जे होते ते चांगल्यासाठीच होते हे सांगतात श्रीकृष्ण

भगवद्गीतेत एक वाक्य सांगितले आहे जे होते ते चांगल्यासाठीच होते जर द्रोपदीचे वस्त्रहरण झाले नसते तर कदाचित महाभारत घडलेच नसते व आपल्या सर्वांना आपला धर्मग्रंथ असलेले भगवद्गीता कधी समजलीच नसते. तर एवढे रामायण झालेच नसते म्हणजे पुढील बाबी घडण्यासाठी आधी घडणाऱ्या गोष्टी फक्त निमित्तमात्र असतात व कोणत्याही गोष्टीचा शेवट हा चांगलाच होतो.

याविषयी एक कथा मी तुम्हाला सांगते एक साधू महाराज होते ते नेहमी या गावातून त्या गावात असे फिरत असतात व लोकांना भगवंतांचे कार्य समजावून सांगत असत त्यांच्याकडे फक्त देवांचा एक ग्रंथ एक दिवा एक बकरी आणि एक गाढव या चारच वस्तू होत्या ज्या गावात ते गेले त्या गावात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असतात आणि भगवंत आपला दिवस घालवीत असत.

रात्र दिव्याच्या उजेडात ग्रंथांचे वाचन करीत असतात हा त्यांचा रोजचा दिनक्रम होता एकदा एका गावात आले व गावातील सर्व जण खूप नास्तिक होते ते भगवंतांना मानत नसत त्यामुळे साधूंना कोणीही विचारले नाही व कोणीही भिक्षा ने दिले नाही आणि आमच्या गावात मुक्काम करायचा नाही असा सर्वांनी दम दिला.

साधूंना खूप वाईट वाटले आता ते इतक्या रात्री कुठे जातील असा विचार करीत असतानाच एक म्हातारी काठी टेकत टेकत तेथे आली व साधूंना म्हणाले की मी एकटीच असते म्हणून थोडासा स्वयंपाक केला होता हे थोडेसे भाजी-पोळी उरले आहे ते तुम्ही खा. पण माझी झोपडी छोटीशी आहे व गावातील लोकांनी बघितले तर मलाही गावा बाहेर काढते.

म्हणून तुम्हाला मी झोपडीत घेऊ शकत नाही त्यासाठी मला क्षमा करा पण इथून थोडे पुढे गेलात की जंगल लागेल त्या जंगलात एखाद्या झाडाखाली तुम्ही राहू शकता. असे त्या म्हातारीने साधू महाराजांना सांगितले साधूना थोडे बरे वाटले व त्या म्हातारीला आशीर्वाद दे जे होते ते चांगल्यासाठीच होते असे सांगून ते तेथून जंगलाच्या दिशेने निघाले.

व जंगलात एका मोठ्या झाडाखाली त्यांनी गाढवाला बांधले थोड्या अंतरावर बकरीला बांधले व थोड्या अंतरावर स्वतःचीही झोपण्याची तयारी केली. त्या गाढवावर ते आपले सामान ठेवत असत व वेळप्रसंगी खायला काही मिळाले नाही तर बकरीचे दूध काढून ते पीत असतात तेथे बसून त्यांनी म्हातारीने दिलेली भाजी पोळी खाल्ली व दिवा लावून.

ग्रंथ वाचायला बसले परंतु खूप सोसाट्याचा वारा सुटला व दिवा विझला त्यांनी पुन्हा दिवा पेटलेला पण पुन्हा हवेने विझला. साधू महाराजांना खूप वाईट वाटले व त्या भगवंतांना सांगू लागले की आता वाचून येणार आहेस का असे म्हणून हा दिवा लावला पुन्हा तो बघितला आता साधू महाराजांना राग आला व त्यांनी तो दिवा व तो ग्रंथावरून ठेवून दिले व सांगितले की जाऊद्या जे होते ते आपल्या भल्यासाठीच होते.

असे म्हणून त्यांनी अंग टाकले तो त्यांना बकरीच्या ओरडण्याचा आवाज आला त्यांनी पडल्यापडल्याच तेथे पाहिले तर काही लांडगे मिळून बकरीला ओढून नेत आहेत हे बघून साधूंना खूप वाईट वाटले व भगवंतांना ते सांगू लागले की आज तू माझी परीक्षा घेणार आहेस का असो जे होते ते आपल्या भल्यासाठीच होते असे म्हणून साधुमहाराज झोपी गेले.

मध्यरात्री त्यांना गाढवाचा ओरडण्याचा बघितले तर दोन-तीन वाघ मिळून त्यांच्या गाढवाला ओढत आहेत हे बघून साधूंना खूपच वाईट वाटले होते भगवंतांना म्हणाले माझ्याकडे फक्त या चारच वस्तू होत्या त्यातीलही दोघांची साथ तू काढून घेतले असो जे होते ते आपल्या भल्यासाठीच होते असे सांगून साधू परत झोपी गेले.

सकाळी उठून आपला दिवा व ग्रंथ घेऊन ते जड पावलाने जंगलातून बाहेर पडले आता त्यांच्याबरोबर गाढव बकरे काहीही नव्हते त्यांना फार वाईट वाटत होते परत फिरताना त्या गावातून ते जाऊ लागले तर गावात सगळीकडे रडारड व आरडाओरडा त्यांना ऐकू आला म्हणून त्यांनी त्या म्हातारीच्या झोपडीकडे जाऊन विचारपूस केली.

तर समजले की रात्री खूप दरोडेखोर गाव लुटायला आले होते त्यांना ज्यांनी विरोध केला त्यांना त्या दरोडेखोरांनी खूप मारले काहींचे हात तोडले तर काहींचे पाय तोडले व सर्व गावातील संपत्ती लुटून नेली गावातील एकही घर त्यांनी सोडले नाही म्हणूनच गावात एवढी रडारड व आरडाओरडा ऐकायला येत आहे.

मी विचारले की मग तुम्ही माझ्याकडे चोरी करण्यासारखे आहे काय माझ्या झोपडीत येतील आणि जर आले तर माझे अठराविश्व दारिद्र्य बघून उलट तुम्हाला तर काही झाले नाही ना यावर हसू लागली व म्हणाली की माझ्याकडे चोरी करण्यासारखे आहे काय राज म्हणाले असो जे होते ते आपल्या भल्यासाठी होते.

तेव्हा म्हातारीने साधूंना विचारले की तुमचे गाढव बकरी कोठे आहे तेव्हा साधू म्हणाले की बकरे लांडग्यांनी व गाढवाला वाघांनी मारून खाल्ले असं जे होते ते आपल्या भल्यासाठीच होते तेव्हा म्हातारी म्हणाली तुमचे तर कालपासून नुकसानच नुकसान होत आहे तुम्हाला गावात कोणी राहू दिले नाही कोणी दीक्षा दिले नाही तुमचे गाढव बकरे मारले गेले.

तरीही तुम्ही म्हणताय ते जे होते ते आपल्या भल्यासाठी हे असे कसे त्यावर साधुमहाराज सांगू लागले आपण जर भगवंतांवर विश्वास ठेवला व आपले जीवन त्याच्या स्वाधीन केले तर तो आपला उदरनिर्वाह जरूर करतो आता गावातील सर्व लोकांनी मला भोजन दिले नाही कारण ते नास्तिक होते व त्यांच्या हातचे भोजन जर मी खाल्ले असते तर मीही नास्तिक झालो असतो.

म्हणून भगवंतांनी मला या लोकांकडून भिक्षा मिळू दिले नाही परंतु माझ्या पोटापाण्याचे सोय सातत्याने तुमच्या घरी करूनच ठेवली होती गावातील सर्व लोकांनी मला गावात राहू दिले नाही ते बरे झाले नाहीतर दरोडेखोरांनी मलाही मारले असते रात्री खूप वारा सुटला व दिवा सारखा विझत होता.

मला ग्रंथही वाजता आला नाही मी तसाच झोपलो परंतु मी थोड्या वेळाने लांडग्यांनी माझी बकरी मारली जर दिवा चालू असता तर मी त्यांना दिसलो होतो व त्यांनी माझ्यावर हल्ला केला असता नंतर मध्यरात्री गाढवावर वाघाने हमला केला तेव्हा हे जर गाढव नसते तर वाघांनी मलाच म्हणून खाल्ले असते.

शिवाय या गावातील लोकांनी माझ्याकडे बकरी व गाढव आहे म्हणून मला गावात राहू दिले नाही नाही म्हणून भगवंतांनी माझी ही अडचण ही अशाप्रकारे सोडवली म्हणे पुन्हा कधी एखाद्या गावात मला मुक्कामाला त्रास होऊ नये म्हणजेच जे होते ते चांगल्यासाठीच होते.

फक्त आपण त्याचा अर्थ समजावून घेतला पाहिजे त्याशिवाय ज्याच्या त्याच्या कर्माचे फळ ज्याला त्याला मिळत असते मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कर्म फळांची वाटणी होत असते.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.