श्रावण महिन्यात महादेवाला शिवामुठ अशी करा शिवामुठीची कथा नक्की जाणून घ्या

पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या महिन्यात प्रत्येक जण भोलेनाथ महादेवाची मनोभावे पूजा करतो आपल्या मनातील इच्छा पूर्ण व्हाव्यात जीवन सुखी व समृद्ध व्हावे यासाठी महादेवांची पूजा केली जाते आणि त्यातीलच एक भाग म्हणजे शिवामूठ वाहने याला शिवमुष्टी व्रत असे देखील म्हटले जाते विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावणी सोमवारी हे शिवमुष्टी व्रत केले जाते

श्रावण महिन्यात चार किंवा पाच सोमवार येतात आणि या वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळे धान्य आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो विशेष करून ज्या नवविवाहित महिला आहेत ज्यांचे नुकतेच लग्न झालेले आहे त्यांनी हे शिवमुष्टी व्रत नक्की करावे श्रावणातल्या सोमवारी एकभूक्त राहून महादेवांना बेलाची पाने सुपारी गंध तांदूळ फुले वाहिली जातात पूजा केली जाते क्रमानुसार वेगवेगळ्या सोमवारी वेगवेगळे धान्य वाहिले जाते

ही मुठ उभी धरावी लागते आणि वाहताना एक मंत्र सुद्धा म्हणावा लागतो तो मंत्र असा आहे ||नमः शिवाय शांताय पंच वक्ताय श्रीने शृंगी भृंगी महाकाल गन युक्ताय शंभवे|| किंवा साधी सोपी प्रार्थना देखील करू शकता शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणून ही शिवामूठ शिवलिंगावर वहायची असते पहिल्या सोमवारी तांदूळ म्हणजेच अक्षत अर्पण करतो

दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ अर्पण केले जाते तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू अर्पण केले जातात दिवसभर उपवास करावा सायंकाळी पूजा करून बेलपत्र पाहून उपवास सोडावा आणि पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर या व्रताचे आपण उद्यापन करावे कथा विधी शिवलिंगाची पूजन करावे आणि गरजूंना गोरगरिबांना भेटवस्तू देऊन हे व्रत समाप्त करावे

एक आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या त्यातील तीन आवडत्या तर एक नावडती सुन होती तीन आवडत्या सुनांना प्रतिपाळ केले जात होते मात्र नावडत्या सुनेला उष्टे जेवण दिले जायचे नेसायला जाडेभरडे दिले जायचे राहायला गुरांचा गोठा होता तिला गुराख्याचे काम दिले होते असेच काही दिवस गेले पुढे श्रावण महिना आला श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी ही राणी जंगलात गेली

तिला तिथे नागकन्या आणि देवकन्या भेटल्या तिने त्यांना विचारले बाई तुम्ही कुठे जाता त्या म्हणाल्या आम्ही महादेवाच्या देवळी जाऊन त्यांना शिवामूठ वाहतो ती सून म्हंटली याने काय होते त्या कन्या म्हणाल्या भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीस जाते मुल बाळे होतात नावडती माणसे आवडती होतात वडील माणसांपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारले

की तू कोणाची कोण ती म्हणाली मी राजांची सून मी ही तुमच्या बरोबर येऊ का त्यावर त्यांनी होकार दिला त्यांच्याबरोबर ती भगवान शंकरांच्या मंदिरात गेली नागकन्या देवकन्या तिथे वसा वसू लागल्या नावडती सून म्हणाली काय गं बायांनो वसा वसता त्या म्हणाल्या होय आम्ही शिवामूठीचा वसा वसतो त्या वस्याला काय बरे करावे मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी फुल घ्यावी दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावे भोले बाबांची पूजा करावी

हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननंद भावजय भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा म्हणून तांदूळ वहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टे खाऊ नये दिवसभर झोपू नये उपवास जर नाही जमला तर दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल पत्र वहावे आणि जेवण करावे असे पाच वर्ष करावे

पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जवस आणि पाचव्या सोमवारी सातू हे शिवमूठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सर्व सामान देवकन्या व नागकन्या यांनी तिला दिले व पुढच्या सोमवारी घरुन आणायला सांगितले त्या दिवशीचा नावडत्या सुनेने मनोभावे शंकराची पूजा केली संपूर्ण दिवस उपवास केला तिला दिलेले उष्टे पान तिने गाईला खाऊ घातले

भगवान शंकराचे तिने उपासना केली व दूध पिऊन झोपी गेली नंतर दुसरा सोमवार आला त्या सुनेने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे जंगलात जाऊन ती नागकन्याबरोबर मनोभावे पूजा करू लागली आणि प्रार्थना करू लागली व तीळ वाहिले संध्याकाळी सासर्‍याने विचारले तुझा देव कुठे आहे नावडतीने उत्तर दिले माझा देव खूप लांब आहे वाट कठीण आहे काटेकुटे आहेत

तिथे माझा देव आहे पन्हाळा तिसरा सोमवार आला ती देवाला जाऊ लागली घरची माणसे मागे आली तिला सराव होता मात्र बाकीच्यांना काटेकुटे टोचू लागले नावडतीची तिला दया आली आज पर्यंत ती कशी बरी येत असेल नावडतीला चिंता वाटली देवाला तिने प्रार्थना केली देवाला तिची दया आली नागकन्या देवकन्या यांच्या सहित ते देऊळ सुवर्ण झाले रत्नजडिताचे खांब झाले स्वयंभू महादेवाची पिंड झाली

सगळ्यांनी भगवान शिवशंकरांचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली राजाला मोठा आनंद झाला नावडती वर त्याचे प्रेम वाढले तिला त्याने दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यानंतर सर्व जण बाहेर आले इकडे देऊळ अदृश्य झाले तो पागोटे आणायला पाठीमागे गेला तर तिथे एक लहान मंदिर होते तिथे एक पिंडी आहे जवळ कोणते आहे त्यावर ठेवलेल्या पागोटा ही आहे त्यावेळी त्याने सुनेला विचारले असे कसे झाले त्यावेळी ती म्हणाली माझा गरिबांचा हाच देव मी देवांची प्रार्थना केली त्यांनी तुम्हाला दर्शन दिले तिच्यामुळे देव भेटला म्हणून राजाने तिला पालखीत घालून घरी आणले जी नावडती होती तीच आवडते सुन झाली देव तिच्यावर प्रसन्न झाले

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.