फॅट कमी करण्यासाठी दिवसभराचा डायट प्लॅन

वजन कमी करण्यासाठी बरेच जण डायट प्लॅन फॉलो करतात बऱ्याच जणांना वजन कमी करण्याबरोबरच फॅट देखील कमी करायचे असते म्हणजेच जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती काही जणांना वजन कमी करायचे असते तर काही जणांना फॅट कमी करायचे असते. बऱ्याच वेळेला असे होते की शरीराच्या एका ठराविक भागावर चरबी किंवा फॅट हे अतिरिक्त प्रमाणावर जमा होतं.

आणि हे जास्त करून स्त्रियांमध्ये होतं ते पण डिलेवरीनंतर जास्त करून पोटावर चरबी राहते म्हणजेच जनरली थाईस आणि हिप्स यावर बऱ्याच वेळेला फॅट जमा होते. बऱ्याच जणांना आम फॅट असते तर पुरुषांमध्ये जे फॅट जमा होतं ते जनरली पोटावर असतं म्हणजेच अॅपडोमीनल ओबेसिटी हे जे फॅट जमा होण्याचे प्रकार किंवा फॅट जमा होण्याची कारणे वजन कमी करताना.

फॅट कमी होतेच असे नाही काही लोकांमध्ये वजन कमी होते. पण फॅट कमी होत नाही आणि काही लोकांमध्ये फॅट कमी होते पण वजन कमी होत नाही आज आपण स्पेशली फॅट बर्न होण्यासाठीचा डायट प्लॅन जाणून घेऊया लॉकडॉनमुळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आपण बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम करतो आणि बसल्यामुळे लोअर बॉडी ही जास्त वाढते.

सतत बसल्यामुळे वर्क फ्रॉम होम असल्यामुळे ही समस्या सध्या खूपच वाढते त्यामुळे हा डायट प्लॅन नक्की फॉलो करा याचा नक्कीच चांगला रिझल्ट मिळेल या डायट प्लॅनमध्ये तुम्हाला पाण्याचे प्रमाण जास्त ठेवायचे आहे पाणी हे एक मात्र डिटॉक्स ड्रिंक आहे जे फॅट बर्न करायला फायदेशीर ठरते. दिवसाची सुरुवात करताना एक कप पाणी गरम करायला ठेवून त्यात चिमूटभर हळद व चिमूटभर ओवा घालून हे उकळून थोडावेळ झाकून ठेवायचे आहे.

नंतर हे गाळून पिऊन घ्यायचे आहे दिवसाची सुरुवात या ड्रिंकने करायची आहे याचा सर्वात मोठा उपयोग होतो तो म्हणजे हळद ही शरीरावरचे सगळी सूज कमी करायला मदत करते. तसेच ओवा हा फॅट कटर म्हणून ओळखला जातो म्हणून ओवा हळद आणि गरम पाणी हे इतकं इफेक्टीव ड्रिंक आहे की याचा तुम्हाला नक्की फरक जाणवेल या प्लॅनमध्ये चहा कॉफीचे सेवन अजिबात करायचे नाही चहामुळे फॅट जमा होणे आणि मेटाबोलिजमचे स्लो होण्याचे प्रमाण जास्त वाढते.

चहा-कॉफी ऐवजी तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता काढा घेऊ शकता गरम पाणी घेऊ शकता साखर न घालता लिंबू पाणी घेऊ शकता ताक घेऊ शकता पण चहा कॉफी घ्यायचे नाही सकाळचं हे ड्रिंक झाल्यानंतर नाश्त्यामध्ये तुम्हाला एक कप दूध हे दूध साय काढलेला असावे तापवलेल असावे. आणि शक्यतो गाईचे दूध असावे गाईच्या दुधामध्ये फॅट्स कमी असतात फुल्ल फॅट दूध असू नये एक कप दूध घेऊन त्यात एक चमचा प्रोटीन पावडर घालायची आहे.

आणि हे दूध तुम्हाला नाश्त्याला घ्यायचे आहे याच बरोबर तुम्ही एखाद खजूर किंवा सुकलेले अंजीर देखील खाऊ शकता. यापुढे लंचला दोन छोटे फुलके फुलका म्हणजे न घडी घातलेली पोळी किंवा तेल न लावलेली पोळी या पोळीची साईज खूप मोठी नसावी फुलका हा पचायला हलका असतो आणि शक्य असेल तर हे फुलके मल्टीग्रेन असावे म्हणजेच दोन तीन पीठ एकत्र करून केलेले असावे.

यामध्ये तुम्ही थोडेसे गहू ज्वारी बाजरी किंवा सोयाबीनचे पीठ मिक्स करू शकता किंवा बाजारात जे मल्टीग्रेन पीठ मिळते तेही तुम्ही वापरू शकता आणि शक्यतो त्या पिठाचे फुलके करा त्यानंतर दोन फुलके व एक वाटी दही आणि घरी बनवलेली कोणतीही भाजी हे तुमचं दुपारचं जेवण असेल. आणि दुपारच्या जेवणाची सुरुवात ही तुम्हाला एक वाटी सॅलेडने करायची आहे एक टोमॅटो आणि अर्धी काकडी हे तुम्हाला सॅलेड म्हणून खायचे आहे.

वरून तुम्ही थोडेसे सेंधव मीठ किंवा काळीमिरी पूड टाकू शकता हे खाऊनच तुम्हाला लंच करायचा आहे हे झाल्यानंतर दुपारच्या वेळेत ग्रीन टी हे ऑप्शनल आहे. ग्रीन टी हे अँटिऑक्सिडंट असल्यामुळे याचा खूप चांगला फायदा होतो आपल्याला बसल्या बसल्या काही ना काही तोंडात टाकायची सवय असते तर ग्रीन टी हे मंचींग म्हणजे एक्स्ट्रा खाण्याची सवय कमी करते भूक नॅचरली कमी होते आणि यामुळे फॅट लवकर बर्न होतात.

त्यामुळे ग्रीन टी तुम्ही दिवसातून दोन वेळा किंवा तीन वेळा देखील घेऊ शकता संध्याकाळी एक वाटी पपई किंवा कलिंगड खायचे आहे रात्री साडेसात ते आठ या दरम्यान तुमचे जेवण असायला हवे यामध्ये तुम्हाला एक मल्टीग्रेन पिठाचा फुलका एक वाटी डाळ म्हणजेच आमटी. यामध्ये मेथी किंवा पालक यापैकी कोणतीही पालेभाजी घालायची आहे पालेभाजी रात्री कंपल्सरी आहे आणि एक ग्लास भरून ताक तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मल्टीग्रेन पेठ मेथी किंवा पालक हे मिक्स करून एक मध्यम थालीपीठ करून ते दहीसोबत खाऊ शकता.

सॅलेड ही भरपूर खाऊ शकता फायबर्स भरपूर जातात आणि पालेभाजीमुळे भूक लागत नाही रात्री झोपताना एक कप ग्रीन टी घ्यायचे आहे ज्यांना ग्रीन टी घ्यायचा नसेल त्यांनी एक कप गरम पाणी पिले तरी चालेल या सगळ्या डायट प्लॅनमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर ठेवा. ताक साखर न घालता कोकम पाणी किंवा शहाळ म्हणजेच नारळ पाणी या सगळ्या प्लॅनमुळे फॅट लवकरात लवकर बर्न व्हायला मदत होते.

आणि या सगळ्या बरोबरच घरच्या घरी पंचेचाळीस ते पन्नास मिनिटे चाला एका तासापेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी बसू नका. एकाच जागी बसल्यामुळे फॅट त्या जागी सॅच्युरेट होतं आणि याचा परिणाम वजन किंवा फॅटवर होतो तर हे डायट प्लॅन नक्की फॉलो करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *