रक्तामध्ये पित्त वाढले तर कोणती लक्षणे दिसतात आणि त्यावरील सहा उपाय

नमस्कार आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो रक्तामध्ये ज्यावेळेला पित्त वाढते. त्यावेळेला त्याचे कारण सुद्धा पोटा पासूनच सुरु होते. कारण ज्या वेळी पोटामध्ये पित्त वाढते आणि ते रक्तामध्ये खेचले जाते. त्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढते. मग हे ज्या वेळी होते. त्यावेळेला काय लक्षणे दिसतात. सगळ्यात पहिले आपल्याला जी भूक लागत असते ती आपल्या रक्तावर ती अवलंबून असते.

म्हणजे आपले रक्त किती व्यवस्थित आहे. किती चांगल्या प्रमाणात आहे. ते योग्य काम करत आहे. का त्याच्या वर ते अवलंबून असते. की आपल्याला भूक कशी लावायची. मग ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त वाढते. आणि रक्त बिघडले जाते. त्यावेळेला भूक कमी लागते. अशा या लक्षणांना आयुर्वेदामध्ये अण्णां अभिलाषा म्हटलेले आहे.

म्हणजे अण्णा वरची अभिलाषा निघून जाते. अन्न खाण्याची इच्छा होत नाही. अशा प्रकारांची लक्षण दिसते. तुम्हाला भूक नाही लागत पण तुमची अन्न खाण्याची इच्छा पण होणार नाही अशा प्रकारची लक्षणे याच्या मध्ये दिसू शकतात. त्यानंतर सांन्वधही काही संपूर्ण रक्त शरीरामध्ये प्रवास करत असते. सर्क्युलेट्स होत असते. त्यामुळे शरीरामध्ये दाह होण्याची शक्यता असते.

त्वचेवरती दाह होण्याची शक्यता असते. विशेष करून हाताची बोटं पायाच्या बोटामध्ये दाह होण्याची शक्यता असते. त्यानंतर याच रक्तामध्ये म्हणजे ज्या वेळी रक्तामध्ये पित्त वाढते. त्या वेळेला रक्तामधील उष्णता वाढते. आणि रक्तातली उष्णता वाढल्यामुळे काही लक्षणे दिसतात. विशेष म्हणजे नाकातून रक्त येणे.

संडास वाटे रक्त येणे, संडास जागेवरती दाह होणे, डोळे लाल होणे, डोळ्यामध्ये दाह होणे, त्यानंतर तोंडामधून गरम वाफा निघण्यासारख वाटणे, तोंडाची चव बदलणे, त्या चवीला आपण कदाचित असे म्हणू शकतो लोहगंधी, मित्रांनो कधी कधी तुम्हाला सुद्धा असा वास नक्कीच येत असेल. लोखंडासारखा वास येतो त्याला लोह गंधी म्हणतात.

अशा प्रकारचा वास तोंडातून यायला लागतो. तो वास आपल्याला जाणवतो. सुद्धा कधी कधी आम्ही सुद्धा येतो. म्हणजे तोंडातून आंबट वास यायला लागतो. हे सुद्धा रक्तामध्ये पित्त वाढण्याचे लक्षण असू शकते.या नंतर बऱ्याच वेळेला असे वाटते. आपण दात नाही घासलेस, की तोंडातून वास येतो. किंवा आपल्याला रोज दात घासायला पाहिजे. नाही तर तोंडाचा वास सगळ्यांना येऊ शकतो.

बऱ्याच वेळेला आपण हे सुद्धा बघतो. की एखादी व्यक्ती समोर असेल आणि त्याच्या तोंडाला खुप वास येतोय. त्याला विचारतो कांदा खाल्ला होतास का रात्री. पण ती व्यक्ती सांगते की मी कांदा वगैरे काही खाल्ले नाही. तरी सुद्धा त्याच्या तोंडाला वास येत असतो. कधीकधी अतीशय दुर्गंधी येत असते. तर हा जो दुर्गंध असतो. दुर्गंध रक्तामध्ये पित्त वाढल्याने येऊ शकतो.

त्यानंतर आणखीन महत्त्वाचे लक्षण आहे. लघवी लाल रंगाची होणे, म्हणजे लघवीच्या माध्यमा तून सुद्धा रक्त श्राव होणे. हे सुद्धा रक्तामध्ये पित्त वाढल्याचे लक्षण असू शकते. आणखीन महत्त्वाचा लक्षण म्हणजे ज्या वेळेला रक्तामध्ये पित्ताचे प्रमाण वाढते. विशेष करून पित्ताची उष्णता वाढते. त्यावेळी डोक्यावरचे केस गळण्याचे प्रमाण जास्त असते.

मित्रांनो ज्या वेळेला तुम्ही अति प्रमाणामध्ये क्रोध करता. तुम्ही खूप जास्त रागवता त्या वेळेला रक्ता मध्ये पित्त वाढण्याची शक्यताही खूप जास्त असते. तुम्हीच बघाल कि, जी लोक प्रचंड रागीट असतात. त्या लोकांना हायपर टेन्शन होण्याची शक्यताही खूप जास्त असते. चरक संहिता निदान स्थान म्हणून जे आहे. त्याच्या मधलं दुसरा अध्याय रक्‍तपित्त हे त्या अध्यायाचे नाव आहे.

रक्तपित्त या अध्यायामध्ये याचे लक्षणांबद्दल ही लक्षणे का घडतात. कशा पद्धतीमध्ये घडतात याच्या वरती उपाय कसा करायचा आहे. या चारक संहिते मध्ये सांगितलेले आहे. चारक संहितेमध्ये याचा उपाय कसा करायचा आहे. हे पूर्ण स्पष्टपणे सांगितलेला आहे. ही सगळी लक्षणे जी आतापर्यंत आपण बघितली. ही रक्ता मध्ये पित्त वाढल्यामुळे दिसत असतात.

तुमच्यापैकी सुद्धा कित्येक जणांना अशी लक्षणे दिसू शकतात. रक्ता मध्ये पित्त वाढण्याचे कारण काय असू शकते. ज्यावेळी अति प्रमाणामध्ये उन्हामध्ये फिरता. किंवा अति प्रमाणामध्ये आहार घेता. म्हणजे गरज नसताना जास्त आहार घेता किंवा गरम पदार्थ खाता. जंकफूड पुढचे पदार्थ आपण जास्त प्रमाणात खात असतो.

या वेळी रक्तामध्ये पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते तर रक्तामध्ये पित्त वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी दोन कारण विशेष करून पाहूया ती म्हणजे अति प्रमाणामध्ये रागवणे आणि रात्री जागरण करणे आणि दुसरे कारण म्हणजे जे आहारामध्ये जाते ते म्हणजे अति प्रमाणामध्ये गरम पदार्थ खाणे, आणि अति प्रमाणामध्ये तिखट, आंबट पदार्थ खाणे. यामुळे सुद्धा रक्तामध्ये पित्ताचे प्रमाण वाढते.

मित्रांनो हेच रक्तामध्ये वाढलेले जे पिता आहे. हे कसे कमी करायचे. हे आता आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिले म्हणजे आहाराच्या माध्यमातून पाहूया. आहाराची मात्रा थोडीशी कमी प्रमाणामध्ये करा. हे तीन दिवस करायचे आहे. मुगाची डाळ आणि भात घेतलात. काही प्रमाणामध्ये लक्षणे कमी होताना दिसू शकते.

जेवढ्या जास्त प्रमाणात त्रास असतो. जेवढे प्रमाणा मध्ये रक्तामध्ये पित्त वाढले आहे. तेवढे जास्त प्रमाणा मध्ये आणि विशेष करून लक्ष देऊन. ट्रीटमेंट करावी लागते. अति प्रमाणामध्ये आहार घेणे थांबवणे खूप गरजेचे आहे. याच्यावरती उपाय करणे गरजेचे आहे. पहिला उपाय झाला आपला आता आणखीन काय उपाय करू शकतो. अडुळसा नावाच्या वनस्पतीचा नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल.

आणि या रक्तामध्ये ज्यावेळी पित्त वाढते. त्या वेळेला सर्वात श्रेष्ठ औषध जर कुठले असेल, तर ते म्हणजे आडुळसा, खोकला झाला की लगेच अडुळसा घेतो. मार्केटमध्ये अडुळसाचे औषध किंवा सिरप मिळते. पण आडुळसाला संस्कृत भाषेमध्ये वासा म्हटले जाते हि जी वासा नावाची वनस्पती आहे ती याच रक्तामध्ये गेलेल्या पित्ताला कमी करण्यासाठी सर्वात श्रेष्ठ असते आणखी काही आहार पद्धती पाहूया.

ती म्हणजे साळीच्या लाह्या ज्या असतात. त्या तुपामध्ये परतून घ्यायच्या परतून झाल्यानंतर त्या थंड झाल्यावर त्याच्यामध्ये मध टाकून चांगले मिक्स करून त्या खाल्ल्यानेसुद्धा रक्तामधील पित्त कमी होते. त्यानंतरचा आपला नेहमीचा उपाय तो म्हणजे काळे मनुका दहा आणि खजूर दोन हे पाण्यामध्ये टाकावे.

त्याचा कोळ बनवावा. थोडसं त्याना गरम करावे. मग जो काढा त्याचा बनेल. तो काडा जेवणाच्या अगोदर घ्यावा. दुपारी रात्री दोन्ही वेळेस त्याचा ने सुद्धा रक्ता मधले पित्त जे असते. ते कमी होऊ शकते. तिसरा उपाय पाहूया डाळिंबाचा ज्यूस आणि आवळ्याचा ज्यूस हे दोन्ही एकत्र करायचे. सकाळी उपाशी पोटी घेतले. किंवा सकाळी दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता असे हे दोन वेळेला जर घेतला.

तरीसुद्धा तुमच्या रक्तामधले पित्त ही वाढू शकते. सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता का घ्या ते पाहू नैसर्गिकरित्या दहा ते दोन या काळामध्ये म्हणजे हा जो काळ असतो. या मध्ये आपल्या शरीरामध्ये पित्त काही प्रमाणामध्ये वाढलेले असते. हा काळ जो आहे तो पित्ताचा काळ असतो. या काळामध्ये हात ज्यूस घेतला तर त्याचा चांगला फायदा होत असतो.

वीस मिली डाळिंब ज्यूस आणि वीस मिली आवळा ज्यूस हे दोन्ही एकत्रित करून घ्यायचा आहे. शरीरामध्ये वाढणारी उष्णता दाह पित्ताचा त्रास कमी होत असतो. याच्यामध्ये तुम्ही मुगाच्या डाळीचे सूप मसूर डाळीचे सूप घेऊ शकता. या दोन्ही डाळी थंड असतात त्याच्यामुळे रक्तामधले पित्त वाढलेले असते ते कमी होऊ शकते.

आणखीन जर तुम्ही मटकी, चवळी याचे सूप आहारामध्ये घेऊ शकता. रक्तामधले पित्त कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणखी एक उपाय पाहणार आहोत. गहू आहे या गव्हाचे पीठ बनवतो. ते पीठ अर्धा चमचा पाण्यामध्ये मिक्स करून गहू जर तुम्ही घेतले तर शरीरामध्ये उष्णताही कमी होऊ शकते. गहू जे असते थंड असते. शरीरामध्ये प्रमाणात थंडावा निर्माण होऊ शकतो.

विशेष करून हे कुणी घ्यायला पाहिजे ज्या लोकांना ऊनामध्ये गेल्यानंतर भरपूर त्रास होतो. उन्हामध्ये गेल्यानंतर डोकेदुखी, शरीरामध्ये जडपणा, पोटामध्ये जळजळ होते, शरीरामध्ये दाह होतो. पण यांचे पोट चांगले आहे. भूक चांगली आहे. पोट चांगल्याप्रकारे साफ होत आहे. अशा लोकांनी हा उपाय जर केला तर त्यांना चांगला फरक पडू शकतो.

आणखीन एक शेवटचा उपाय या ठिकाणी आपण पाहणार आहोत. उंबराचे झाड या झाडामध्ये पाणी असते. त्याला आपण उंबराचे पाणी म्हणतो. किंवा औदुंबराचे जल म्हणतो. ज्या वेळेला आपण उंबराचे झाड तोडतो. त्यावेळेला त्याच्यातून पाणी निघते. आणि हे जे पाणी असते. रक्तामधले पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. मित्रांनो हे झाले रक्तामधले वाढलेले पित्त कमी करण्यासाठीचे उपाय हे उपाय तुम्ही नक्की करून पहा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.