सुंदर आणि चमकदार केसांसाठी हे घरगुती तेल फारच आहे फायदेशीर

केसांची काळजी घेण्याची एकही संधी तुम्ही नक्कीच सोडत नसाल. एखादा चांगला पर्याय समजला तर तो तुम्ही नक्की ट्रा करा. पण तुम्ही कधी होममेड तेलाचा पर्याय निवडला आहे. बाजारात मिळणाऱ्या तेलांपेक्षाही अधिक चांगले घरी बनवलेले तेल असते. अगदी एक ते दोन साहित्य वापरुन तुम्ही अशा प्रकारचे तेल बनवू शकता.

ही तेलं बनवणं जितके सोपे आहेत तितकेच त्याचे फायदेही खूप आहेत. त्यामुळे तुम्ही अगदी आवर्जुन ही तेलं बनवायला हवीत. चला तर जाणून घेऊयात तेलाचे हे सोपे प्रकार आणि त्याचे फायदे. जास्वंदाच्या तेलाबद्दलही तुम्ही नक्कीच ऐकले असेल. जास्वंद हे देखील केसांसाठी फारच फायदेशीर ठरते. केसांसाठी अशापद्धतीने जास्वंदाचा वापर करणे हे फारच फायद्याचे ठरते कारण.

केसांसाठी त्याचा वापर केल्यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळते. जास्वंदाचे तेल करण्याचा विचार असेल तर असे तेल करण्यासाठी जास्वंदाची फुले काही दिवस चांगली वाळवून घ्या.ती चांगली वाळली की, ती सुकवून त्याची पूड करुन घ्या. ही पूड तुमच्या आवडीच्या कोणत्याही तेलात उकळून घ्या.

हे तेल थंड झाल्यावर तुम्ही त्याचा वापर करा.जास्वंदाच्या तेलामुळेही केसांच्या वाढीला चालना मिळते. केसांची वाढ जोमाने होते. केसातील कोंडा कमी होते. ड्राय स्काल्पचा त्रास असेल तर तो देखील कमी होतो. केसांचा रंग टिकवणे आणि केसांच्या वाढीला चालना देण्याचे काम कडिपत्ता फार उत्तम पद्धतीने करते.

जर तुमच्याकडे कडिपत्त्याचे झाड असेल तर तुम्ही घरीच कडिपत्त्याचा उपयोग करुन अशाप्रकारे कडिपत्त्याचे तेल बनवू शकता. कडिपत्त्याचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला भरपूर कडिपत्त्याची पाने लागतील. ही पाने घेऊन खोबरेल तेलामध्ये चांगले उकळून घ्या. त्यामुळे कडिपत्त्याचा अर्क चांगलाच तेलात उतरतो.

कडिपत्ता केसांचा काळा रंग टिकवण्यास मदत करतो. केसांमधील कोंडा काढून टाकतो. केस हे अधिक चमकदार आणि चांगले दिसू लागतात. केसातील कोंडा काढून टाकण्यासाठी आणि केसांना काळेभोर ठेवण्याचे काम कडुनिंब फार उत्तमपद्धतीने करते. यासाठी तुम्हाला फक्त कडुनिंब आणि तुमच्या आवडीचे तेल लागेल.

यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचा वापर केला तर फारच उत्तम. कडुनिंबाचा पाला घेऊन तो पाला चांगला दोन – तीन उनं दाखवून सुकवून घ्या. ही पानं वाटून त्याची बारीक पूड करुन घ्या. आता खोबरेल तेल घेऊन त्यामध्ये कडुनिंबाची पावडर घाला. हे तेल चांगले उकळून घ्या. थंड झाल्यानंतर आठवड्यातून फक्त एक ते दोन वेळा लावा आणि शॅम्पूने केस धुवून घ्या. तुम्हाला नक्कीच तुमच्या केसांमध्ये फरक जाणवेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.