जाणून घ्या देव माणूस या मालिकेतील वंदी आत्या कोण आहे?

देव माणूस ही मालिका सध्या टीआरपीच्या रेस मध्ये अव्वल आहे देव माणूस या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत अनेक रंजक वळण मालिकेत दिसत आहे आणि देवीसिंग सुद्धा आता गजाआड गेला आहे याच मालिकेतील एक पात्र हावरट फुकट आणि भांडखोरसुद्धा ते म्हणजे वंदी आत्या हे पात्र या वंदी आत्यानं अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे.

तर वंदी आत्या हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचं खऱ्या आयुष्यातील नाव आहे सौ पुष्पा चौधरी पुष्पा या एक उत्तम अभिनेत्री गायिका आणि एक सुप्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहेत त्यांचा जन्म 26 मार्च 1967 रोजी झाला.

या आधी त्या बाबो या चित्रपटात दिसून आल्या होत्या अभिनेत्री बरोबरच त्या उत्तम गायिका सुद्धा आहेत अनेक गायनाच्या कार्यक्रमांमध्ये त्या आघाडीवर असतात देव माणूस मालिकेच्या आधी त्या कोरी पार्टी प्रोडक्शन मध्ये सुद्धा काम करत होत्या.

आणि त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रांमध्ये सुद्धा नाव मिळवला आहे 2020 मध्ये मिसेस कॉन्फिडन्स हा अवॉर्ड त्यांना मिळाला होता 2021 मध्ये सुपरवुमन हा अवॉर्डसुद्धा त्यांनी मिळवला त्या अनेक नाटक चित्रपट मध्ये दिसून आल्या.

कन्यादान या शॉर्ट फिल्ममध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आणि आत्ता त्या देव माणूस या मालिकेत अभिनय करताना दिसत आहेत प्रत्येक गोष्टीवर अडून बसणारी भांडकुदळ अशीही अत्या सादर करताना त्यांच्या अभिनयाचा कस लागला आहे.

त्यांनी हे पात्र अगदी हुबेहूब साकार केला आहे त्यामुळे प्रेक्षकांना हे खूप आवडत आहे हे पात्र जेव्हा स्क्रीन वर येतं तेव्हा प्रेक्षक खळखळून हसतात तर देवमाणूस मधील वंदी आत्या हे पात्र साकार करणाऱ्या सौ पुष्पा चौधरी यांना पुढील वाटचालीसाठी त्यांच्या चाहत्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.