आपला हिंदू धर्म अतिशय सुंदर आहे आपल्या भारत देशात खूप सणवार असतात चार महिने चातुर्मासात तर विचारायलाच नको आणि सण म्हटल्यावर पुरण वरणाचे जेवण हे आलेच. कारण देवाला आपण नैवेद्य दाखवतो आणि देव हे आपल्याला आशीर्वाद देतात पण कधी विचार केलाय का की आपण देवाला पुरणावरणाचा नैवेद्य का दाखवतो.
पुरणपोळीच का ठेवतो याबद्दल एक खूप सुंदर कथा आपल्या शास्त्रांमध्ये आहे. पूर्वीच्या काळी आत्तरी ऋषी आणि अनसुया माता हे दोघेजण कैलास पर्वतावर महादेवांकडे निघाले होते महादेवाला व पार्वतीला जेवणाचे आमंत्रण देण्यासाठी महादेव आणि त्या दोघांचीही स्वागत केले.
घरामध्ये गजानन गणपती होते बोलता बोलता आत्तरी ऋषी म्हणाले येताना गजानन गणपतीलाही घेऊन या पण पार्वती मातेला माहीत होतं की गणपतीची भूक कधीही शांत होत नाही. म्हणून पार्वतीमाता आत्तरी ऋषीला म्हणाली आम्ही दोघेजण तुमच्याकडे नक्कीच जेवायला येऊ पण गणेशाला राहू द्या पण ऋषी म्हणतात नाही पार्वती माते गणेशाला सुद्धा आणावं लागेल त्यांनी खूप आग्रह केला.
त्यानंतर महादेव पार्वती आणि गजानन गणपती हे तिघेही आत्तरी ऋषींकडे जेवायला आले पण पार्वती मातेला खूप काळजी लागली होती आत्तरी ऋषिंनी या तिघांचीही पाठ्य पूजा केली आणि त्यांना जेवायला बसवलं. गजानन गणपतीचं जेवण तर अतिशय आनंदात चाललेला असतं जेवताना गणेश म्हणू लागले की.
आजचा स्वयंपाक किती सुंदर झालाय ग त्यानंतर पार्वती व महादेवांचे जेवण झाले पण गणपतीचे जेवण काही होईना. मग पार्वतीमाता गणपतीला खुणावू लागली पण त्याकडे गणपतीचे लक्षच नव्हते पार्वतीने गजाननाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला घरामध्ये अनसूयेला चिंता आणि काळजी वाटू लागली.
कारण केलेला सगळा स्वयंपाक संपलेला होता पण तरीही गणपतीची थांबण्याची काही चिन्ह दिसेनात नंतर अनसूयेने कणकेचा गोळा घेतला आणि त्यामध्ये पुरण भरले आणि तो गोळा आणून गणपतीसमोर ठेवते. आणि म्हणते हे गजानना मी माझ्याकडे जे सर्व होते ते पूर्ण श्रद्धायुक्त तुझ्याकडे आणले आहे.
याचा तुम्ही स्वीकार करावा गणपतीने तो गोळा घेतला आणि खाल्ला व ते त्या ठिकाणी लगेच तृप्त झाले. म्हणून त्या पदार्थाला पुरण असे म्हणतात पूर्ण या शब्दाची फोड केल्यावर याचा पुरण असा शब्द होतो अनसूयेने श्रद्धा आणि ममतेच्या बंधनात गजाननाला बंदिस्त केलं. त्या दिवसापासून अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पुरणाचे मोदक करून नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे.
आणि त्याच दिवसापासून आपल्या नैवेद्यात ही पुरणाची पोळी आलेली आहे. आपण पहिला मान नेहमी गणपतीला देतो आणि म्हणूनच हिंदू धर्मात पुरणपोळीचे जास्त महत्त्व आहे प्रत्येक सणाच्या व गोष्टीच्या पाठीमागे काही ना काही कारण नक्कीच असतं हा हिंदूधर्म अतिशय सुंदर आहे.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.