नमस्कार मंडळी तुमचं खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो आपण लॉकडाउन असल्यामुळे घराबाहेर जाऊ ही शकत नाही. वड असेल तिथे भरपूर गर्दी असते त्या मुळे संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. घरच्या घरी पूजा कशी करावी. त्यासाठी सर्वप्रथम कागदावर वडाचे चित्र काढायचे आहे. त्यानंतर आपण त्याची पूजा करायची आहे.
सर्वप्रथम त्याच्यासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे. तिथे आपण विडा मांडायचा आहे. तर तसेच त्याच्या बाजूला आपण सावित्री विडा सुद्धा मांडायचा आहे. आता आपण प्रथम दीप लावून घ्यायचा आहे. प्रथम आपण निरांजन लावून घ्यायचे आहे. नंतर गणेशाची पूजा करून घ्यायची आहे. अक्षता, हळद-कुंकू, फूल वहायचे आहे.
त्यानंतर त्याच्या समोर निरांजना, धूप, अगरबत्ती ओवाळायची आहे. नंतर वडाला हळद-कुंकू आणि अक्षता वहायच्याही आहेत. त्यानंतर वडाला वस्त्र घालायचे आहेत. नंतर कापूस वस्त्र अर्पण करायचे आहे. मग वडाला आपण हार घालायचा आहे. अशाप्रकारे ही जी बांगडी आणि गाठी असते. ती धाग्याला गुंडाळायची आहे.
आणि वडाच्या झाडाला बांधायची आहे. आणि हे इथे ठेवायची. नंतर आपण सावित्रीचा जो विडा मांडला आहे. त्याची पूजा करायची आहे. तिला प्रथम हळदी, कुंकू, अक्षता वहायच्या आहेत. तिची ओटी भरायची आहे. तिला वान म्हणून पाचीही प्रकारची फळे अर्पण करायची आहेत. आता आपण प्रत्यक्ष वडाखाली नाही त्यामुळे आपण वडाला पाणी वाहणार आहोत.
त्यानंतरच मग आपण प्रदक्षिणा घ्यायचे आहेत. हे सूत्त बांधूनजे आपल पाट आहे. त्याला प्रदक्षिणा घ्यायचे आहेत. त्यानंतर म्हणा सावित्रीचा अखंड जप, नाम घ्यायचं आहे. त्यानंतर ओम सावित्रीया नमः असं नाव घ्यायचं आहे. अशा सात प्रदक्षिणा आपल्याला घ्यायच्या आहेत. हे त्यानंतर सावित्रीच्या त्याला वंदन करायचे आहे आणि म्हणायचे आहे.
हे सावित्री माते हे व देवता की माझ्या घराला सुख शांती लाभो माझं सौभाग्य अखंड वाढू दे अशी प्रार्थना करायची आहे. मैत्रिणींनो वटसावित्री दिवशी वटसावित्रीची कथा ह्या ऐकायची आहे. तिने केलेले धाडस, तिने केलेला त्याग ते त्यादिवशी पाठवायचे आहे. अशाप्रकारे घरच्याघरी वटसावित्रीची पूजा करा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.