तीळ खाण्याचे अकरा फायदे

आपल्या लहानपणी आपण तीळ भाजून खायचो तिळासोबत गूळ साखर खाल्ली जायची आणि त्याचे अनेक फायदे सुद्धा मिळायचे. पण आजच्या काळात तिळाचे महत्त्व कमी झाले आहे या तिळाच्या औषधी गुणधर्मांबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. जाणून घेऊया की तीळ खाल्ल्याने आपल्याला नक्की कोणते फायदे होतात.

आज आपण पांढऱ्या तिळाबद्दल जाणून घेऊया तीळ हे दोन प्रकारच्या असतात. काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्ही तीळ आरोग्यदृष्ट्या अत्यंत उपयुक्त असतात. तिळाला सीसेम सीड्स असे इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. या तिळाची प्रकृती काहीशी उष्ण असते. आणि म्हणूनच हिवाळ्यात याच सेवन करणं जास्त फायदेशीर ठरतं.

मात्र उन्हाळ्यात आपण अल्प ते मध्यम या तिळाचं सेवन करू शकता तीळ कफनाशक असतात. जर तुम्हाला कफ झाला असेल किंवा छातीमध्ये कफ साठला असेल. तर या तिळाचं सेवन अवश्य करा तीळ हे शक्यतो भाजून खावे व त्याच्या सोबत गुळ किंवा साखर खाऊ शकता. साखरेपेक्षा गूळ खाणं हे जास्त फायदेशीर ठरतं.

हे तीळ वेदनाशामक असतात शक्तीवर्धक असतात व कमजोरी दूर करतात. महिलांना मासिक धर्मामध्ये जर काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी तिळाचं सेवन अवश्य करावं या तिळाचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तीळ खाल्याने हाडे मजबूत होतात. याबरोबरच आपले मास पेशी सुद्धा मजबूत होतात.

या तिळामध्ये अमिनो ऍसिड व प्रोटिन्स विपुल प्रमाणात आहेत की जे आपल्याला मजबुती प्रदान करतात या तिळाच्या सेवनाने आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतं हे तीळ आपले हृदय निरोगी ठेवतात. हृदयाच्या मास पेशींना स्ट्रॉंग बनवतात या तिळामध्ये सेसमीन नावाचं एक एंटीऑक्सीडेंट आढळतं.

की जे कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखत भविष्यात जर कॅन्सर होऊ नये असे वाटत असेल तर या तिळाचं सेवन अवश्य करा. तीळ खाल्ल्याने तणाव डिप्रेशन हे कमी होतं जर तुम्ही खूप ताण तणावाचं काम करता तर तीळ नक्की खावे तिळाच्या तेलाचा वापर आपण मसाज करण्यासाठी देखील करू शकता.

तिळाच्या तेलाने मसाज केल्यास हाडे बळकट होतात. सोबतच अनेक प्रकारच्या स्किनच्या समस्याही दूर होतात तिळाच्या तेलामध्ये थोडी कडुलिंबाची पाने टाकून हे तेल उकळवा आणि नंतर जर आपण या तेलाने मसाज केली तर स्किन प्रॉब्लेम हे दूर होतात आणि मास पेशी सुद्धा मजबूत बनतात.

हे तिळाचं तेल जर यामध्ये सुंठ टाकून उकळवले तर हे एक चांगल्या प्रकारचं वेदनाशामक बनत जर शरीराच्या एखाद्या भागावर वेदना होत असतील दुखत असेल तर हा उपाय आपण करू शकता तिळाचा सर्वात मोठा फायदा संधिवातामध्ये होतो. जर तिळासोबत आपण हळद मेथीदाणे अश्वगंधा सुंठ यांचा सुद्धा जर वापर केला.

तरी सुद्धा तो अत्यंत गुणकारी ठरतं ज्यांना बहुमुत्राचा आजार आहे तो दूर करण्यासाठी आपण गोकुळ वाणी यांचा समप्रमाणात काढा करून या विकारासाठी वापरू शकता. याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे तुपामध्ये हे थोडेसे भाजून घ्यावे. या ऐवजी काळे तीळ जास्त फायदेशीर ठरतात आणि गुळासोबत रोज रात्री याच सेवन करावं.

हे केल्यानंतर पंधरा मिनिटांनी दूध किंवा पाणी प्यावं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर सर्वांनी याचा उपयोग केला तरी चालेल जर तुम्हाला मूतखड्याचा त्रास असेल तर तिळाच्या रोपाची पान याठिकाणी खूप उपयुक्त ठरतात. याची पान वाळून त्याची पूड करून जर रोज सकाळ संध्याकाळ एक चमचा पाण्यात बरोबर घेतली. तर मुतखड्यामध्ये याचा चांगला फरक पडतो तिळाचे नियमित सेवन केल्यास आपले केस मजबूत व चमकदार होतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.