मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा स्वामी सेवेत मांसाहार का करू नये

काही लोकांना प्रश्न पडतो की आम्ही मासाहार करतो मग आम्ही स्वामी सेवा कशी करावी आपल्याला स्वामी सेवा किंवा इतर देवतांची सेवा करायची असते पण मासाहार म्हटलं होतं अडथळा म्हणून मध्ये येतोच. आपल्या सर्वांच्या मनात शंकांचं वादळ निर्माण होतं त्यामुळे शुद्ध मनाने सेवा करणे कठीणच असते.

त्यामुळे या ग्रहण प्रश्नाचे उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करू या भूक लागल्यावर खाणं ही आपली प्रकृती आहे. आणि आपल्याला माहित आहे की प्रत्येक मनुष्यप्राणी हा पोटासाठी सगळं करत आलाय पण मग आपल्यासाठी शाकाहार योग्य की मांसाहार योग्य मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा कसा हे आज आपण जाणून घेऊया.

प्रत्येकाला स्वामीसेवा करायची असते पण मांसाहार म्हटलं की आपल्या मनात नकारात्मकता येते जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी भोजन करतो तेव्हा आपल्या मनात कोणत्या शंकाकुशंका नसतात. पण जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा तुमच्या मनात नकारात्मकता येते मनसुद्धा वाटतं जेव्हा आपण मांसाहार करतो.

तेव्हा घरातील बदललेलं वातावरण तुम्हाला नक्की जाणवेल घरात अशांतता वाटेल वादही होतील. आणि म्हणूनच मांसाहार हा सेवेतील अडथळाच आहे जेव्हा तुम्ही मांसाहार करता तेव्हा सेवा न केलेलीच बरी पण एक लक्षात ठेवा की तो दिवस स्वामी सेवेविना वाया गेला कारण श्री गुरुचरित्र ग्रंथात लिहिले.

की ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस आपला वाया गेला असे समजावे पण यमाला कर्ण नसते म्हणून तात्काळ पुण्य करावं लागतं आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपण आपल्या मनाला प्रश्न करायचा. की आपण मांसाहार करतो ते स्वामींना आवडेल का याचे उत्तर तुम्ही स्वतःच शोधायच आहे स्वामींच्या काळात घडलेली एक गोष्ट जाणून घेऊया.

ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडण्यास मदत होईल. स्वामी अक्कलकोट गावात वाटेल तिथे बसत असत वाटेल तिथे हिंडत असंत वाटेल तिथे भोजन करत असत एके दिवशी फिरत-फिरत स्वामींची स्वारी राजवाड्यात जाते स्वामींना साक्षात समोर पाहून राजा आनंदित होतात. स्वामींचे स्वागत करतात.

व देवघरापुढे असणाऱ्या झोपाळ्यात स्वामींना आसन देतात स्वामी व राजा यांची चर्चा चालू असते त्याचवेळी आप्पा सुलभ पुजारी गंध उगाळत बसलेला असतो त्याच वेळी एक उंदीर येऊन निरांजनातील वात खात असतो. हे पाहून आप्पा पुजारीला खूप राग येतो दररोज उंदीर वात खात असल्याने आप्पा पुजारी वैतागलेला होता.

त्या दिवशी तर तो हातात असलेले गंध उघळण्याचे खोड हे उंदराच्या दिशेने फेकून मारतो. तो खोड बरोबर त्या उंदराला जाऊन लागतो व उंदीर जागेवरच मरून पडतो आप्पाला आनंद होतो व तो उठून तो उंदीर बाहेर टाकण्यासाठी त्याची शेपूट धरून उचलतो व देवघराबाहेर पडतो इकडे स्वामी बाहेर बसलेले असतात.

त्याच्या हातातील उंदीर पाहून स्वामी त्याला म्हणतात काय रे सुलभा उंदराचा फार त्रास होत होता वाटतं तुला मारलस बिचाऱ्या उंदराला अरे वात तर खात होता ना तो स्वामींचा हा राग पाहून आप्पा सुलभ घाबरतो. त्याला काय बोलायचं सुधरत नाही तो तसाच उभा राहतो स्वामी त्याला म्हणतात आण तो उंदीर आण इकडे अप्पा सुलभ स्वामींकडे तो उंदीर देतो स्वामी तो मेलेला उंदीर हातात.

घेऊन झोपाळ्यापासून इकडून तिकडे पाच सहा वेळा फेऱ्या घालतात. व त्या उंदराला हसत म्हणतात चल उठ बेटा भाग जावो स्वामींचे हे शब्द ऐकताच तो मेलेला उंदीर ताडकन उभा राहतो व उडी मारून पळून जातो हे पाहून आप्पा सुलभच्या जिवात जीव येतो व तो स्वामींच्या चुकलो चुकलो म्हणून पाया पडतो.

मग स्वामी म्हणतात अरे ही सारी सृष्टी मी निर्माण केली आहे जशी तुम्ही सगळी माझी लेकर आहात तशीच ही किडे मुंग्या जनावरं ही पण माझी लेकर आहेत यांची काळजी पण मलाच घ्यायला पाहिजे. अरे तुम्ही माणसं ह्या छोट्या छोट्या जीवांना शुल्लक समजत असाल पण तसं नाही त्यांनाही या पृथ्वीवर महत्त्व आहेच पण तुम्हाला हे कधी कळणार असं बोलून स्वामी राजवाड्यातून बाहेर पडतात.

या कथेवरून तुमच्या लक्षात आला असेल की आपण मांसाहार खाऊन स्वामी सेवा केलेली स्वामींना चालेल का आवडेल का विचार करा यावर आणि स्वतःलाच प्रश्न विचारा या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जवळच आहे.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.