बाळाचे भविष्य लिहिणारी ही सटवाई कोण आहे यामागील काय आहे पौराणिक कथा जाणून घ्या सटवाई बद्दल माहिती

बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये सटवाई ही बाळाचे भविष्य लिहिते असं बुजुर्ग लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असेही म्हणतात यामागील माहिती व पौराणिक कथा जाणून घेऊया सटवाईची पूजा बाथरूममध्ये केली जाते यानंतर एक रिकामा कागद व पेन या पूजेमध्ये ठेवले जाते

सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक हिंदू लोक बाळ जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बाळाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो असे म्हणतात या दिवशी सटवाई कोणत्याही रूपाने येऊन बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिते त्यासाठीच एक कागद व पेन पूजेच्या ठिकाणी ठेवतात याच वेळेस बाळाच्या लगाठीची रेषा आखली जाते

जेव्हा बाळमधूनच झोपेत हसते तेव्हा लोक म्हणतात की सटवाई येऊन बाळाला हसवत आहे सटवाई बद्दलची एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तिने आईला याबाबत विचारले तेव्हा तिने तो विषय टाळला परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते

तू दुसऱ्यांचे भविष्य लिहितेस मग माझे भविष्य काय आहे सटवाई म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीकिनारी पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते

ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे संगोपन व पालन पोषण करतो तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आपल्या आईचे म्हणजेच सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते

दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते ते कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधीही खोटे ठरत नाही असा या कथेचा आश्रय आहे

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *