भात खाण्याचे नुकसान जास्त भात खाणार यांनी हे नक्की जाणून घ्या

तांदूळ जास्त खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होतात तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे आज आपण चे तांदूळ खातोय ते राईस मिलमधून पॉलिश होऊन आलेले पांढरे शुभ्र तांदूळ आहे आणि हा पॉलिश केलेला तांदूळच आपल्या शरीरामध्ये अनेक आजार निर्माण करतो. काही वर्षांपूर्वी शेतकरी घरच्या घरी तांदूळ काढायचा तो तांदूळ पॉलिश केलेला नसायचा.

लालसर किंवा भुऱ्या रंगामध्ये तो तांदूळ असायचा तो तांदूळ खाल्ल्याने आपल्याला जादा पोषक तत्व मिळायची आपले शरीर निरोगी राहण्यासाठी तो तांदूळ खूप उपयुक्त होता. पण आज आपण जे तांदूळ खातोय ते पोषकतत्वे पूर्णपणे नष्ट झालेले आहे यापासून होणारा सगळ्यात पहिला व मोठा तोटा म्हणजे डायबिटीस आज काल प्रत्येक घरामध्ये एक तरी डायबेटीसचा पेशंट दिसून येईल.

अगदी कमी वयात देखील लोकांना डायबिटीस होऊ लागला आहे. याचे कारण म्हणजे तुमच्या आहारात असलेला तांदूळ जर तुम्ही दिवसातून दोन-तीन वेळा भातच खात असाल तर तुम्हाला मधुमेह नक्की होणारच आहे जेव्हा तुम्ही एक वाटी भात खाता तेव्हा दहा चमचे साखर तुमच्या पोटात जाते मग विचार करा मधुमेह व्हायला आणि काय लागतं.

दुसरी गोष्ट काही जण म्हणतील यामध्ये विटामिन्स आहेत फायबर आहेत प्रोटिन्स आहेत आणि असा भात खाल्ल्याने पोटसुद्धा लगेच भरते व लगेच रिकामे सुद्धा होते म्हणजेच भात लगेच पचतो भात पचवायला आपल्या पचनसंस्था लहान आतड मोठ आतड जठर यांना जास्त काम करावं लागत नाही. हळूहळू ही सवय या इंद्रियांना लागू लागते आणि पचनसंस्था कमजोर पडते.

यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागू लागते अगदी दोन दोन तीन तीन तासाने तुम्ही सतत काही ना काही खाऊ लागता भात खाल्ला की पोट भरल्यासारखं वाटतं पण अर्धा पाऊण तासाने ते परत रिकामं होतं. या भातामध्ये फायबरचे प्रमाण फार कमी आहे यामुळे पचन संस्था तर कमजोर होतेच पण पोटात कफ होणे मुरड येणे ऍसिडिटी होणे या समस्या सुरू होतात.

याबाबत डॉक्टरसुद्धा सांगतील की भात अजिबात खाऊ नका ज्यांना या समस्या असतात त्यांना भात खाण्यास सक्त मनाई असते. भात खाण्याचा अनेक मोठा तोटा म्हणजे आपली हाडे कमजोर होतात याचे कारण असे आहे की आपली हाडे मजबूत होण्यासाठी कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते पण जे लोक आपल्या आहारात तांदळाचा जास्त वापर करतात त्यांची हाडे कमजोर होतात.

कारण तांदळामध्ये अजिबात कॅल्शियम नाही राईस ह्याज मिनिमम कॉन्टिटी ऑफ कॅल्शियम मग कॅल्शियमच जर तुम्हाला मिळाले नाही तर तुमची हाडे नक्कीच कमजोर होतील आणि वाढत्या वयामध्ये तुम्हाला जॉईंट पेनचा त्रास जाणवतो हाडे ठिसूळ होतात तर यावर पर्याय म्हणजे तांदूळ कमी खा. गव्हाचा वापर करा गव्हापेक्षा ज्वारी जास्त बेस्ट आहे बाजरी किंवा मका देखील वापरू शकता.

गव्हाचे सुद्धा काही काही तोटे आहेत ज्वारी ही सर्वात उत्तम आहे बाजरीमुळे जराशी उष्णता वाढते पण हे चालते भात खाणे पूर्ण सोडून देऊ नका भात खा पण प्रमाणात खा ज्वारी हा मुख्य आहार म्हणून ठेवा व थोड्याफार प्रमाणात भात खा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *