दूध घेण्याची योग्य वेळ वेळेनुसार फायदे

मित्रांनो दूध घेण्याची काही ठराविक वेळा आहेत. ह्या वेळी जर दूर घेतलं तर त्या वेळे प्रमाणे दुध तुम्हाला फायदा देते प्रत्येक वेळेला तुम्ही ज्या ज्या वेळेला म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही सकाळी दूध घेतात. दुपारी घेतात व रात्री घेतात त्या वेळी ला त्या दूध घेतलेल्या चे फायदे हे वेगळे होतात. हे फायदे काय आहेत चला आपण बघूया.

समजा जर तुम्हाला अशक्तपणा आहे शरीराची वाढ होत नाही आहे. आपण दिल्या एकदम बारीक आहोत शरीरामध्ये ताकत कमी वाटत आहे. असे जर तुमच्या मध्ये असेल तर तुम्हीच सकाळी उपाशीपोटी दूध घ्या. तुमच्या शरीराची ताकद वाढेल शरीरामध्ये जे 7 धातू असेल रस, रक्त ,मांस, मेद, असती, मज्जा आणि शुक्र हे साती चे साती धातू.

वाढवण्यासाठी मदत होऊन जाईल त्याच बरोबर शुक्रधातू विशेष करून वाढण्याची सुद्धा मदत होती. ज्यावेळी तुम्ही सकाळी उपाशीपोटी दूध घेतात. त्याच बरोबर जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी दूध घेतल्याने आणखीन एक फायदा होतो तो म्हणजे असा की तुमची भूक चांगली वाढते. आणि अग्निदीपन करण्यासाठी या दुधाचा फायदा होतो.

आता आपण बघुया दुपारी जर दूध घेतलं तर काय होईल. दुपारी दूध घेतल्याने शरीरामध्ये इंटरनल जी ताकद असते ती तुमची चांगल्या प्रकारे वाढते त्याचबरोबर पित्ताचे जे विकार असतात ना तर ते कमी करण्यासाठी दुपारची घेतलेले दुधाचा फायदा होतो. मित्रांनो तुम्हीच बघा ना ज्या वेळेला आपल्याला ऍसिडिटी त्या वेळेस दूध घेतलं तर.

आपल्याला बरं वाटत जर तुम्हाला असिडिटी असेल तर तुम्ही दुपारच्या वेळा ला दूध घ्या असे सांगितले जाते की रात्रीच दूध घेणे योग्य नये. किंवा असे सांगितले जाते की रात्री च दररोज दूध घ्यायला पाहिजे. तुमची ताकद वाढली तर नक्की खरं काय आहे. तर रात्रीचे दूध घेण्याचे अनेक फायदे होतात. पहिला म्हणजे जर तुम्ही रात्री चे वेळी ला दूध घेतलं तर तुमचे डोळे चांगले होतात.

डोळ्यांना ताकद देण्यासाठी दुधाचा उपयोग होतो. त्याच बरोबर जर तुमचं पोट साफ होत नसेल, किंवा संडास ला कडक होत असेल अशा वेळीसुद्धा रात्रीचे दूध घेतल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो ह्या आहे या तीन वेळ सकाळ दुपार आणि रात्री या तीन वेळा ला जर तुम्ही दूध घेतलं तर त्या त्या वेळा प्रमाणे तुम्हाला फायदा दिसेल .

तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते ती म्हणजे अशी की ज्या वेळेला तुम्ही दूध घेणार आहेत. म्हणजे समजा जर तुम्ही सकाळी दूध घेतात त्या सकाळच्या वेळेला जर तुम्ही दूध घेतला तर त्यावेळी तुम्हाला ब्रेकफास्ट हा करायला नको. म्हणजे सकाळची जी न्याहारी असते ना ती त्यावेळी तुम्हाला करायला नको.

कारण दूध हे संपूर्ण अन्न समजलं जातं आणि जर तुम्ही ब्रेकफास्ट करत असाल तर तुम्ही दुध हे नको घ्यायला आणि जर तुम्ही ब्रेकफास्ट करणार असाल तर तुम्ही दूध घ्या. म्हणजे मी जे सांगितलेले फायदे आहे ते तुम्हाला मिळतील तसेच दुपारच्या वेळेला सुद्धा जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल तर तुम्ही दुपारचं जेवण करू नका फक्त तुम्ही दूध घ्या.

मंग तुम्हाला दुपारी सांगितले जे फायदे आहेत ते तुम्हाला मिळतील. तसंच रात्रीच्या वेळेला सुद्धा सेम तसेच करायचा आहे रात्रीच्या वेळेला जेवण घ्यायचं नाही रात्रीच्या वेळेला जर तुम्हाला त्याचे फायदे घ्यायचे असतील दुधाची फायदे घ्यायचे असतील तर जेवण करू नका. फक्त दूध घ्या असं केल्याने त्या दुधाचे ते ते फायदे तुम्हाला मिळत जाणार आहेत.

आणि या ठिकाणी आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते की रात्रीच्या वेळेला शक्यतो गाईचं च दूध घ्या म्हशीचं दूध देऊ नका जर तुम्हाला झोपायला काही त्रास असेल तर च तुम्ही म्हशीचे दूध घ्या नाहीतर म्हशीचं दूध घेऊ नका.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.