नशीब साथ देत नसेल तर दही साखरेचा हा टोटका नक्की करून पहा भाग्योदय होईल नशीब साथ देऊ लागेल

मित्रांनो आज आपण भाग्योदय करणारे काही अचूक उपाय पाहणार आहोत भाग्य म्हणजे नशीब बरेचदा आपले नशीब आपल्याला साथ देत नाही आणि नशिबाची साथ न मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे समस्या निर्माण होतात. नशिबाची साथ जर हवी असेल तर मित्रांनो काही अतयंत प्रभावशाली उपाय ज्योतिशास्त्र मध्ये आहेत.

हे उपाय केल्यास नशिबाची साथ मिळू लागते प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं घरामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी चा वास निर्माण होऊ लागतो. जाणून घेऊया की ज्योतिषशास्त्रात भाग्योदय करणारे कोणते अचूक उपाय लिहिलेले आहेत मित्रांनो हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार भाग्योदय करणारा पहिला अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे दररोज नित्यनेमाने.

ओम गं गणपतये नमः ओम गण गणपतये नमः ह्या मंत्राचा अधिकाधिक जाप केला तर आपल्या घरात आपल्या जीवनात सुख-समृद्धी वाळू लागते. आपलं भाग्य प्रबळ बनत भगवान श्रीगणेशांना गणपती बाप्पांना प्रसन्न करणारा हा मंत्र आणि श्री गणेश 64 कलांचे अधिपती देवता आहेत देवतांमध्ये प्रथमेष आहेत सर्व प्रकारची विघन हरणारे आणि सुख प्रदान करणारे आहेत.

आणि त्यांचे मंत्राचा जप दररोज केल्यास भाग्योदय अवश्य होतो. दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या महत्वाचे कामासाठी बाहेर जातात तेव्हा बाहेर पडताना जी व्यक्ती ही काम करण्यासाठी जात आहे त्या व्यक्तीच्या हातावर दही आणि साखर अवश्य ठेवा त्या व्यक्तीला ती खाऊ घाला त्या कामामध्ये यश नक्की मिळत.

प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा महत्त्वाचा काम असेल ह्या नियमाचा पालन करत चला आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे एखादा सण आहे एखाद्या उत्सव आहे मंगल कार्य आहे अशा प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी आपल्या मुख्य दरवाजासमोर रांगोळी अवश्य काढा आपला उंबरठा आपल्या घराचा मुख्य द्वार स्वच्छ आणि सुंदर ठेवा.

काही मंगल चिंन्ह आपण त्या ठिकाणी रेखा ठेऊ शकता शुभ लाभ असेल स्वस्तिक असेल ओम असेल अशाप्रकारचे मंगल चिन्हांनी आपला दरवाजा आपल्या घराची मुख्य चौकट सजवा जेणेकरून माता लक्ष्मी चा आगमन आपल्या घरात होईल. आपल्या घरात जर सर्व देवी-देवतांना आमंत्रित करायचा असेल तर अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय हे आपल्याला मदत करतात.

आणि ह्यातूनच भाग्योदय होत असतो आपला नशीब प्रबळ बनत असतं. मित्रांनो आजून एक गोष्ट ज्यांचे जीवनामध्ये गरिबी आहे पैसा येत नाही अशा लोकांनी दर शुक्रवारी शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मी चा आहे. आणि लक्ष्मीला जर प्रसन्न करायचा असेल घरात जर लक्ष्मीचा स्थायी वास निर्माण करायचा असेल तर दर शुक्रवारी आपण श्रीसुक्ता चा पाठ नियमित करा.

श्रद्धापूर्वक करा श्री सुक्ता चा पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीची असीम कृपा बरसू लागते. आपण माता लक्ष्मीची पूजा केल्यानंतर श्री सुक्ताचा पाठ केला तर अति उत्तम आहे मात्र अशा अनेक लोकांना दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करणे शक्य होत नाही अशा लोकांनी केवळ श्रीसुक्ता चा पाठ केला तरी सुद्धा लक्ष्मिकृपा नक्की बरसते.

एखादी खूप मोठी आर्थिक समस्या असेल तुमच्यावरती कर्ज आहे किंवा अगदी कोणत्याही प्रकारची आर्थिक म्हणजे पैशांची समस्या असेल आणि ति समस्यातुन कशा सुटाव असा जर मोठा प्रश्न पडला असेल तर पाच सलग गुरुवार आपण एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सौभाग्य सामाग्री दान करा. जी विवाहित आहे सौभाग्यवती आहे अशा स्त्रीला पाच गुरुवार जर आपण सौभाग्य सामग्री जी असते.

जे सोळा शृंगाराचा साहित्य असतं ते जर दान केलं तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनातुन आर्थिक समस्यांपासून सुटका मिळतो अवश्य करून पहा. दररोज जेंव्हा आपण आपल्या घरातली फरशी पाण्याने पुसून काढतो त्या पाण्यामध्ये जर आपण जे बाजारामध्ये मोठे मिठ मिळते असे मोठे मीठ टाकून जर आपण आपल्या घरातली अंगणातील फरशी स्वच्छ केली साफ केली पोछा जर मारलं.

तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जेचा रास होतो. अनेकदा आपल्या घरामध्ये वेगवेगळे लोक येत असतात बाहेरचे लोक येतात त्यांचे सोबत किंव्हा आपल्या सोबत सुद्धा जेव्हा आपण बाहेरून आपल्या घरात येतो आपल्या सोबत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी येत असते.

आणि जशी जशी ही नेगेटिव एनर्जी आपल्या घरात साठत जाते वाढते तसेच आपल्या घरामध्ये आपल्या नशिबावर आपल्या भाग्यावर तिचा ठेट प्रभाव पडत असतो आपलं भाग्य कमजोर बनत आणि म्हणून भाग्योदय होण्यासाठी घरातून नकारात्मक ऊर्जेला बाहेर काढणं हे अत्यंत महत्वाचा असत.

आणि हे काम अशाप्रकारे मीठ युक्तत जलाने म्हणजेच मीठ टाकलेले पाण्याने जो पोछा आपण मारतो त्यामुळे आपल्या घरात आपल्या अंगणात शांतीचा मार्ग प्रशस्त होतो सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते. मित्रांनो पौर्णिमा तिथी एक अत्यंत महत्वपूर्ण उपाय मी या ठिकाणी सांगतोय लक्षात ठेवा जी पौर्णिमा तिथी असते सर्व तिथीं मध्ये माता लक्ष्मीना जर सर्वात प्रिय तिथी कोणती असेल सर्वात प्रिय तिथी म्हणजे पौर्णिमा तिथी.

आणि ह्या पोर्णिमा तिथीला जर मनोभावे आपण पिंपळाचे वृक्षावरती तांब्या भर जल अर्पण करा आणि माता लक्ष्मी ना आपल्या घरी येण्याची प्रार्थना करा. पौर्णिमा तिथीस ह्या मनोभावे पिंपळाच्या वृक्षावर तांब्याभर जल अर्पण करा आणि माता लक्ष्मी ला आपल्या घरी येण्याची प्रार्थना नक्की करा पौर्णिमा तिथीस ह्या पिंपळाचे वृक्षावर माता लक्ष्मी चा आगमन होतो.

आणि अशावेळी जी व्यक्ती आर्थिक समस्यांनी त्रस्त असते आर्थिक पैशांची तंगी आहे डोक्यावर प्रचंड कर्ज आहे किंवा उधारी घेतली मात्र उधारी चुकवता येत नाही उधारी जी दिली होती ती परत मिळत नाहीये कोणत्याही प्रकार चा आर्थिक समस्यांनी जर आपण त्रस्त असाल तर अशावेळी पिंपळाचे झाडा सोबतच आपण माता लक्ष्मी ची उपासना करा.

आणि त्यांना आपले घरी येण्याचा आमंत्रण द्या मोठ्यात मोठ्या आर्थिक समस्या माता लक्ष्मीची कृपेने नक्की दूर होतात. मित्रांनो तुमच्या घरा मध्ये जर स्फटिकाचा श्रीयंत्र आपण ठेवला असेल श्रीयंत्र अनेक प्रकारचे असतात त्यातील जर स्फटिकाचा श्रीयंत्र तुमच्या पूजा करण्याचे ठिकाणी असेल किंवा तुम्ही जर ते तिजोरीमध्ये ठेवलेलं असेल तर एक कमल गटयांची माळ अवश्य खरेदी करा.

कमल गट्टा म्हणजे कमळाच्या बिया त्याची माळ मिळते तर अशा कमल गटाच्या बियांची माळ कमलगट्टा ची माळ जर आपण ह्या स्फटिक श्रीयंत्रा वर अर्पण केलेत तर मित्रांनो हे श्रीयंत्र चैतन्यमय होतो. अनेकदा हे श्रीयंत्र ठेऊन सुद्धा फायदे होत नाहीत आणि चुका आपल्या हातून होत असतात अशावेळी हा छोटासा उपाय ही कमलगट्टे ची माळ स्फटिक यंत्रावर जर आपण अर्पण केली तर ही श्रीयंत्र चैतन्यमय होऊन जाते आणि माता लक्ष्मीची कृपा बरसू लागते.

मित्रांनो अशा प्रकारचे अनेक उपाय आपण भाग्योदय करण्यासाठी करू शकतो अजूनही हजारो उपाय आहे जे आपण जर मनोभावे केले तर त्याचा रिझल्ट नक्की मिळतो.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.