मुंग्या घालवण्यासाठी घरगुती उपाय

मुंग्या घालवण्यासाठी 100% खात्रीशीर उपाय आज आपण जाणून घेऊया घरातील काही वस्तू किंवा माध्यमातून आपण घरातून मुंग्या पळवून लावू शकतो त्यातला पहिला उपाय म्हणजे आपल्या सर्वांच्या घरामध्ये कापूर उपलब्ध असतो.

देवपूजेसाठी लागणारा कापूर सर्वांच्या घरात असतो या कापराचा बारीक चुरा करून मंग्या असलेल्या ठिकाणी हा चुरा ठेवायचा आहे आणि कापराच्या वासाने मुंग्या येत नाहीत.

दुसरा उपाय म्हणजे दोन-तीन लवंग मुंग्या आलेल्या ठिकाणी ठेवल्याने मुंग्या पळून जातात पुढचा उपाय आहे लिंबाच्या सालीचे यासाठी ठेवल्याने मुंग्या येणार नाहीत पुढचा उपाय सुद्धा खूप सोप आहे.

तो म्हणजे व्हाइट व्हिनेगर आणि पाणी मेडिकल स्टोअर मध्ये वाईट विनेगर सहज उपलब्ध होते व्हाइट व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन स्प्रेच्या बॉटल मध्ये घालून तुम्ही हे वापरू शकता पुढचा उपाय आहे तमालपत्र.

या तमालपत्र याची पूड करून मुंग्या आलेल्या ठिकाणी टाकली तर मुंग्या लगेचच जातात तसेच धान्यातील किडे निघून जाण्यासाठी देखील तमालपत्रीचा उपयोग होतो हे धान्याच्या डब्यात घालून ठेवल्याने धान्यातील किडे निघून जातात.

परत किडे होणार नाहीत जर आपल्या परिसरामध्ये कडूलिंबाचे झाड उपलब्ध असेल तर त्याची पाने व पुदिन्याची पाने घेऊन ही थोडीशी वाळवायची आहेत व त्यांची पूड करून मुंग्यांच्या ठिकाणी घातली तरी मुंग्या जातात.

मुंग्यांच्या ठिकाणी जर थोडीशी हळद टाकली तरी मुंग्या जातात व तिखट जरी टाकले तरी चालेल पुढचा उपाय म्हणजे फरशी पुसताना जर आपण त्या पाण्यात मीठ टाकले तरी घरात मुंग्या होत नाहीत घरांमध्ये स्वच्छता असेल तर मग या अजिबात येत नाहीत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.