भाजकी लवंग खाल्ल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.

* भाजलेल्या किंवा भाजक्या लवंगाच सेवन केल्यानं तोंडातील वास उद्भवणाऱ्या जंतांचा नायनाट होतो आणि तोंडाचा वास कायमचा दूर होतो.


* दात दुखत असल्यास लवंग भाजून दातांच्या खाली दाबून ठेवावं आणि हळुवार चावावं. असे केल्यास दात दुखी पासून सुटका मिळेल.

* एखाद्या प्रवासामध्ये किंवा घरात आपल्याला मळमळत असल्यास किंवा उलटी सारखं होत असल्यास भाजकी लवंग चावावी. असे केल्यास आराम मिळेल.


* या मध्ये अँटी-इंफ्लेमेटरी घटक असतात. आपल्याला डोकेदुखीचा त्रास तीव्रतेने होत असल्यास, दोन लवंगा भाजून खाव्यात. या मुळे डोकेदुखी पासून सुटका होते.


* जेवल्यावर भाजकी लवंग चावल्याने ऍसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ दूर होते. दोन लवंगा भाजून खाल्ल्यानं कोरडा खोकला, कफ सारख्या त्रासापासून सुटका मिळतो. या शिवाय घशातील सूज देखील दूर होते

लवंगचे फायदे काय?
१. दाताच्या दुखवण्यावर रामबाण उपाय
 दातांमध्ये होणाऱ्या तीव्र वेदनांना लवंग कमी करण्यात फायदेशीर ठरते. दातदुखीवरही लवंग अत्यंत परिणामकारक ठरते. जर तुम्ही दातदुखीने त्रस्त आहात तर एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा. लगेचच आराम मिळेल. आजकल टुथपेस्तमध्येही लवंग हा घटक असतो. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते.

२. तोंडाची दुर्गंधी दूर करते
जर तुमच्या मुखातून दुर्गंध येत असेल तर लवंग यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. लवंगमध्ये यूजेनॉल असते जे साइनस आणि दातांदुखी सारख्या हेल्थ प्रॉब्लम ठिक करण्यात मदत करते. अनेकदा बोलताना तोंडातून दुर्गंध य़ेतो. दाताच्या काही समस्यांमुळेही दातांमधून वास येऊ शकतो. दाताखाली लवंग ठेवल्याने दुर्गंधी दूर होते शिवाय तुम्हाला फ्रेशही वाटते. 

३. मळमळ थांबण्यासाठी खा लवंग 
प्रवासात किंवा अपचन झाल्यावर मळमळ किंवा उलटीसारखे वाटते. मळमळ किंवा उलटी थांबविण्यासाठी सुद्धा लवंग उत्तम पर्याय आहे. लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर होतं.  गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखा दुसरा पर्याय नाही. 

लवंग ही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे बी विडयाचे पानातील एक घटक आहे

Leave a Reply

Your email address will not be published.