पूजेचे नारळ जर खराब निघाली तर याचा अर्थ काय रहस्य काय मनोकामना इच्छा पूर्ण होतील की नाही

हिंदू धर्मात नारळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही नारळाला शुभ फळ मानले जाते प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो नारळाला लक्ष्मीदेवीचे प्रतीक मानतात प्रत्येक पूजेचे नारळ असणे खूप आवश्यक आहे यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते तीर्थस्थानी जरी आपण गेलो तरी प्रथम नारळ घेऊन फोडला जातो तो नारळ भगवंतांना देऊन आपणही खोबर्‍याचा प्रसाद घेतो

नवरात्रीत ही देवीला प्रसाद म्हणून नारळ वाहिले जातात तसेच गणपतीच्या देवळात सर्व शक्ती स्वरूप देवीच्या देवळात नारळ वाढवले जाते पण जर आपण नारळ फोडले आणि त्यातून खराब निघाले तर आपल्याला खूप वाईट वाटते आपल्या मनात असे येते की देवी-देवता आपल्यावर नाराज झाले आहेत म्हणूनच नारळ खराब निघाले व आपल्या बरोबर आता काहीतरी अनुचित घटना घडणार आहे

नारळ खराब निघाले तर त्याचे काय शुभ-अशुभ परिणाम होतात हे जाणून घेऊया जर तुमच्या पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या सोबत काहीतरी वाईट घडणार आहे तुमच्या पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ तुमच्यासोबत काहीतरी शुभ घडणार आहे पूजेचे नारळ खराब निघणे शुभ असते शास्त्रांमध्ये सांगितले जाते की देव याद्वारे काहीतरी संकेत देत असतात

जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टी बद्दल काही माहित नसते तेव्हा त्याबद्दल आपण मनात वेगळाच भ्रम निर्माण करून घेतो अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनात खूप मोठा प्रभाव पाडतात जेव्हा पूजेचे नारळ खराब निघते तेव्हा आपल्याला दुकानदाराचाही राग येतो आपण त्याच्याशी भांडायला ही जातो मात्र तेव्हा दुकानदार सांगतो की देव तुम्हाला पावला आहे

मात्र तेव्हा आपल्या काही लक्षात येत नाही परंतु याच्यापुढे तुमचे नारळ खराब निघाल्यास तुमचे नारळ खराब निघाल्यास तुम्हाला राग येणार नाही तर आनंद होईल पूजेचे नारळ खराब निघाले तर याचा अर्थ असा होतो कि देवाने आपला प्रसाद स्वतःखाल्ला आहे म्हणूनच नारळ खराब निघते म्हणजे ते दुसरे कुणीही खाऊ शकणार नाही ते संपूर्ण नारळ भगवंतांना अर्पण करण्यात येते

याबरोबरच याचा अर्थ असा देखील होतो की तुमची इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे यापुढे जर तुमच्या पूजेचे नारळ खराब निघाले तर तुम्ही दुखी होऊ नका तर आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झाले आहेत व त्यावेळी तुम्ही मला जी इच्छा आणाल ती इच्छा लवकरच पूर्ण होईल जर आपण नारळ फोडले आणि ते चांगले निघाले तर काय करावे त्यातले खोबरे काढून सर्वांना थोडा थोडा प्रसाद वाटावा यामुळे आपल्याला आपल्या पूजेचे पूर्ण फळ मिळते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.