देवघरात ही एक चूक कधीच करू नका लगेच पहा तुम्ही ही चूक करत असाल तर बदल करा

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ


आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व आहे. घर लहान असो की मोठे परंतु प्रत्येकाच्या घरात देवघर हे असतेच. आणि संपूर्ण घरातील ही एक अशी जागा असते ही सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. संपूर्ण घरातील सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा ही देव घरातच असते.

काही व्यक्ती देवघर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव जाणवतो. देवघर बनवताना नेहमीच वास्तुशास्त्राप्रमाणे बनवावे. देवघर बनवताना जर आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले. तर तुम्ही नक्कीच सुखी आणि संपन्न होऊ शकता.

चला तर जाणून घेऊया देवघर कसे असावे व देवघरात कोणत्या चुका करू नये ते. देवघर हे नेहमी उत्तर-पूर्व कोणात म्हणजे ईशान्य दिशेला असावे. देव घरात एकाच देवाची एकच मूर्ती किंवा एकच फोटो असावा देवघरात एका देवाचे एक पेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो नसावेत. वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात.

फक्त देवी-देवतांचे फोटो किंवा मूर्ती असावी देवी-देवतांना बरोबरच घरातील एखादी गुरु पूर्वज यांचे फोटो किंवा गोष्टी ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. देवघर कधीही जिन्याखाली असू नये. ज्यांचे देवघर जिन्याच्या पायऱ्या खाली असते त्या घरात दारिद्र्य प्रवेश करते. अशा घरात नेहमी भांडण तंटे व वाद विवाद होत राहतात.

तसेच देवी देवता ही अशा घरात कधीच वास्तव्य करत नाहीत देवघर कधी दक्षिण दिशेला असू नये. कारण दक्षिण दिशा मध्ये नकारात्मक ऊर्जेचे अधिक वास्तव्य असते. आणि जर आपण या दिशेला देवघर ठेवले तर आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. आपल्या पूर्वजांचे फोटो पीत्रांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावेत

कारण ही दिशा पीत्रांची व यम देवांची दिशा आहे. जे पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी अगदी योग्य आहे. जर इतर कोणत्या दिशेला आपल्या पितरांचे फोटो लावले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. कोणत्याही देवी-देवतांचे फोटो भिंतीला टेकून लावू नयेत. यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.

देवांच्या फोटोमध्ये व भीती मध्ये थोडीशी जागा असावी. बहुतेक व्यक्तींना देवघरा वर काहीही सामान किंवा पुस्तके किंवा देव पूजेचे सामान अगरबत्ती कापूर इत्यादी दिवे ठेवण्याची सवय असते. परंतु ज्या देवांच्या डोक्यावर भार असतो त्यांच्या डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर राहतो. अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होते व घरातून निघून जाते.

आणि अशी व्यक्ती नेहमी कर्जबाजारी राहते. म्हणून तुमच्याही देव घरावर काही सामान असेल तर ते लगेच काढून टाका. अगदी साधी काडीपेटी देखील देवघरा वर ठेवू नये. देवकर कधीही बेडरूम मध्ये असू नये. जागा नसेल तर देवघर तुम्ही किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी करू शकता. परंतु बेडरूममध्ये देवघर कधीही असू नये. यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज होते.

ज्यांच्या बेडरूम मध्ये देवघर असते अशा व्यक्तींची आर्थिक प्रगती कधीच होत नाही. ते दरिद्रीच राहतात तुमचे देवघर म्हणून एखादी वेगळी खोली काढलेली असेल तर. त्या खोलीचा रंग पांढरा निळा किंवा काळा असू नये. शक्यतो देवघराला पिवळा ऑरेंज लाल रंग द्यावेत. देवघरात कधीही निर्माल्य जमा करून ठेवू नये ते लगेचच्या लगेच बाहेर काढावेत.

काही व्यक्तींच्या घरी निर्मल यासाठी एक वेगळी पिशवी ठेवलेली असते. त्यातच वाळलेली फुले धूप अगरबत्ती रिकामे काडेपेटी संपलेली धूप डबी तुपाचे डबे असे सर्व सामान काढून देवघराजवळ पिशवीतच ठेवले जाते. परंतु अशा निर्माल्या मुळे आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरते व देवीदेवतांच्या पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होत नाही.

म्हणून अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू देवघराजवळ किंवा घरात कोठेही जमा करून ठेवू नयेत. त्यांचे लगेचच विसर्जन करावे अशाप्रकारे देवघराची व्यवस्थित काळजी घेऊन तुम्ही तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकता. व सर्व देवी-देवतांचा कृपा आशीर्वाद मिळू शकता.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.