जाणून घ्या समीर चौगुले यांचा अभिनय प्रवास

आज आपण अशा एक कलाकार बाबत माहिती जाणून घेणार आहोत हे हास्याचा खळखळत वाहणारा झरा कलाकाराने आजपर्यंत हसवाहसवी करून लोकांचे दुःख दूर केली आहेत. तो येतो तो सादरीकरण करतो आणि आपल्या आयुष्यातील सगळे दुःख नाहीशी करतो आपल्या मनामध्ये असेल तर असलेला टेन्शन ताणतणाव.

त्याला बघितलं की नकळतच निघून जाते असा हा सर्वांचा लाडका अभिनेता आणि उत्तम लेखक म्हणजे समीर चौगुले सध्या तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या रिऍलिटी शो मध्ये दिसून येतो. आणि आपल्याला पोट धरून हसायला लावतो त्याचा अभिनय प्रवास कसा होता ते आपण जाणून घेऊया समीर चौगुले हे मूळचे चीपळून चे.

त्यांचे शालेय एज्युकेशन शैलेंद्र एज्युकेशन स्कूल दहिसर येथून झाले आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाचे वेड होते कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांमध्ये अनेक एकांकिका मध्ये काम केले आहे ते त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कप प्रायव्हेट कंपनी मध्ये नोकरी करण्याचेही स्वीकारले.

पण त्यांचे या नोकरीमध्ये मन रमेना पुन्हा त्यांनी ही नोकरी सोडून करियर अभिनय क्षेत्रात करायचे असे ठरवले. खर तर कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांनी नाटके करायला सुरुवात केली खरी पण शाळेमध्ये असताना त्यांनी नकळतच काही नाटकामध्ये काम केली तेव्हा मात्र तितके यश तितकीशी आवड त्यांना लागली नाही.

चौथीमध्ये असताना त्यांनी एका नाटकात भाग घेतला होता. नाटक होते हिमगौरी आणि सात बुटके त्यामध्ये त्यांना सत्य बुटके ची भूमिका त्यांना मिळाली होती समीर यांचा स्ट्रगल खूप मोठा आहे सुरुवातीच्या काळामध्ये एकांकिका नाटक आणि पडेल तेव्हा बॅकस्टेजला नाटकही केले आहे समीर यांचा एक गुण म्हणजे ती वेळेच्या आधी कुठेही पोचतात.

हे सर्व त्यांच्या आयुष्यातील प्रयत्न चालूच होते पण तो क्षण आला नव्हता बऱ्याच कालावधीनंतर समीर त्यांच्या आयुष्यामध्ये तो क्षण आला ते नाटक होतं यदाकदाचित संतोष पवारांचा यदाकदाचित नाटकामध्ये त्यांची निवड झाली आणि आणि या नाटकापासून त्यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचं करिअर चालू झाले.

यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही टिकलं ते पॉलिटिकल या रिऍलिटी शो मध्ये त्यांचा सहभाग दिसून आला झी मराठीवरील फू बाई फू या रियालिटी शोमधून त्यांनी पुढे हसवणे पसंत केले लोकांना आणि प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावले. त्यांचे अनेक स्क्रिप्ट गाजू लागले.

निर्मिती सावंत स्वप्निल जोशी हे कार्यक्रमाचे जज होते त्यांनी समीर यांना बऱ्याचदा शाबासकी दिली आहे स्टार प्रवाह वरील आंबट गोड या मालिकेमध्ये ते आपल्याला पूर्ण वेळ दिसून आले. या मालिकेमधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली कालचा पात्र त्यांनी अगदी हुबेहूब साकार केलं होतं समीर चौगुले हे उत्तम अभिनेते तर आहेतच.

परंतु उत्तम लेखक देखील आहेत त्यांची विचार करण्याची खूप विनोदी आहे. त्यांनी सतराशेसाठ सासुबाई या मालिकेचे त्यांनी 200 भाग केले आहे फुबाईफु नंतर ते पुन्हा कॉमेडीची एक्सप्रेस कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातून स्किट सादर करून प्रेक्षकांना हसवत आहेत. बऱ्याच वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे.

त्यापैकी नाटक वस्त्रहरण या नाटकंमध्ये बालक-पालक असा मी असामी कदाचित या सारख्या नाटकांचा सहभाग होता तर छोट्या पडद्यावर ते अनेकदा दिसून आले. टीकल ते पोलीटिकल आंबट गोड होणार सून मी या घरची मालिकांमध्ये सुद्धा त्यांचे काम वाखाणण्याजोगे होते मालिका नाटक त्याच बरोबर रियालिटी शो बरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलेले आहे.

विकून टाक वक्रतुंड आजचा दिवस माझा मुंबई मेरी जान मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जाण दाखवली. समीर चौगुले सांगतात पु ल देशपांडे चार्ली चापलीन हे त्यांचे आदर्श आहेत त्यांचे लेखन आणि त्यांचा स्वभाव त्यांना खूप आवडतो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात ते विशाखा सुभेदार त्यांच्याबरोबर स्किट सादर करतात.

या दोघांची जोडी उत्तम आहे स्टार प्रवाह वरील आंबट गोड मालिकेमुळे त्यांची ओळख झाली. या मालिकेत त्यांची मैत्री घट्ट झाली म्हणूनच विशाखा आणि समीर यांचे टायमिंग अचूक आहे त्यांचे स्किट त्यांचे पंचेस वाजले शिवाय राहत नाही प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात समीर चौगुले खरंतर अवलिया कलाकार स्वतःच्या आयुष्यातील दुःख विसरून प्रसंगाचा विनोद निर्माण करणे.

लिखाण करणे त्याचे उत्तम सादरीकरण करणे वेदांचे खरे तर कौशल्य आहे अख्खा महाराष्ट्र नव्हे महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक हास्याची लाट पसरते प्रेक्षक वर्ग आयुष्यातील दुःख विसरून त्यांची ही कलाकारी बघत असतो. म्हटले जाते की हसल्याने आयुष्य वाढते आणि आयुष्य काढण्याची प्रोसेस मध्ये नक्कीच समीर चौगुले यांचा हात आहे.

समीर चौगुले बोलताना नेहमी एक उदाहरण सांगतात. मिल्ट्रीमध्ये मराठा बटालियन चे काही जवान सुद्धा त्यांचा हा कार्यक्रम बघतात आणि पोट धरून असतात 24 तास जे सीमांवर उभे राहून आपल्या देशाची सेवा करतात त्यांच्या आयुष्यामध्ये काही क्षण हास्याचे येतात आणि जेव्हा ते आपल्याला कॉम्प्लिमेंट देतात.

त्यापेक्षा मोठी कॉम्प्लिमेंट कोणतीच नाही असे समीर सांगतात समीर चौगुले यांच्या पत्नीचे नाव आणि अनिता चौगुले असे आहे नक्कीच अश्या या अवलिया कलाकार आणि हास्य सम्राट लोकांना हसवण्याचे कार्य अविरत करतील.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.