मुली पायात का बांधतात काळा दोरा रहस्य ऐकून चकित व्हाल

आपण बघतो की कितीतरी तरुण-तरुणींच्या पायात काळे दोरे बांधलेल्या आपल्याला दिसतात आपल्याला वाटते की तशी फॅशन आहे म्हणून ते घालतात काही अंशी ते खरेही आहे व पायामध्ये काळा दोरा दिसायलाही आकर्षक व सुंदर वाटतो. आपल्याला हे फॅशन वाटत असेल तरी पायात काळा दोरा बांधण्या माघे ही धर्मशास्त्रामध्ये निश्चित अशी काही कारणे दिली आहे.

धर्मशास्त्रानुसार शनिवारच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून काळा दोरा उजव्या पायामध्ये बांधल्यास त्या व्यक्तीचा घरी लक्ष्मीचे आगमन होते. तसेच त्या व्यक्तीवर देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांचे आर्थिक समस्याही दूर होतात म्हणून ज्या व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कमकुवत असतील ज्यांची आर्थिक स्थिती वाईट असेल त्यांनी शनिवारी पायामध्ये काळा दोरा बांधण्यास सांगितले जाते.

यामुळे त्यांचे आर्थिक समस्या सुटतात. काही व्यक्ती ना वारंवार पोट दुखी चा त्रास होत असतो हे पोट दुखी कोणत्या ही निश्चित कारनामुळे उद्भवत असते म्हणजे त्यामागे कोणतेही कारण नसते कधी कधी हे दुखणे सहन होणार नाही इतके प्रमाणात वाढते. अशावेळी उजव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा किंवा इतर कोणते ही रंगाचा दोरा घट्ट गुंडाळावा.

यामुळे पोट दुखी कमी होण्यास मदत होते हा उपाय ॲक्युप्रेशर उपचार पद्धती होतो म्हणजे यामुळे आपले ॲक्युप्रेशर चे पॉईंट दाबले जातात व पोट दुखी थांबते म्हणून हा खूपच प्रभावी असा हा उपाय आहे. काही महिलांना मासिक पाळीत पोट दुखी चा भयंकर त्रास होत असतो त्यासाठी हा उपाय अगदी उत्तम उपाय आहे. ज्यांना पायाला जखम झालेली असते व ती जखम जर लवकर बरी होत नसेल.

वेळोवेळी त्याच ठिकाणी काहीही लागत असेल व जखम वाढतच चालली असेल तर अशा व्यक्तींना ही काळ्या रंगाचा दोरा पायात बांधण्याचा सल्ला दिला जातो. लहान मुलांना कोणाची वाईट नजर लागू नये दृष्ट लागू नाये यासाठी लहान मुले तसेच मोठ्यांचे ही पायात काळा दोरा बांधण्याची पद्धत प्राचीन काळापासून आपल्या कडे रूढ आहे.

काळा रंग हा शनिदेवांचा आवडता रंग असल्याने शनि महाराजांची आपल्यावर कृपा राहावी यासाठी अनेक व्यक्ती आपले उजव्या पायात काळा दोरा बांधतात काळा दोरा जर पायात घातला तर त्या व्यक्तीचे आसपासची नकारात्मक शक्ती नाहीशी होत असल्याची मान्यता आहे. पायात काळा धागा बांधायचं असेल तर मंगळवार किंवा शनिवारी हा धागा पायात टाकावा.

परंतु तो पायात टाकण्या पूर्वी हनुमानांच्या मंदिरात नेऊन त्यांची हनुमानांची मूर्ती समोर ठेऊन पूजा करावी व मंग हा दोरा पायात घालावा म्हणजे त्याचा अधिक परिणाम जाणवतो. चला तर मग आपणही काळा दोरा पायात टाकून आपल्या जीवनात लक्ष्मीचे आगमन करूयात व आपल्या जीवनातील नकारात्मकता काढून आपले जीवनात सकारात्मक बनवूया.

Leave a Reply

Your email address will not be published.