सर्दी खोकला ताप अंगदुखी उपाय घरगुती उपाय

फ्रेंड्स सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हवामान बदलामुळे अनेक व्यक्तींना सर्दी ताप खोकला घसा दुखणे आणि अंग दुखी ह्या समस्या जाणवतात अशा ह्या समस्या घरबसल्या सहजरित्या नाहीश्या करण्यासाठीचा अत्यंत गुणकारी असा हा उपाय आपण आज पाहणार आहोत. फ्रेंडस हवामान बदलामुळे पावसात भिजल्यामुळे किंवा इतरही अनेक कारणांमुळे.

सर्दी ताप खोकला छातीत कफ जमा होणे वारंवार आजारी पडणे अशा समस्या निर्माण होतात. अशा ह्या समस्या लक्षणे दिसतात जर आपण काही घरगुती उपाय केले तर ह्या समस्यांपासून आपण सहजरित्या आपली सुटका करू शकतो चला तर मग पाहूया असा हा बहुगुणी उपाय. तर फ्रेंड्स ह्या उपायासाठी आपल्याला लागणार आहेत मिरी.

ही काळी मिरी प्रत्येक घरांमध्ये सहज रित्या उपलब्ध असतात नसल्यास कोणत्याही किराणामालाचे दुकानावर आपल्याला सहज रित्या आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. अशी ही मिरे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे सर्वप्रथम ह्या काळी मिरी ची अगदी बारीक पावडर आपल्याला बनवून घ्यायची आहे ही पावडर तुम्ही मिक्सर ची साह्याने खलबत्त्यात कशाही प्रकारे बारीक करू शकता.

मी ह्या ठिकाणी खलबत्त्यात बारीक करत आहे फ्रेंड्स यासोबतच आपल्याला दुसरा घटक लागणार आहे तो म्हणजे दालचिनी फ्रेंड्स ज्या व्यक्तींना अगदी थोड्याफार प्रमाणात सर्दी झाल्यानंतर लगेच छाती भरून येते अशा व्यक्तीने अगदी थोड्या प्रमाणात ही दालचिनी ऍड करायची आहे. इतर व्यक्तींनी ही दालचिनी ऍड नाही केली तरी ही चालेल मी यामध्ये अगदी थोडीशी दालचिनी एड करत आहे.

फ्रेंड्स दालचिनी मुळे देखील आपल्या छातीत जमा झालेला कफ अगदी सहज रित्या आणि पटकन बाहेर टाकण्यासाठी मदत होते. तसेच मीरी देखील सर्दी खोकला ताप घसा दुखणे घशातील इन्फेक्शन अंग दुखी तसेच इतर ही समस्या सहज रित्या नाहीश्या होतात अशी ही काळी मिरी आणि दालचिनीची अगदी बारीक पावडर आपल्याला ह्या ठिकाणी बनवून घ्यायची आहे.

अशाप्रकारे फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी ही पावडर आपली याठिकाणी तयार झालेली आहे. अचानक डोके दुखीचा त्रास होत असल्यास ही चिमुटभर पावडर जर काळे चहामध्ये टाकून आपण पिली तर डोकेदुखी चा त्रास देखील नाहीश्या होतो आणि अगदी कमी वेळेत आपल्याला फ्रेश देखील वाटते. आता फ्रेंड्स ही तयार पावडर साधारणपणे एक छोटा चमच आपल्याला घ्यायची आहे.

आता या पावडर मध्ये आपल्याला तिसरा घटक ॲड करायचा आहे तो म्हणजे हळद. फ्रेंड्स हळद हे अँटी बॅक्टेरिया असल्यामुळे आपले शरीरातील बॅक्टेरिया नाहीश्या करण्यासाठी किंवा बाहेर टाकण्यासाठी ह्या हळदीचा खुप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. अशीही चिमूटभर हळद आपल्याला या मध्ये ऍड करायची आहे यासोबतच चौथा आणि अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे.

मध आपल्याला ह्या ठिकाणी लागणार आहे. एक चम्मच मध आपल्याला या मध्ये ऍड करायचा आहे आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अशाप्रकारे फ्रेंड्स हे तयार झालेला मिश्रण दिवसभरात दोन वेळस म्हणजेच सकाळी एक चमच आणि रात्री एक चमच अश्या प्रमाणात आपल्याला घ्यायची आहे.

तीन वर्षानंतर चे मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत हा उपाय गुणकारी असून लहान मुलांसाठी अर्धा चमच किंवा वयोमानानुसार हे प्रमाण कमी जास्त करावे. अशाप्रकारे फ्रेंड्स सर्दी ताप खोकला घशातील खवखव आणि अंग दुःखी छातीत जमा झालेला कफ नाहीश्या होण्यासाठी नक्कीच मदत होईल अशाप्रकारे फ्रेंड्स हा उपाय करा आणि घरबसल्या आपल्या ह्या समस्या सहजरित्या नाहीश्या करा.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.