जीवनात या दोन गोष्टी नक्की करा गरिबी तुमच्या जवळ पण येणार नाही

नमस्कार मित्रांनो भगवंतांनी आपल्याला हे शरीर दिले आहे त्याबरोबरच मन आणि बुद्धीही दिली आहे. आपल्याला शरीर, मन व बुद्धी मध्ये भगवंतांनी इतकी प्रचंड ऊर्जा भरली आहे की आपल्याला त्याची मोजणीही करता येणार नाही. आपण आपल्या मेंदूच्या, बुध्दीच्या क्षमतेतील ५% हिस्साही वापरत नाही.

आपला मेंदू इतका स्ट्रोंग आहे की शंभर कॉम्प्युटरचे एकत्रित ज्ञान आपण एकट्या मेंदूमध्ये साठवून ठेवू शकतो. परंतु आपण स्वतःच त्याला मर्यादा घातलेल्या आहेत. आपण स्वतःला मर्यादित करून ठेवलेले आहे. आपल्यामध्ये किती शक्ती आहे, किती ऊर्जा आहे हे आपल्याला माहीतच नसते. आपण फक्त विचार जरी केला तर.

या जगातील अशी कोणतीही शक्ती नाही जी आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकते आणि आपल्याला ती मिळू शकत नाही अशी. आपण नेहमी सकारात्मक विचार करावा. नेहमी असा विचार करावा की हे होईलच, मी हे करणारच, मला हे मिळेलच आणि बघा नेहमी असेच सकारात्मक विचार केल्याने खरोखर त्याप्रमाणेच घडू लागते.

आपण अनेकदा अनुभव घेतला असेल आपण काही स्वप्न पाहतो,काही विचार करतो आपल्याला हे हवे आहे, आपण हे मिळवायला हवे तर काही काळानंतर आपले ते स्वप्न सत्यात उतरलेले आपल्याला दिसते. मनुष्याचे प्रत्येक स्वप्न,प्रत्येक इच्छा पूर्ण होतात, काही स्वप्न पूर्णपणे पूर्ण होतात तर काही अंशतः पूर्ण होतात, परंतु नक्कीच पूर्ण होतात.

परंतु त्यासाठी आपले विचार तितके सकारात्मक व उंच हवेत. विज्ञानाने ही आज हे सिद्ध केले आहे. आपण आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करीत नाही. आपण जर आपल्या क्षमतेला मर्यादा लावल्या नाहीत तर आपल्या अमर्यादित विकास होईल. आपल्या विकासालाही मर्यादा राहणार नाहीत. म्हणून आपले विचार,मन, बुध्दी, ऊर्जा यांचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न करा.

एक घटना पहा, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे लंडन मध्ये बिगबेन टॉवरच्या खाली एक सफाई कामगार तेथे स्वच्छ्ता करीत होता. रविवारचा दिवस होता. मुलांना शाळेला सुट्टी होती. म्हणून त्याने आपल्या बारा वर्षाच्या मुलालाही बरोबर आणले होते. दुपारी बारा वाजले आणि घड्याळाचे ठोके पडू लागले. घड्याळाचा पहिला ठोका पडताच त्या मुलाने असा विचार केला की मी एक दिवस लंडनचा पंतप्रधान होईन.

त्याला अचानक असे सुचले व तो अगदी मनापासून हे खरोखर सांगू लागला, त्याला ते खरोखर करायचे होते. म्हणून तो वारंवार हेच सांगू लागला की व्हॅलेंटन एक दिवस लंडनचा पंतप्रधान होईल. घड्याळाचे ठोके पडत होते आणि तो प्रत्येक ठोक्यावर हे वाक्य अगदी मनापासून बोलत होता. घड्याळाचे बारा ठोके पडले आणि त्याने बारावेळा हे वाक्य सांगितले.

आणि खरोखर दहा वर्षानंतर म्हणजेच वयाच्या बाविसाव्या वर्षी व्हॅलेंटन लंडनचा पंतप्रधान झाला. विचारांची ताकद इतकी प्रचंड असते एका विचारातूनच आपण संकल्प करतो. भगवंताची कृपा आपल्यावर आहेच परंतु ज्यावेळी आपण आपले विचार उच्च ठेवतो,त्यामध्ये सकारात्मक ठेवतो त्यावेळी भगवंतही आपल्याला सर्व शक्तींना ऊर्जा प्रदान करतात आणि आपले स्वप्न सत्यात उतरते.

म्हणून जीवनात कोणतीही गोष्ट करताना विचार उच्च व सकारात्मक ठेवा.स्वतःला मर्यादा घालू नका. मी हे करणारच, मला हे मिळणारच असा विचार करा, बघा तुमचे स्वप्न कसे सत्यात उतरते ते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.