जगातील सर्वात मोठे पाप कोणते?

नमस्कार मित्रांनो, श्रीकृष्णाने भगवद् गीतेमध्ये सर्वात मोठे पापाबद्दल सांगितले आहे. आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत. भगवान श्रीकृष्ण सांगतात की या सृष्टीत नेहमी दोन प्रकारचे व्यक्ती राहतात. त्यातील पहिले ते, जे नेहमी भगवंताचे नामस्मरण करतात व चांगले कार्य करतात आणि आपल्या हातून चुकूनही पाप घडू नये यासाठी प्रयत्नशील असतात.

आणि दुसरे व्यक्ती असे असतात जे नेहमी पाप करण्याचाच विचार करतात. ते नेहमी वाईट व पापी कार्य करत राहतात. त्यांना चांगले कार्य करण्याची कितीही संधी मिळाली तरीसुद्धा ते फक्त पापच करीत राहतात. त्यांच्या मनात फक्त वाईट व अशुभच भरलेले असते. अशा व्यक्तींना वाईट गोष्टीतून असुरी आनंद मिळतो.

तर जे सज्जन व्यक्ती असतात त्यांना चांगले काम करताना दुःख व यातना जरी मिळाल्या तरीही ते सर्व सहन करून सर्व चांगले कर्म करीतच राहतात. ते चांगले काम करण्याची एकही संधी सोडत नाहीत. प्रत्येक संधीचे ते सोने करतात. मनुष्याला त्याच्या पाप व पुण्याचा वाटा या जन्मात तसेच पुढील जन्मातही भोगावाच लागतो.

मनुष्याने शंभर पुण्याची कामे केली व एखादे मोठे वाईट कृत्य केले तर त्याने केलेली सर्व पुण्य शून्य होऊन जाते. ते पाप त्याच्या सर्व गुणांना झाकून टाकते. म्हणून मनुष्याने कधी पापाचा विचार कधी मनातही आणु नये. आज आपण सर्वात मोठे पाप कोणते हे जाणून घेणार आहोत. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत पापापेक्षा मोठ्या महापापाचे वर्णन केलेले आहे.

शुण्यांपेक्षा मोठा गुन्हा आहे असे पाप करणारे व्यक्ती या मनुष्य जन्मात तर नरकयातना भोगतातच त्याशिवाय मृत्यूनंतरही कितीतरी जन्मापर्यंत या पापाचे भोग भोगतच राहतात. म्हणून मनुष्याने जीवनात कधीही चांगले किंवा वाईट कार्य करण्याची संधी मिळाली तर नेहमी चांगल्या कार्याचीच निवड करावी.

वाईट कार्य करून आपल्या आत्म्याला त्रास होतो म्हणून वेळोवेळी वाईट कार्य करून आपल्या आत्म्याला दुखवू नये. चला जाणून घेऊया ते कोणते असे पाप आहे जे या सृष्टीतील सर्वात मोठे पाप आहे ते. श्रीकृष्ण सांगतात की, या सृष्टीतील सर्वात मोठे पाप आहे एखाद्या स्त्रीच्या अब्रुला ठेच पोहोचवणे.

स्त्रीसाठी तिची अब्रूच सर्व काही असते. तिची अब्रू,लाज हे तिचे प्राण असतात. या संपूर्ण सृष्टीला चालना देणारी स्त्री आहे. स्त्री आहे म्हणून ब्रम्हांड आहे. स्त्रिविना ही सृष्टी शून्यवत आहे. म्हणून एखाद्या स्त्रीचा अपमान करणे किंवा एखाद्या स्त्रीची अब्रू लुटणे, तिच्या बरोबर वाईट कर्म करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

अंधधुतराष्ट्रांनी द्रौपतीच्या वस्त्रहरणाच्या वेळी मौन धारण केले होते त्यामुळे त्यांच्या कुळाचा नाश झाला. भिष्मपितामह शांत बसून राहिले म्हणून त्यांना शेवटी वाहनांच्या शय्येवर झोपावे लागले. तसेच दुष्यासान व दुर्योधन यांचा शेवट कसा झाला हे आपण सर्व जाणतोच. म्हणून चुकूनही कोणत्याही स्त्रीच्या अब्रुवर हात टाकण्याचा प्रयत्न करू नका.

नाहीतर याचे दुष्परिणाम कितीतरी जन्मापर्यांत भोगावे लागतील. हे आहे ते सर्वात मोठे पाप जे श्रीकृष्णांनी महाभारत व भगवद् गीतेत सांगितलेले आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.