फुफ्फुस हा आपल्या शरीराचा अविभाज्य घटक आहे. म्हणूनच फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आज मी छोट्या छोट्या परंतु महत्वपुर्ण टिप्स घेऊन आले आहे. की ज्यामुळे फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. फुफ्फुस हा शरीराचा महत्वाचा भाग फुफ्फुस निरोगी नसल्यावर अनेक आजार उदभवतात.
दमा, निमोनिया, क्षयरोग, फुफ्फुसंस रोग. कर्करोग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे. म्हणूनच फुफ्फुुसांची काळजी घेने हे खूप महत्वाचे आहे. म्हणून आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून आपण फुफ्फुसांना सहजतेने निरोगी ठेऊ शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या गोष्टी.
फुफ्फुसांचे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी हे खूप महत्वपूर्ण आहे. व्हिटॅमिन सी युक्त फळे म्हणजेच संत्री लिंबू टम्याटो किंवा आंबा देखील या मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहाराच सेवन केल्यामुळे शरीरातील विशारी पदार्थ हे अगदी सहजतेने बाहेर पडतात.
आणि जर व्हिटॅमिन सी चा आहारात समावेश असेल तर शरीरात अँटी ऑक्सिडंट भरपुर प्रमाणात असतात जी श्वास घेतल्यावर ऑक्सिजन सेव अवयवांमध्ये पोहचवण्याचे काम करतात. म्हणूनच आहारामध्ये संत्री, टम्याटो, लिंबू, स्ट्रॉबेरी, द्राक्षे, अननस व आंबा यांसारख्या फळांचा समावेश असुद्या. यामुळे फुफ्फुसांची ताकद वाढेल.
तसेच लसूण देखील यावर खूप फायदेशीर ठरतो. लसणाचे सेवन केल्याने कप दूर होतो. जेवणानंतर जर तुम्ही लसूण खाल्ले तर यामुळे छाती स्वच्छ होते आणि जर सकाळी अनाशा पोटी खाल्ले तर यामुळे ब्लॉकेज देखील निकघून जातात व पोट देखील स्वच्छ राहते. लसनात अँटी ऑक्सिडंट असतात जे संसर्गा विरुद्ध लढतात.
व शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास यामुळे मदत होते. तसेच लायकोपीन समृद्ध आहाराचे सेवन अन्नात असे आहार घ्यावा जे लायकोपीन समृद्ध असावे. जसे गाजर, टम्याटो, पपई, टरबूज, बिटरूट, हिरव्या पालेभाज्या या आहारात केरोटीनाईड अँटी ऑक्सिडंट असते जे दम्यापासून बचाव करण्यास खूप फायदेशीर ठरतात.
व हे खाल्यामुळे फुफ्फुसांची ताकद देखील वाढते. तसेच या पदार्थांचे जर तुम्ही सेवन केले तर यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका देखील कमी होतो. तसेच काळे मनुके देखील यावर खूप उपयुक्त आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या मुठीत बसतील इतके काळे मनुके एका पत्रामध्ये भिजत ठेवा व ही मनुके सकाळी अनाशा पोटी जर तुम्ही चावून चावून खाल्ली तर यामुळे फुफ्फुसे बळकट होतात.
व रोग प्रतिकारशक्ती देखील भरपूर प्रमाणात वाढते व तुळशीची पाने तुळशीची पाने हीतर आपल्या आरोग्यासाठी वरदान ठरली आहे. फुफ्फुसांमध्ये कप साचला असल्यास कप काढण्यासाठी तुळशीचे कोरडे पान कात कपूर वेलची समप्रमाणात मिसळून घ्या आणि या मिश्रणाच्या 9 पटीने खडीसाखरेची पावडर करून यामध्ये मिक्स करा.
हे मिश्रण तुम्ही दिवसातून 2 वेळेस जरी खाल्ले तरी देखील फुफ्फुसांमध्ये जमा झालेला छातीत जमा झालेले कप अगदी सहजतेने पूर्णपणे निघून जाण्यास यामुळे मदत होते. हा खूप प्रभावी उपाय आहे नक्कीच करा नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होतो. ऑक्सिजन लेवल वाढवण्यासाठी देखील तुळशीचा उपयोग केला जातो.
यासाठी तुळशीच्या पाचही अंगांचा कडा देखील महत्वपूर्ण ठरतो. तुळशीची 5 अंगे म्हणजेच तुळशीच्या ओल्या मंजिरा, तुळशीच्या सुख्या मंजिरा, तुळशीची पाने, तुळशीची साल व तुळशीचे मूळ अशी ही तुळशीची 5 अंगे खूप महत्वपुर्ण आहेत. तर आहे काडा पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील भरपूर प्रमाणात वाढते व फुफ्फुसांना देखील यामुळे ताकद मिळते. आहे की नाही उपयुक्त आशा टिप्स.