दात पांढरे करण्याचे उपाय दात मोत्यासारखे चमकतील दात दुखीवर घरगुती उपाय

पांढरे शुभ्र आणि चमकदार असतील तर आपले सौंदर्य अधिकच खुलते बोलताना सर्व प्रथम आपले लक्ष दातांकडे जाते. आणि दात जर पिवळे असतील आणि दातावर जर घाण सचलेली असेल तर तुमचे इंप्रेशन पूर्णपणे निघून जाते. तर अशा या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आणि तंबाखु गुटखा पान मसाला यामुळे जे दात रंगले आहेत.

किंवा दातावर जी घाण साचलेली आहे ही सर्व घाण काढून टाकण्यासाठी व दातावरील पिवळेपणा घालवण्यासाठी किंवा रा गलेले दात पुन्हा स्वच्छ किंवा पांढरेशुभ्र करण्यासाठी मी तुमच्यासाठी अतिशय सोपा आणि सर्वांना करता येण्यासारखा एक आयुर्वेदिक उपाय घेऊन आलेलो आहे.

या उपायामुळे तुमचे दात अगदी 3 दिवसातच मोत्यासारखे चामकतील तर मग हा उपाय कसा करायचा आणि त्यासाठी कोणकोणते साहित्य वापरायचे ते आपण पाहूया. तर हा उपाय करण्यासाठी पहिला घटक आपण घेणार आहोत जांभळाची पाने. हिरड्या आणि दातांसाठी जांभळाची पाने खूपच उपयुक्त असतात.

या पानांमध्ये अँटी ब्याक्टेरियल गुणधर्म असतो. हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या कायमची दूर होते. तसेच दातदुखी आणि दाडदुखी या समस्या जांभळाच्या पानामुळे नष्ट होतात. तर अशीही 3 जांभळाची पाने आपल्याला घायची आहेत आणि ती जांभळाची पाने कोवळी घ्यायची आहेत. तर ही जांभळाची पाने मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहेत.

जेणे करून जांभळाच्या पानांची ती पेस्ट तयार होईल. या नंतर दुसरा घटक आपण घेणार आहोत लिंबू. लिंबू हे ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखले जाते लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड असते. त्यामुळे दातांचा पिवळेपणा नष्ट होते तर अशा या लिंबाचे 5 थेंब यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि यानंतर तिसरा घटक आपण घेणार आहोत हळद.

हळदीमध्ये कर्क्युमेंन नावाचे रसायन असते. त्याच बरोबर अँटी ब्याक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हिरड्यांना सूज येणे दात किडणे आणि हिरड्यांमधून रक्त येणे या समस्या नष्ट होतात. तर अशी ही हळद आपल्याला एक चिमूट आपल्याला घ्यायची आहे. आणि यानंतर चौथा व शेवटचा घटक आपण घेणार आहोत खाण्याचा सोडा.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी खाण्याचा सोडा अत्यंत उपयुक्त आहे. तोंडाचा घाण वास येणे दात किडणे दातावर पिवळा थर साचने यांसारख्या समस्या खान्याच्या सोडल्याने नष्ट होतात. तर असा हा खाण्याचा सोडा 3 चिमुठ आपल्याला घ्यायचा आहे. आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आहे.

व्यवस्थित एकजीव केल्यानंतर या मिश्रणाची एक छान अशी पेस्ट तयार होईल. ही पेस्ट दातावर कशी लावायची ते आपण पाहूया तर यासाठी तुमचा नेहमीचा टूथब्रश घ्यायचा आहे आणि ही पेस्ट ब्रशवर घेऊन दात आतून आणि बाहेरून व्यवस्थित घासायचे आहेत. सादारणता 2 ते 3 मिनिट दात व्यवस्थित घासायचे आहेत.

आणि त्यानंतर खळखळून चूळ भरून दात स्वच्छ करायचे आहेत. पहिल्या वापर पासूनच तुम्हाला दातांमध्ये फरक दिसून येईल तर असा हा उपाय तुम्हाला दिवसातून 2 वेळ करायचा आहे. फक्त तीनच दिवसांमध्ये तुमचे दात पांढरे शुभ्र होतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.