आपल्या घरात आणतो

त्या दानाची परतफेड करण्यासाठी आपल्याला कोणालातरी कन्यादान करावे लागते आणि कन्यादान करण्यासाठी मुलगी असावीच लागते आपण जर इतरांकडून कन्यादान घेतलेले असेल आणि आपण त्या दानाची परतफेड केली नाही तर आपण या संसारातून मुक्त होऊच शकत नाही पत्नीच्या रूपात आपण कन्यादान घेतो तेव्हा कन्येचे रुपात ते दान आपल्याला परत करावेच लागते त्यावेळेस आपण या संसार बंधनातून मुक्त होतो

मुलगा फक्त आपल्याच कुळाचा उद्धार करतो परंतु मुलगी सासरचा व माहेरचा या दोन्ही कुळांचा उद्धार करते ज्या व्यक्तींवर भगवंताची कृपा होते त्यांचेच घरात मुलीचा जन्म होतो असे म्हणतात की मुलगी झाली लक्ष्मी आली मुलगीही लक्ष्मीचे पावलाने घरात येते मुलगी घरात आली की घरात आनंद व समृद्धी येते घरातील वातावरण लगेच बदलते मुली इतकी माया इतर कोणालाही नसते मुली पासून जे प्रेम आई-वडिलांना मिळते

ते प्रेम मुलापासून मिळूच शकत नाही मुलगी म्हणजे वातसल्याचा झरा असतो असे म्हणतात की आपल्या पिढ्यांमध्ये जर एखाद्या संत महात्मा जन्माला आला तर त्याच्या माघील व पुढील एकवीस पिढ्यांचा उद्धार होतो काय सांगता येते की आपल्या कन्याचे गर्भातून एखादा संत महात्मा जन्माला आला तर आपला लगेचच उद्धार होईल आज कल तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की मुले आई-वडिलांना सांभाळायला नकार देतात

त्यावेळी मुलीच आई वडिलांचा सांभाळ करतात किंबहुना मुलांपेक्षा किती तरी अधिक पटीने चांगल्या पद्धतीने आई-वडिलांना सांभाळतात म्हातारपणाची काठी म्हणून मुले नाहीत तर मुली अगदी ताठ मानेने उभे राहतात मुलीचे आपल्या आई पेक्षा वडिलांवर थोडेसे अधिक प्रेम असते त्याशिवाय वडिलांना प्रेमाने लाडाने सर्वकाही पटून देण्याचे काम मुलीला खूप छान प्रकारे जमते ती आई-वडिलांना रागवते

वडिलांना बोलते ही परंतु तेवढेच प्रेम ही करते जे तिच्या आईला ही शक्य नसते वडीलही मुलीच्या शब्दा बाहेर नसतात मुलीने सांगितले आणि वडिलांनी ऐकले नाही हे कधीही शक्य नसते अशी गोंडस लाडकी लेक सर्वांचे घरी जरूर असावी

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.