सोमवार व्रताचे काय महत्व आहे आणि फायदे पण

सोमवारच्या दिवशी जो व्रत केला जातो तो महादेवांना समर्पित आहे. देवादी देव महादेव हे ज्ञानाचे वैश्विक गुरु आहेत आणि विश्वातील सर्व वाईट गोष्टींचे नाश करता आहे. सोमवारच्या दिवशी जर आपण महादेवांची उपासना करतो.

तर ते प्रसन्न होऊन आपल्याला मनोवांचित वरदान देतात. नवीन घरामध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा लग्नासंबंधी व्यस्था करण्यासाठी खेळा संबंधित कार्यासाठी या दिवसाला शुभ दिवस मानले जाते. सोमवारचा हा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्त होई पर्यंत ठेवला जातो.

भक्तगण या दिवशी माता पार्वती आणि शंकरांची पूजा करणे पसंत करतात. श्रावण महिन्यामध्ये सोमवारचा व्रत करणे अतिशय शुभ मानले जाते. अस मानलं जातं की हे व्रत ठेवल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आणि त्याला सद्बुद्धी प्राप्त होते.

लग्न न झालेल्या मुलींसाठी एक आदर्श नवरा मिळावा यासाठी हे व्रत खूप प्रसिद्ध आहे. या व्रताशी निगडित भरपूर कथा प्रसिद्ध आहेत. त्यामधल्या एका कथेमध्ये एक गरीब ब्राम्हणाने सोमवार व्रत केले आणि त्याला असीम संपत्तीची प्राप्ती झाली होती.

दुसरी कथा एका श्रीमंत व्यापाऱ्यांची आहे. व्यापाऱ्याला लग्न होऊन खूप वर्ष लोटली असतात. पण त्याला पुत्र प्राप्ती झालेली नसते. तेव्हा याच व्रताच्या प्रभावाने त्याला पुत्र प्राप्ती होते. या कथेमध्ये असे पण सांगितले आहे.

की माता पार्वती आणि महादेवांच्या आशीर्वादाने मृत्यूला प्राप्त झालेल्या त्यांच्या पुत्राला पुनर जीवन मिळाले होते. म्हणून सोमवारचे व्रत अवश्य करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.