निर्जला एकादशी गुपचूप ठेवा इथे तुळशीची दोन पाने आरोग्य पैसा सुख सर्व काही मिळेल

ज्येष्ठ पक्षातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला निर्जला एकादशी म्हणतात. चांगल्या आरोग्यासाठी,सुखी जीवनासाठी आणि इच्छांची पूर्ती करण्यासाठी निर्जला एकादशीचे व्रत केलं जातं. सोबतच या एकादशीस अनेक उपाय आणि टोटके सुध्दा केले जातात. जाणून घेऊया निर्जला एकादशीचे व्रत कास करावं आणि कोणकोणते उपाय करावेत.

निर्जला एकादशीचे व्रत अनेक लोक पाण्याशिवाय करतात. पाण्याचा एक थेंबही ते ग्रहण करीत नाहीत. मात्र आपणांस हे शक्य नसेल तर आपण पाणी पिऊन किंवा जे जलीय पदार्थ असतात जसे की रसदार फळे असतील, फळांचे रस असेल यांचे सेवन या एकादशी दिवशी करू शकता आणि हे व्रत पूर्ण करू शकता.

अशी मान्यता आहे की, हे व्रत करणाऱ्यास धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारही पुरूषार्थांची प्राप्ती होते. चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी, जीवनामध्ये सुखाची प्राप्ती करण्यासाठी आपण अत्यंत उपयुक्त असे उपाय नक्की करून पहा. जसं की चांगल्या आरोग्यासाठी, मानसिक समस्या दूर करण्यासाठी आपण या निर्जला एकादशीचा उपवास करा.

दिवसभर आणि रात्रभर केवळ जलयुक्त आहार घ्या. जास्तीत जास्त शक्य असेल तितकी आपण आपल्या इष्टदेवांची आराधना करा किंवा भगवान श्री विष्णूंची उपासना करा. विशेषकरून रात्रीच्या वेळी बहुमान श्रीहरी मंत्रांचा केलेला जप अत्यंत प्रभावी असतो. ||ॐ नमो भगवते वासुदेवाय|| ॐ नमो नारायणा अशाप्रकारचा मंत्रांचा जप आपण करू शकता.

या निर्जला एकादशीस आपण कमीत कमी बोला आणि आपल्या वाणीवरती संयम ठेवा. कोणावरही रागवू नका, क्रोध करू नका. ज्यांना धनप्राप्तीची इच्छा आहे, घरात संपन्नता यावी, बरकत यावी अशी ज्यांची मनोकामना आहे अशा लोकांनी धनप्राप्तीसाठी, संपन्नेसाठी या निर्जला एकादशीचा उपवास करा. भगवान श्रीहरी विष्णू सोबत माता लक्ष्मीचीही मनोभावे पूजा करा.

या दिवशी गजेंद्र मोक्षाचा पाठ करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते किंवा आपण विष्णू सहस्त्र नामाचा पाठही करू शकता आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आपण श्री विष्णूंना नैवैद्य अर्पण करू, त्या नैवैद्यावर दोन तुलसीपत्र पालथी घालण्यास विसरू नका.

मात्र एकादशी तिथी आहे म्हणून या दिवशी चुकूनही तुळशीस स्पर्श करायचा नाही किंवा तुळशीची पाने तोडायची नाहीत. यापूर्वी जी पाने वापरलेली असतील ती पाने पुन्हा एकदा धुवून आपण त्यांचा पुनर्वापर करू शकता किंवा तुळशीच्या झाडाखाली जी पाने पडलेली आहेत ती पाने स्वच्छ धुवून, जरी ती पिकलेली असतील, सुकलेली असतील तरीसुद्धा त्यांचा पुनर्वापर आपल्याला करता येतो.

विशेषकरून मध्यरात्री आपण संपन्नतेच्या प्राप्तीची प्रार्थना भगवा श्रीहरी आणि माता लक्ष्मीच्या चरणी अवश्य करा. धनप्राप्ती होऊ लागते, पैसा येऊ लागतो. अनेक लोकांच्या घरात सातत्याने भांडणे होतात, कटकटी असतात, अशावेळी मनःशांती साठी, मनाच्या शुद्धीसाठी आपण या एकादशीचे व्रत करा. भगवान श्रीहरींचा मंत्रांचा जप करा, ध्यान करा. एकांतामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. प्रार्थना करा.

आणि जर आपण ओमकाराचा पाठ केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती नांदू लागते, भांडणे कमी होतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.