घरात या जागी कधीच बनवू नये स्वयंपाक घर / किचन

नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्व शास्त्रामध्ये वास्तूशास्त्राचे विशेष महत्त्व आहे. आपल्या घरात कोणती वस्तू कुठे आहे, कोणत्या दिशेला काय असावे,काय असू नये याविषयी वास्तुशास्त्रात खूप सुंदर वर्णन आलेले आहे. घरातील प्रत्येक वस्तू योग्य दिशेला व योग्य ठिकाणी असेल त्याचे खूप शुभ परिणाम आपल्या जीवनावर पडतात आणि याच वस्तू चुकीच्या दिशेला असतील तर.

त्याच्या दुष्परिणामांचा सामना आपल्याला करावा लागतो. घरात जर नेहमी भांडणतंटे,वादविवाद होत असतील, काही ना काही अडचणी येत असतील, होणारे काम होता होता मधेच अडत असेल,घरात सतत कोणी ना कोणी आजारी पडत असेल, पैशांची नेहमी चणचण जाणवत असेल, काही ना काही संकटे व अडचणींचा नेहमी सामना करावा लागत असेल तर.

हा घरातील वास्तुदोष असू शकतो. घरात प्रत्येक वस्तूंची, प्रत्येक बाबींची एक विशिष्ट दिशा ठरलेली असते आणि जर या वस्तू योग्य ठिकाणी नसतील तर त्याचे खूप अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वयंपाक घराची योग्य दिशा कोणती आणि गॅसची शेगडी कोणत्या दिशेला ठेवावी ते.

स्वयंपाक घराचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. स्वयंपाक घरातूनच आपण जेवण बनवतो व त्याद्वारे घरातील सर्वांना पोषण मिळत असते. घरातील स्त्रीचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरात जात असतो म्हणून स्वयंपाक घर हे योग्य दिशेला असणे फार गरजेचे आहे. आता जाणून घेऊया स्वयंपाक घराची योग्य दिशा.

स्वयंपाक घर हे नेहमी घराच्या पूर्व दक्षिण कोनात म्हणजेच आग्नेय दिशेला असावे. आग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे म्हणून या दिशेलाच घरातील अग्नी म्हणजेच गॅसची शेगडी ठेवणे योग्य आहे. जर या दिशेला स्वयंपाक घर असेल तर घरातील स्त्रियांना आगीपासून धोका पोहोचत नाही.जर चुकीच्या चुकीच्या दिशेला स्वयंपाक घर असेल तर स्त्रियांना वरच्यावर चटके बसणे, भाजणे, जळणे असे प्रकार होत राहतात.

आणि चुकीच्या दिशेला स्वयंपाक घर असल्यास ती स्वयंपाकही रुचकर होत नाही आणि त्याला बरकतही नसते. आग्नेय दिशेला स्वयंपाक घर असेल तर तेथे बनवलेले जेवण रुचकर व स्वादिष्ट तर बनतेच त्याशिवाय कधीही घरात जेवण कमी पडत नाही. तसेच स्वयंपाक करताना घरातील स्त्रीचे तोंड पूर्व दिशेला असणे आवश्यक आहे.

जर तुमच्या घरात या दिशेला स्वयंपाक घर असेल तर खूपच उत्तम,जर चुकीच्या दिशेला असेल तर ती दिशा शक्य असेल तर बदलावी आणि जर हे शक्य नसेल तर घरात तोडफोड करू नये.एखादा वास्तुदोष घालवण्यासाठी घरात तोडफोड केल्यास वास्तूभंगाचा दोष लागू शकतो.

म्हणून घराच्या पुढील व मागील बाजूला तुळस लावावी. असं म्हणतात की, ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरातील वास्तुदोष आपोआप नष्ट होतो. म्हणून पूर्वीपासूनच आपल्या घरांच्या अंगणात तुळस लावलेली असते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.