घराबाहेर कोहळा का बांधतात याच दिवशी बांधा फायदा होईल

आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे. काही काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे. पण आपल्या घराबाहेर कोहळ बांधण्याचा काय फायदा आहे. कोहळ का बांधावे. याच्या बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि कोहळ बांधायचे असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत.

प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळ बांधतात. लाल कपड्यात जर कोहळ बांधले तर घराला कोणाचीही नजर लागत नाही. जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोहळ बांधले तर आपल्या घरात कोणतीही दृष्ट शक्ती येत नाही. आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होत असतं.

आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळ बांधण्याची पद्धत आहे. तर हे कोहळ कधी बांधावे कसे बांधावे याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बाहेरून कोहळ आणत असताना कधीही देटासकट आणावं. घरी आणल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावे व ते स्वच्छ पुसावे.

त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावे तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावा आणि मग त्या कोहळ यावर काजळाने एखादी रेष ओढावी. मग ते कोहळ देवघरात नेऊन त्याची गंध अक्षता हळद कुंकू फुल यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की आम्ही हे कोहळ घराबाहेर बांधत आहोत.

आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्ट शक्ती येऊ नये. त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असे हे कोहळ बांधायचे आहे. कोहळ हे शक्यतो लाल वस्त्र मध्येच बांधावे कधी कधी काही लोकांचे कोहळ हे लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होते तर अशा वेळेला.

आपल्या घरातील लोकांचा दृष्ट शक्तीपासून बचाव झाला आहे. असे समजावे मग ते कोहळ कचऱ्यामध्ये टाकावे व दुसरे आणून त्याची वरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हे कोहळ घराबाहेर बांधावे पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या शनि अमावस्या दिवाळी अमावस्या यावेळी हे कोहळ नक्की बदलाव.

कोहळ हे नेहमी सूर्यास्तानंतर बांधावं आपण जर मुहूर्त कोहळ बांधलं तर दृष्ट शक्ती नष्ट होते चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत. कोणालाही नजर लागत नाही दुष्ट शक्तींपासून आपला बचाव होतो. म्हणून कोहळ घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे. आणि या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्‍ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकत आहे.

म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसा सारखे सजवतात दुष्ट शक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्या मध्ये असते. मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो. आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हे कोहळ घराबाहेर बांधावे आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.