जर तुम्हाला हे नऊ संकेत मिळत असतील तर तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आहात श्रीकृष्ण सांगतात

नमस्कार मित्रांनो भगवान सगळीकडे खडा खणात पसरलेला आहे. ह्या संपूर्ण विश्वात सर्वशक्तिमान भगवंतच आहेत आणि भगवंताची इच्छे शिवाय एक पान ही हलु शकत नाही. भगवंता जरी आपल्याला आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसतं नसेल तरीही अप्रत्यक्षपणे आपण त्यांचा अनुभव वेळोवेळी घेत असतो.

काही व्यक्ती खूप भाग्यवान असतात. त्यांच्यावर भगवंताची कृपादृष्टी असते. काही आशा शुभ दैवी शक्ती त्यांचे आसपास असतात जी त्यांना नेहमी योग्य मार्गदर्शन करीत असतात. आणि प्रत्येक संकटाच्या वेळी मदत ही करत राहतात. या दैवी शक्ती अशाच व्यक्तींचे आसपास राहतात. जे स्वतः तर योग्य मार्गावर चालतात व इतरांनाही योग्य मार्गावर चालण्यासाठी योग्य मार्गदर्शन करत असतात.

आणि इतरांना मदत करत राहतात. परंतु आपल्याला कसे काय समजू शकते की कोणत्या व्यक्तीवर भगवंताची कृपा आहे. कोणाबरोबर भगवंताची दिव्य शक्ती असते. ते आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये ह्या विषयी माहिती दिलेली आहे. काही असे संकेत दिलेले आहेत. ज्यावरून आपल्या लक्षात येते की.

कोणत्या व्यक्तीच्या आसपास दैवीशक्ती फिरत असतात व कोण कोणत्या व्यक्तींवर भगवंताचा बडधस्तं कायम असतो ते चला जाणून घेऊया त्या संकेतां बद्दल. सर्वात पहिली गोष्ट त्या व्यक्तींमध्ये काम क्रोध लोभ मोह माया मत्सर द्वेष अशा भावना असत नाही. त्या व्यक्तींवर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो.

असे व्यक्ती व्यभिचार व क्रोध करत नाही यांना आपले रागावर नियंत्रण ठेवता येते. हे कधीही कोणालाही शिवीगाळ करत नाही. यांचे मनात इतरांबद्दल ईर्ष्या राहत नाही. हे आपले वर्तणुकीने इतरांना प्रसन्न करतात. इतरांबरोबर दयाने व प्रेमाने वर्तन करतात. अशा व्यक्तींचे मन संतुष्ट असते म्हणजेच यांना कोणत्याही गोष्टीची लालसा राहत नाही.

ह्यांना जे काय मिळते त्यातच ते समाधानी राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तींना स्वप्नात नेहमी भगवंताचे मंदिर किंवा मंदिराच्या आसपासचा परिसर दिसत असेल. तर शास्त्रांमध्ये अशा व्यक्तीला खूप भाग्यशाली मानले गेलेले आहे. ज्यांना नेहमी स्वप्नात भगवंताचा साक्षात्कार होत राहतो. ज्यांचे बरोबर देवी शक्ती जोडलेले असतात अशाच व्यक्तींना नेहमी भगवंताचे स्वप्न पडतात.

भगवंत अशा व्यक्तींना काही विशेष संकेत ही देत असतात ज्यामुळे ती व्यक्तीला लक्षात येते की अलोकिक दिव्यशक्ती त्यांचे सोबत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे जे व्यक्ती आपले दैनंदिन कार्य करून त्यातील उर्वरित वेळ भगवंतांचे भजन पूजन करण्यात घालवतात आणि भगवंतांना सर्व काही मानून त्यांची वेळोवेळी अनुभूती घेतात.

वास्तवात त्यांच्या आसपास भगवंताचा दिव्यशक्ती चे वलय निर्माण झालेले असते ज्या मुळे त्यांना भगवंतांच्या दैवी शक्तीचा अनुभव येत राहतो. चौथी गोष्ट म्हणजे जे व्यक्ती समाजाप्रती मनात दयाभाव ठेवून इतरांना मदत करतात. सत्कार्य व पुण्य करीत राहतात. अडचणीत सापडलेल्या तसेच गरीब व असहाय व्यक्तींना नेहमी मदत करत राहतात. मनुष्य तसेच पशु पक्षी सर्वांनाच नेहमी एक समान मानून त्यांची नेहमी मदत करत राहतात.

वृद्ध अपंग असहाय लोकांना आपले कर्तव्य समजून नेहमी मदत करतात. असे व्यक्ती वास्तविक पाहता समाजासाठी आदर्श असतात. परंतु समाजातील प्रत्येक व्यक्ती असे कार्य करत नाहीत. ज्यांचे डोक्यावर भगवंताचा हात असतो. भगवंताची दिव्य शक्ती ज्यांचे बरोबर असते असे व्यक्ती असे कार्य करू शकतात. अश्या व्यक्ती अंत-समय मोक्षाची प्राप्ती करतात.

पाचवी गोष्ट भगवंताची कृपा ज्या व्यक्तींवर असते. त्यांच्यामध्ये एक अलौकिक शक्ती ही असते. ती शक्ती म्हणजे पूर्वाभास म्हणजेच भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत अश्या व्यक्तींना आधीच मिळतात. जर तुम्हाला ही भविष्यात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट घटनेचे संकेत आधीच मिळत असतील. तर तुमच्यावर भगवंताची कृपा आहे.

सहावी गोष्ट काही व्यक्तींना नेहमी आपल्या आसपास सुगंधाची अनुभूती येत राहते आपल्या आसपास धूप कापूर सुगंधी फुले किंवा अगरबत्ती ह्यांच्या स्वास बडबडत आहे. असा भास नेहमी होत राहतो तर हा त्यांच्या आसपास भगवंत असल्याचं संकेत आहे. भगवंतांचा आशीर्वाद अशा व्यक्तींवर सदैव राहतो. सातवी गोष्ट भगवंताची वेळ म्हणजेचं ब्रह्म मुहुरत ही पहाटे साडे तीन ते पाच च्या दरम्यान ची असते.

आपल्या शास्त्रामध्ये ह्या वेळेला फार महत्वाचे मानले गेले आहेत. ही वेळ भगवंताची वेळ असते कारण या वेळेत वातावरणात सकारात्मक व प्रसन्न ऊर्जेचा संचार असतो. जर नित्य नेहमी पणे एखाद्या व्यक्तीची झोप ह्या वेळेत उघडत असेल. आणि ती व्यक्ती आपले नित्यनेमेतीक कार्यातून निवृत्त होऊन भगवंताचे ध्यान करीत असेल. आणि उगवत्या सूर्याला अर्घ्य देत असेल.

तर निश्चितच त्याचे या वर्तना मागे भगवंताची मर्जी असते त्या व्यक्तीला हे कार्य करण्यासाठी दैवी शक्तीच मदत करत असतात. म्हणजेच अशा व्यक्तींवर भगवंताची कृपादृष्टी कायम राहते. आठवी गोष्ट कधी कधी आपण भगवंताचे मंदिरात भजन कीर्तन ऐकण्यासाठी जात असतो. कितीही सुंदर भजन कीर्तन असले तरीही अचानक पणे आपले लक्ष वेळोवेळी विचलित होते.

आणि आपण आपल्या दैनंदिन समस्या अडचणींचा विचार करायला लागतो. किंवा आपल्या आसपास घडणाऱ्या घाटनां कडे आपलें लक्ष विचलित होते. परंतु काही व्यक्ती अशा असतात की ते जर एकदा भजन-कीर्तनात बसले की ते इतके तल्लीन होतात की त्यांना आसपासचे कोणत्याचं गोष्टीचा भान राहत नाही. त्यांना आपल्या आसपास खूप प्रसन्नतेचा अनुभव येतो व खूप शुभ ध्वनी त्यांच्या कानावर पडत राहतात.

निश्चितच अश्या व्यक्तींची साथ ह्या अलौकिक शक्ती देत राहतात. आणि अशा व्यक्ती आयुष्यात खूप प्रगती करतात. नववी गोष्ट जे व्यक्ती भगवंताचे चरणावर परमानंदाची अनुभूती करतात. आणि भगवंताची भक्ती चा खरा आनंद मानतात असे व्यक्ती स्वतःही कधी दुखी होत नाही व इतरांनाही दुःख पोहोचवत नाही.

अशा व्यक्तींचे मन नेहमी शांत राहते ज्यामुळे ते सत्य व सदाचाराचे मार्गापासून कधीही विचलित होत नाहीत हा त्यांना भगवंताकडून मिळालेला एक विशेष आशीर्वाद असतो ज्यामुळे ते नेहमी समाजात मानसन्मान मिळवतात. तर मित्रांनो हे आहे ते नऊ संकेत ज्यामुळे आपल्याला समजते कोणत्या व्यक्तींवर भगवंताची कृपा आहे ते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.