सैराट फेम रिंकू राजगुरुने म्हणजे सर्वांची लाडकी अर्चिने अवघ्या महाराष्ट्राला वेड करून सोडलं होत. आज आपण रिंकूच्या वैयक्तिक जीवनाबद्दल थोडस जाणून घेऊया. रिंकुचा जन्म सोलापूर येथील अक्लुज मध्ये 3 जून 2001 साली झाला. आता ती फक्त 17 वर्षांची असून देखील तिने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावून सोडलं होत.
लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसाच्या तोंडामध्ये फक्त अर्चिच नाव होतं. कारण सैराट चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. रिंकूने आपले शालेय शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला अक्लुज मधून पूर्ण केले 2016 मध्ये ती शाळा सोडून देणार अशी बातमी देखील पसरली होती.
कारण तिचे फॅन तिला शाळेत जाऊन भेटायचे रिंकुचे आईवडील दोघेपण शिक्षक असल्यामुळे त्यांनी रिंकुला बाहेरून परीक्षा द्यायचे ठरवलं आणि तिने 10 वी ची परीक्षा बाहेरूनच दिली. 10 वी मध्ये तिला 66% गुण पण मिळाले.
रिंकू लहानपणा पासूनच खूप हुशार होती पहिली पासून जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुण प्रत्येक वर्गात मिळवले होते. नवीत असताना देखील तिला 81 % गुण मिळाले होते तसेच रिंकूच्या आईवडीलांनी एक मुलाखतीत की ती लहानपणा पासूनच खूप डॅशिंग होती.
रिंकुला डान्स करायला खूप आवडतो. ती लहानपणा पासूनच डान्सिंगमध्ये पार्टीसिपेट करायची तसेच तिला रांगोळी आणि मेहंदी काढायला पण खूपच आवडते. रिंकूच एक स्वप्न होत की आपण डॉक्टर होऊन आईवडीलांच नाव होठ करायचं.
पण जेंव्हा तिने डान्सिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं तेंव्हा तिला इतकी प्रसिद्धी मिळाली की जिथे जाईल तिथे तिचे फॅन तिचा पाठलाग करू लागले. रिंकूने जेंव्हा सैराट या चित्रपटात अर्चिच रोल ऑफर झाला तेंव्हा ती सातवीत होती.
नागराज मंजूळेंनी तिला पाहता क्षणीच हा रोल ऑफर केला होता. रिंकूने या चित्रपटात सर्व स्टंट स्वतः केले आहेत. जसे की विहीरत उडी मारणे बुलेट चालवणे आणि ट्रॅक्टर चालवणे. सैराट चित्रपटा नंतर रिंकुला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.
कपिल शर्माच्या शोमध्ये देखील रिंकू आणि आकाश ठोसरने हजेरी लावली. या चित्रपटाने 100 कोरोडची कमाई केल्यामुळे अशी बातमी आली होती की त्यांना बोनसमध्ये अजून 5 करोड रुपये दिले गेले. पण रिंकू आणि आकाश ठोसरने ही बातमी खोटी असल्याच सांगितलं.
यानंतर रिंकूने सैराटचा रिमेक चित्रपट कन्नड मध्ये काम केलं आणि ती नवीन चित्रपट कागर या चित्रपटामध्ये ही तिने मुख्यभूमीका केली आहे.