जुने कपडे कोणत्या दिवशी टाकावे जुने कपडे कोणाला देऊ नये जुने कपडे घरात ठेवल्याने काय घडते

नमस्कार मित्रांनो आपल्याला नवीन कपडे घेण्याची खूप आवड असते. विशेषतः स्त्रियांना कपड्याचे फार आकर्षण असते. कुठे सेल लागला एखादा नवीन ट्रेंड बाजारात आला तर तो आपल्या कपाटात असायलाच हवा. असे करून आपण नव नवीन कपड्यांची खरेदी करत राहतो. आणि कपाटात कपड्यांचा ढीग तयार होत राहतो.

इतके कपडे जमा झाल्यावर त्याचा वापर काही होत नाही. नवनवीन फॅशन किंवा आवड म्हणून हे कपडे घातले जातात. व तसेच पुन्हा ते आपल्या कपाटात कोपऱ्यात पडून राहतात. असे करून करून कपाठ गच्च भरते मग गरज वाटते ते जुने कपडे बाहेर काढण्याचे. मग आपण आपल्याला न आवडणारे व्यवस्थित फिटिंग न बसणारे लहान मोठे होणारे फाटलेले शिलाई निघालेले.

असे सर्व कपडे आपण बाजूला काढतो व आपल्यापुढे एक मोठा प्रश्न पडतो की या कपड्यांचे काय करावे. आज आम्ही तुम्हाला हेच सांगणार आहोत. की जुन्या व फाटक्या कपड्यांचे काय करावे. आपण जुने कपडे कोणाला देऊ शकतो का आपण जुने कपडे कोणाला द्यावेत. व कोणाला देऊ नयेत. फाटके कपडे घातल्याने काय होते.

कोणत्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा असते जुने कपडे घराबाहेर काढताना कोणत्या दिवशी काढावेत. या आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फाटलेले कपडे कधीही घालू नयेत कधी कधी असे होते की आपल्याकडे ढीगभर कपडे असताना देखील आपला जीव एका कपड्यातच अडकलेला असतो तो आपला आवडता ड्रेस असल्याने.

तो जुना झाला फाटला तरीदेखील आपल्याला तो टाकून द्यावा असे वाटत नाही. मग तो ड्रेस तसाच घातला जातो परंतु फाटलेले कपडे घातल्याने आपल्या आजारांमध्ये वाढ होते. आपल्याला दुःख त्रासाचा सामना करावा लागतो. आणि याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. कितीही आवडता ड्रेस असेल आणि तो जर फाटला असेल.

तर तो टाकून द्यावा किंवा शिवून मगच वापरावा. काही व्यक्तींचे वरचे कपडे अगदी छान नीटनेटकी असतात पण अंडरगारमेंट्स फाटले तरीदेखील ते तसेच वापरले जातात. बनियानला अनेक ठिकाणी छिद्र पडलेली असतात. इतर अंडरगारमेंट्स ही फाटलेले असतात. ते तसेच वापरले जातात फाटलेले किंवा शिलाई निघालेले अंडरगारमेंट्स घातल्याने मानसिक आजार होऊ शकतात.

तसेच कपड्यांचा संबंध हृदयाशी असल्याने हृदय संबंधित आजारांचा सामना करावा लागू शकतो. फाटलेले कपडे घातल्याने आपल्या ऊर्जेचा क्षय होतो कमरेखालील कपडे फाटली असतील तर आपल्याला शनी दोषाचा सामना करावा लागू शकतो. म्हणून फाटलेले कपडे कधीही घालू नये आता आपण जाणून घेऊयात की जुन्या कपड्यांचे काय करावे.

आपण जे कपडे वापरत नाही परंतु ते व्यवस्थित आहेत. असे कपडे आपण गरजू किंवा गरीब व्यक्तींना देऊ शकतो. परंतु आपले जुने कपडे कोणालाही देताना व्यवस्थित धुऊन मगच इतरांना द्यावेत. आपण अंगावरून काढलेले कपडे न धोता तसेच कधीही कोणालाही देऊ नयेत. जुने कपडे केवळ गरजू व्यक्तींना द्यावीत जो व्यक्ती खरोखरच गरजू आहे.

जो व्यक्ती या कपड्यांचा वापर करेल अशा व्यक्तींनाच हे कपडे द्यावेत. जुने कपडे कधीही शुक्रवारी किंवा शनिवारी घराबाहेर काढावेत जुने कपडे कोणालाही देताना शुक्रवारी किंवा शनिवारी ते द्यावेत. आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट करायची असेल तर शनिवारी ते कपडे घराबाहेर काढावे हे सर्वश्रेष्ठ ठरते. आपण कपडे घरा बाहेर काढताना त्यातील मऊ सुती कपडे आपण घराच्या स्वच्छतेसाठी घरात ठेवतो.

परंतु अशा कपड्यांची गाठोडी करून घरात ठेवू नये. ते घडी करून एका ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवावेत. आणि वरचे वर या कपड्यांना उन्हात वाळवावेत म्हणजे या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जा जमा होणार नाही. आपण तीन महिने ज्या वस्तूला हात लावत नाही त्याठिकाणी दारिद्र्य व नकारात्मकता निर्माण होते. जुने झालेले फाटलेले वापरात नसलेले आतील कपडे हे कधीच कोणालाही देऊ नयेत.

असे कपडे एकत्र करून जाळून टाकावेत. कचराकुंडीत टाकून द्यावेत. आपण जेव्हा नवीन कपड्यांची खरेदी करतो तेव्हा हे कपडे सणवार बघून किंवा सोमवार मंगळवार गुरुवार या दिवशीच काढावे. हे दिवस नवीन कपडे घालण्यासाठी शुभ दिवस असतात. मित्रांनो आता तुमच्या लक्षात आलेच असेल कि जुन्या कपड्यांचे काय करावे. ते कोणाला द्यावेत व कशाप्रकारे त्यांचा नायनाट करावा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.