जाळा ही एक वस्तू सर्व विघ्न नष्ट होतील

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक विशिष्ट उपाय पाहणार आहोत, तो उपाय अमावस्येच्या दिवशी केला जातो. हा उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, कष्ट नष्ट होऊन जातं, संपून जातं. हा फारच विशिष्ट अशा प्रकारचा अचूक उपाय मानला जातो. आपले पूर्वज सनातन काळापासून हा उपाय करत आले आहेत.

काळओघात आपण हा उपाय करण्यापासून दुरावलेलो आहोत. प्रश्न असा आहे की, अमावस्येच्या दिवशी काय केले पाहिजे? या दुनियेतील प्रत्येक व्यक्तीला आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असते, सफलता मिळवायची असते, स्वतःला त्याला यशाच्या उत्तुंग शिखरावर न्यायचे असते.तो आपल्या अडचणींना दूर करू इच्छितो,

येणाऱ्या विघ्णांना दूर करू इच्छितो, त्याला ज्या कमजोरी आहेत दुर्बलता आहेत त्यांना नष्ट करू इच्छितो, शत्रूंच्यावर विजय प्राप्त करू इच्छितो, आपला उद्योग व्यवसाय, व्यापाराला वाढवू इच्छितो, नोकरीमध्ये यशस्वी होऊ इच्छितो, दुकानदारीमध्ये यशस्वी होऊ इच्छितो तर अशाप्रकारे तुमच्या आमच्या,

प्रत्येक व्यक्तीच्या इच्छा असतात आणि त्यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. बेहिशोबी प्रयत्न करीत असतो. कर्म तर आपल्याला करावेच लागते परंतु कर्माबरोबर जर भाग्याचा उपयोग करून घेतला गेला, थोडा अध्यात्माचा उपयोग करून घेतला गेला आणि या दोन्ही गोष्टी जेव्हा एकमेकांशी जोडल्या जातात तेव्हा आपल्या सफलतेचे,

यशस्वीेतेचे प्रमाण वाढते. आजचा हा उपाय त्याच संदर्भातील आहे. जाणून घेऊया आजच्या उपायाविषयी. जेव्हा आपण एखादे कार्य करण्यासाठी जाता आपल्याला वाटते किंवा प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपले कार्य सफल होऊ दे. दुनियेमध्ये अशी कोणती व्यक्ती आहे जिला असे वाटत नाही तर जेव्हा आपण कार्य करण्यासाठी जाऊ तेव्हा एक खास प्रकारची विधी करायला हवी.

आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला अमुक एका व्यक्तीकडून जसे आपले नातेवाईक असतील,मित्र असतील किंवा व्यवसायातील, नोकरीच्या ठिकाणच्या व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून अडचणी येत आहेत तेव्हा देखील अशा खास विधी केली पाहिजे. आपल्याला असे वाटत असेल की आपल्याला व्यापारात शत्रुता आली आहे,

प्रतिस्पर्धी आले आहेत व समोरील व्यक्ती आपल्याला त्रास करत आहे तर आपण हा उपाय केला पाहिजे. आपल्याला एक भोजपत्र घ्यायचे आहे व त्या भोजपत्रावर काही विशिष्ट असे लिहून त्या भोजपत्राला अमावस्येच्या दिवशी एक खास प्रयोग करून जाळायचे आहे. चला जाणून घेऊया हा प्रयोग कसा करायचा आहे आणि त्याचा उपयोग कसा करतात.

यासाठी आपण सैल, ढिले कपडे घालून एखाद्या शांत खोलीमध्ये बसावे, जर जमिनीवर बसता येत नसेल तर खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसावे, अगदी रिलॅक्स होऊन बसायचे आहे व आपल्या समोर एक छोटेसे काळया रंगाचे कापड अंथरावे व त्यावर तांब्याची थाळी ठेवावी. यानंतर आपण एक भोजपत्र घ्यावे.

भोजपत्र हे वृक्षाची साल असते. हे हिमालय पर्वतातील वृक्ष आहे. याचे वैशिष्ट्य असे असते की जर यावर काही लिहले तर कित्येक वर्षे लिहलेले पुसले जात नाही. ते आपल्याला कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात किंवा आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात अगदी सहज मिळून जाईल. भोजपत्र नाही मिळाले तर आपण साधारण कागदही घेऊ शकता.

पांढऱ्या रंगाचा आपण हे भोजपत्र घेऊन त्यावर निळ्या पेनाने एक बिजमंत्र लिहायचा आहे. लक्षात ठेवा बिजमंत्र हा निळ्या पेनानेच लिहायचा आहे. बिजमंत्र आहे || क्रिं ||. आपण क्रिं हा बिजमंत्र भोजपत्रावर किंवा पांढऱ्या कागदावर लिहायचा आहे. क्रिं बिजमंत्र लिहून हे भोजपत्र आपल्या समोर जी तांब्याची प्लेट ठेवली आहे त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहे. हे ठेवल्यानंतर शुक्रीय मुद्रा करायची आहे.

शुक्रिय मुद्रा म्हणजे आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यावर सरळ ठेवावेत, आपले तळहात आकाशाच्या दिशेला लागतील असे यानंतर हाताची पाची बोटे एकत्र जुळवावित म्हणजे आपल्या हाताचा आकार मोदका सारखा होईल, याला वराही मुद्रा असे देखील म्हणतात तर शूक्रिय मुद्रा करून शांत बसायचे आहे.

शांत बसल्यानंतर दहा वेळेला प्राणायाम करायचे आहे म्हणजे मोठा दीर्घ श्वास घ्यावा व जितका वेळ शक्य असेल तितका वेळ श्वास रोखावा आणि मग तो सावकाश हळूहळू सोडायचा आहे. अशाप्रकारे दहा वेळेला श्वासोच्छवास करावा. असे करण्याने आपली मानसिक अवस्था सामान्य होते. आपल्या मनावरील ताण हलका होतो. मन शांत राहते. असे प्राणायाम केल्यानंतर आपण पुन्हा पेन घ्यायचा आहे.

पेन निळ्या शाईचाच घ्यावा व जिथे आपण क्रिं लिहले आहे त्याच्या खाली लहान अक्षरात आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा लिहायची आहे. एकवेळच्या प्रयोगामध्ये आपण एकाच इच्छा लिहावी. एकच इच्छा लिहणे चांगले मानले जाते. तेव्हा जी काही आपली अगदी खास इच्छा आहे, आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट आहे अशी इच्छा लिहावी.

ज्या इच्छेमुळे आपल्या जीवनात फार मोठे परिवर्तन येऊ शकते अशी इच्छा या भोजपत्रावर लिहावी. समजा की, मला माझ्या जीवनात ही गोष्ट करायची आहे व त्यासाठी मला या गोष्टीची आवश्यकता आहे, मला माझ्या जीवनात मनपसंत जोडीदाराची गरज आहे त्याप्रमाणे जी काही इच्छा असेल ती लिहावी. जे काही लिहायचे आहे ती आपली मर्जी परंतु लिहायचे निळ्या पेनाणेच आहे.

जर का कोणी आपला शत्रू आहे, त्याच्यामुळे आपल्या जीवनात समस्या निर्माण होत आहेत तर त्या व्यक्तीचे नाव देखील आपण लिहू शकता. लिहून झाल्यावर हे भोजपत्र किंवा पांढरा कागद पुन्हा प्लेटमध्ये ठेवायचे आहे व मागे सांगितल्याप्रमाणे पुन्हा शुक्रिय मुद्रा करून क्रिं बिजमंत्राचा जप करायचा आहे. जितका वेळ आपल्याला वाटेल तितका वेळ आपण जप करायचा आहे. हा फक्त एक दिवसाचा प्रयोग आहे.

यामध्ये आपल्याला माळ घेण्याची आवश्यकता नाही. पण किमान १०८ वेळा जप करावा. यापुढे आपण कितीही जप करू शकता. हा जप आपल्याला उपांशू पद्धतीने करायचा आहे म्हणजेच मंत्र मोठ्याने न म्हणता तोंडातल्या तोंडात पुटपुटत हळू आवाजात म्हणायचा आहे. हा प्रयोग कोणत्याही अमावस्येच्या दिवशी, ग्रहणाच्या दिवशी, रविपुष्य नक्षत्राच्या दिवशी अथवा शनिवारच्या दिवशी करू शकता.

हा प्रयोग करण्याची वेळ संध्याकाळची सुर्यास्तानंतरची आहे. सूर्यास्तानंतर आपण हा प्रयोग करणे अतिउत्तम असते नाहीतर आपण दिवसा कधीही करू शकता. हा उपाय करू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला भोजन दान करावे किंवा काहीही खाण्यापिण्याची वस्तू दान करावी पण पैसे दान करू नयेत. आणि पैसे दान करायचेच असतील तर एका मंदिराच्या दान पेटीत दान करावे.

यानंतर आपण बीजमंत्र लिहलेले भोजपत्र हातामध्ये धरावे व डोळे मिटून क्रिं मंत्राचा जप करत त्याला आग लावावी. आग लावून ते भोजपत्र परत प्लेटमध्ये ठेवावे. ते पूर्ण जळून झाल्यावर त्याची राख एखाद्या झाडाखाली टाकावी, इकडे तिकडे पडू देऊ नये. कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये. आपण जेव्हा असे करता आपण समजून चला की जो संकल्प आपण केला आहे,

ज्या मनोकामनेसाठी आपण हे कार्य केले आहे त्या गोष्टी दहा पटीने अधिक तीव्रतेने काम करायला लागतात. हा प्रयोग अमावस्येला केल्याने याचा अत्याधिक प्रमाणात लाभ मिळतो. भोजपत्र हे सर्वात चांगला कागद मानला जातो परंतु जर भोजपत्र मिळाले नाही तर सामान्य कागदावर करा. साध्या कागदावरही तोच परिणाम मिळेल.

आपण अनुभवाल की ज्या व्यक्तीने मनोकामनेसाठी हा उपाय केला आहे त्या मनोकामने संदर्भातील कामे व्हायला लागली आहेत. हा उपाय एक वेळच करायचा आहे पण जर तुम्हाला पुन्हा करायचा असेल तर पुढील अमावस्येच्या दिवशी पुन्हा करू शकता. या प्रयोगाला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. आपण हा उपाय अवश्य करावा. आपल्याला याचा फारच चांगला लाभ मिळेल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.