शिवावर दूध वाचण्यापेक्षा गरिबाला द्यावे का? आपल्या राशीनुसार शिवलिंगाचा अभिषेक कसा करावा

या कोरोनाच्या काळात आपल्याला अभिषेक करायला जर शिवलिंगाचे मंदिर मिळाले नाही तर आपण आपल्या घरामध्ये कोणत्याही धातूचे शिवलिंग ठेवू शकतो शिवलिंगाचे सोमसुत्री उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे आपल्या देवघरात लाल कापडावर हे ठेवायचे आहे आणि भस्म अर्पण करायचे आहे बेलाचे पान वहायचे आहे कोणतीही फुले अर्पण करायची आहेत

जर तुम्हाला मंदिरात जाऊन अभिषेक करता येत नसेल तर याच्यावर फक्त फुलं वाहून देखील आपण आपली पूजा सफल करू शकतो पण ज्यांना बाहेर मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आहे त्यांच्यासाठी वेगळा राशीला वेगवेगळ्या मंत्र पाने-फुले शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत ज्या व्यक्तींना अभिषेक करायचा आहे त्यांनी पंचामृत किंवा दूध किंवा पाणी किंवा उसाचा रस यापैकी कुठलाही अभिषेक चालतो

बऱ्याच जणांना असा प्रश्न पडत असेल की एका शिवलिंगावर अर्धा अर्धा लिटर दूध ओतले तर दिवसभरात चार पाच लिटर दूध तर असेच वाया जात असेल दूध वाया जात असेल तर ते गरीब मुलांना द्यावे पण श्रावणातच शिवलिंगावर दूध का ओतावे यामध्ये सुद्धा गणित आहे कारण भगवान शिवशंकरांनी विषय धारी म्हंटले आहे विष पचवण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे आहे

अति दुधाचे सेवनही विषच आहे आणि म्हणून ते दूध तुम्ही त्या शिवशंकराच्या पिंडी वरती ओतायचे आहे आपण काही वेळा बघतो की काही लोक दुधाची पिशवी घेऊन मंदिरात जाऊन तोंडानेच पिशवी फोडून तिथेच देवाला अभिषेक घालतात ही अतिशय जास्त चुकीची पद्धत आहे यापेक्षा अभिषेक न केलेला बरा जर शक्य असेल तर देशी गाईच्या दुधाने अभिषेक करा

जर शक्य नसेल तर पाण्यामध्ये देशी गाईचे तूप मिक्स करून त्याचा अभिषेक केला तरी चालेल मेष राशीच्या मंडळींनी अभिषेक केल्यानंतर 51 बेलपत्र जरूर वहावित व एक विशिष्ट मंत्राचा जप करायचा आहे वृषभ राशीच्या मंडळींनी अभिषेकानंतर रुईचे पान व रुईचे फुल हे अर्पण करायचे आहे मिथुन राशीच्या मंडळींना अभिषेकानंतर शमीच्या झाडाचे पान अर्पण करायचे आहे

कर्क्रच्या मंडळींनी धोत्र्याचे सिंहाच्या मंडळींनी कण्हेरीचे कन्या राशीच्या मंडळींनी पंचमुखी हनुमानाचे एक रुद्राक्ष अर्पण करायचे आहे तूळ राशीच्या मंडळींनी कोणतेही बिनवासाचे पांढरे फूल अर्पण करायचे आहे वृश्चिक राशीच्या मंडळींनी आघाडा अर्पण करायचा आहे धनु राशीच्या लोकांनी कन्हेर व बेल अर्पण करायचे आहे मकर राशीच्या लोकांनी धोत्रा कुंभ राशीच्या लोकांनी निळे फूल वहायचे आहे आणि मिन राशीच्या लोकांनी आघाडा आणि दूर्वा वहायचे आहेत हे सर्व अभिषेक केल्यानंतर अर्पण करायचे आहे

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.