स्वामींनी एका भक्ताला भयंकर प्रसंगातून वाचवले… श्री स्वामी समर्थ

अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामीभक्तहो नमस्कार बुऱ्हाणपूर येथे राहणारा मोरेश्वर हरिनगर नावाचा एक व्यक्ती इंदूरचे किवे नावाच्या प्रसिद्ध सावकाराकडे कामाला होता तेथे नोकरी करत असताना मोरेश्वराने अप्रामाणिक काम करून विश्वासघात करून भरपूर पैसा मिळवला

परंतु सत्य कधी ना कधी समोर येतेच या प्रकृतीच्या नियमानुसार मोरेश्वरा वर असाच एक भयंकर प्रसंग आला आता आपल्याला काहीच जमवता येत नाही हे बघून त्याने झालेल्या कर्माचा पश्चाताप करत स्वामींना अडविण्यास सुरुवात केली आणि माझ्या वर आलेला प्रसंग जर टाळला

तर मी पन्नास रुपयांच्या चांदीने पादुका मडवून देईल असा नवस तो बोलला स्वामीभक्त हो स्वामी आई आहे स्वामी महाराज प्रत्येकाला त्याने केलेली चूक सुधारण्याची संधी देत असतात आणि यातच कदाचित मोरेश्वराचे पूर्वपुण्य असावे म्हणून त्याला स्वामींचा अनुभव ही आला आणि त्याच्यावर ओढवलेला भयंकर प्रसंग टळला

आपल्यावर आलेला भयंकर प्रसंग टळल्याने मोरेश्वर खूप आनंदित झाला आणि काही दिवसातच बोलल्याप्रमाणे अक्कलकोट येथे आला अक्कलकोट येथे आल्यानंतर तेथील लोकांना तो सांगू लागला की मी स्वामींना नवस केला आहे परंतु स्वामींनी स्वतः मागितल्याशिवाय मी काही देणार नाही स्वामीभक्तहो आता जवळ जवळ तीन महिने तो अक्कलकोट येथे राहिला

परंतु स्वामींचा त्याला काही संकेत भेटला नाही पुढे असेच एके दिवशी स्वामींच्या दरबारात तो आणि काही लोक गप्पा मारत बसलेले होते आणि तिथे बाजूला स्वामी सुद्धा होते तेव्हा हे मोरेश्वर महाशय इतर लोकांना सावकारीच्या मोठ्या फुशारकीने बढाई का मारू लागले

मोरेश्वराचे हे वाक्य स्वामींच्या कानावर गेले तेव्हा स्वामी चिडले आणि त्याच्याकडे बघत बोलले काय रे धन्याचे खाऊन पचवले आणि सावकारीच्या भढाईका मारतोस लाज नाही वाटत का तुला स्वामीभक्तहो स्वामींचे हे अंत साक्षीत्वाचे बोलणे ऐकून मोरेश्वर यांचा चेहरा उतरला आणि त्याला आपण केलेल्या कृत्याचे स्मरण होऊन आपल्या बोलण्याचा पश्चात्ताप वाटू लागला

आणि धावत जाऊन त्याने स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि झालेल्या अपराधाची क्षमा मागितली पुढे तो घाईघाईने पुण्याला आला चांदीच्या पत्र्याने स्वामी पादुका बनवल्या आणि अक्कलकोट येथे येऊन स्वामी चरणी समर्पित केल्या स्वामींना सर्व समजत असते याची त्याला चांगलीच समज मिळाली आता उरला सुरला अहंकारही त्याचा गळून गेला

आणि तो अनन्य स्वामी भक्ती करू लागला पुढे त्याला पुत्रसंतान नसल्याने स्वामींना विनंती केली तेव्हा स्वामींनी त्याला श्रीफळ दिले आणि स्वामी कृपेने त्याला एका वर्षाच्या आत मुलगा झाला त्याने त्या मुलाचे नाव दत्त असे ठेवले पुढे तो सहकुटुंब अक्कलकोट येथे आला आपल्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम आहे त्याने अक्कलकोट येथेच केला

अन्नदानाची सेवा रुजू करत कृतकृत्य झाला बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी लीला म्हणजे असंख्य बोधांचा खजाना आहे प्रत्येक स्वामी लिलेत असंख्य बोध आहेत अगदी त्याचप्रमाणे या लिहिलेत सुद्धा स्वामी महाराज असंख्य बोध देत आहेत पैकी प्रापंचिक जीवन जगत असताना आपल्याकडून जर काही जाणते अजाणतेपणाने काही चुका झाल्या असतील तर स्वामी आपल्याला माफ करून सुधारण्याची संधी देत असतात

आणि हे करत असताना आपले मन पुन्हा भूतकाळातील त्याच त्याच चुका करू लागले तर आपण पुन्हा त्याच चुका करू नये म्हणून स्वामी आपल्याला वारंवार त्याची आठवणही करून देत असतात हा खूप छान बोध स्वामी आज आपल्याला देत आहे स्वामीभक्तहो अनेक विचारवंत बोलतात की मनुष्य प्राणी म्हणजे चुका करणारा कारखाना होय कारण ह्या विश्वात आस्थादायक असा एकही मनुष्य प्राणी झाला नाही

की त्याच्या हातून चूक घडली नसेल आणि जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा स्वामी आपल्याला ती चूक सुधारण्याची संधी देत असतात कारण स्वामींना माहित आहे की ह्या चुका मधूनच आपला विकास होत असतो बघा जसे आजच्या घडले तसे आपल्या बाबतीत काही घडत असते जशी मोरेश्वरम् कडुन चुक झाली

आणि त्यांनी स्वामीचरणी धाव घेतली आणि स्वामींनी त्याला माफ करून त्याचे संकट टाळले अगदी तसेच जेव्हा आपल्याकडून चूक होते तेव्हा आपण स्वामींना अडवतो आणि स्वामी आपल्याला अनुभव सुद्धा देतात परंतु एकदा की संकट टळले की आपले लबाड मन पुन्हा त्याच चुका करायला सुरुवात करते

बघा मोरेस्वरांनी आपल्या मालकासोबत विश्वासघात करून पैसा कमावला परंतु तरीही तो मोठंमोठ्या हूशारकीचा गप्पा मारत होता तेव्हा स्वामींनी त्याला वेळीच खडसावले आणि त्याला पुन्हा पुन्हा तीच चूक करू नकोस अहंकारी होऊ नकोस अशी ताकीदच दिली अगदी असेच आपल्या बाबतीत होत असते

आपले मन सुद्धा असेच संधीसाधूपणा नाही वागत असते ते त्याच चुका पुन्हा पुन्हा करत असते आणि आपल्या जीवनात पुन्हा तीच संकटे येत असतात म्हणून आज आपल्याला आजच्या पिढीसाठी या लीलेतून बोध घेता जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होते तेव्हा तिच्या पश्चातापात रडत बसायचे नाही उलट त्यातून स्वामींनी आपल्याला काय शिकवण दिली आहे

हे समजावून घेऊन पुढे जायचे आहे आणि हे करत असताना आपल्यातील संधीसाधू लबाड मन त्याच्या जुन्या सवयी प्रमाणे त्या त्या चुका करण्याची शक्यता असते अशावेळी स्वामींचे सतर्कतेचे संकेत ओळखून त्यावर वेळीच अंकुश ठेवायचा आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे

चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करूया हे स्वामी आई तुम्ही मायेची सावली आहात आम्हाला बालकांकडून होणाऱ्या चुका तुम्ही पोटात घेतात आम्हाला सुधारण्याची सतत संधी देतात आज आम्ही बालकांनाही समज दिली तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हे गुरुराया तुमचे आम्हा बालकांवर अनंत उपकार आहेत तुमचे ऋण फेडण्याची आमची पात्रता नाही

आमच्याकडून तुमची सेवा करून घ्या कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही आम्हाला प्रेरणा द्या स्वामी आम्हाला मार्गदर्शन करा स्वामी बोला अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रम्ह श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमनी अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *