हात पायाची बधिरता जाईल, मुंग्या येणार नाही हात व पायाच्या सगळ्या नसा मोकळ्या

कुठलाही साधासोपा उपाय करा, हाता पायाच्या नसा अडकने, हाता पायांना मुंग्या येणे, यापासून बचाव करून मोठ्या आजाराचा धोका टाळा. हाता पायांना मुंग्या येणे यावर खूपच सुंदर उपाय घेऊन आलो आहे. वारंवार जर तुमच्या हातापायांना मुंग्या येत असतील तर हे येणे बंद होणार आहे. तुम्ही विचार करत असाल हातापायांना मुंग्या येणे याचा काय विचार करावा?

तर मित्र-मैत्रिणींनो असं नाही जर तुम्हाला वारंवार हातापायांना मुंग्या येत असतील तर हे मोठे आजारपण येण्याचे लक्षण आहे. म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित यावर उपचार केले, तर नक्कीच तुम्हाला यापासून फायदा होणार आहे. तर हातापायांना मुंग्या का येतात यावर उपचार कोणता करावा, हे आज तुम्हाला कळणार आहे.

याचे नॉर्मल कारण म्हणजे खूप वेळा पाय दुमडून बसल्यास किंवा एकाच स्थितीत बराच वेळ झोपल्यामुळे हात पाय सुंद होतात. यामुळे हातापायांना मुंग्या येतात. कारण एकाच स्तिथीत जास्त वेळ बसल्यामुळे किंवा झोपल्यामुळे ती जागा सुंद होऊन ब्लड सर्क्युलेशन होत नाही. आणि म्हणून आपल्या हातापायांना मुंग्या येतात. परंतु वारंवार असे होत असेल, तर धोक्याचे आहे.

आणि शरीरात विटामिन B 12 ची जर कमतरता असेल तरी देखील असे होऊ शकते. तर शरीरात विटामिन B 12 वाढवण्यासाठी दुध, दुधाने बनवलेले पदार्थ कसे पनीर, दही किंवा अंडी आणि भाजी तुम्ही खाल्ली तर यामुळे नक्की तुमच्या शरीरातील विटामिन B 12 वाढण्यास मदत होते. म्हणूनच या पदार्थाचे सेवन आपल्या अंगात असायला हवे.

किंवा दुसरे कारण म्हणजे मानेची जर नस अडकली गेली असेल, तर हातापासून किंवा मानेपासून पायापर्यंत पूर्ण अंगाला मुंग्या येतात. किंवा तू भाग अतिशय कडून दुखायला लागतो. म्हणजेच मानेची नस अडकणे, हेदेखील कारण मुंग्या येण्याचे असू शकते. तसेच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना तर हे खूप भयंकर ठरते.

कारण त्यातील साखरेचे अतिरिक्त प्रमाण शरीरातील नसा साठी विषारी ठरते. व यामुळे हातापायांना मुंग्या येतात. जरा अशा मुंग्यांमुळे तुम्हाला खूप ताहाण लागत असेल, किंवा खूप भूक लागत असेल, तर उपचारां बरोबरच डॉक्टरांचाही सल्ला घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. आणि तिसरे म्हणजे थायरॉईड ग्रंथी निष्क्रिस असल्यास थकवा जाणवू लागतो.

वजण वाढू लागते. या बरोबरच हातापायांना मुंग्या येतात. म्हणून वेळेत उपचार घेणे हे खूप महत्त्वाचे ठरते. तर असा त्रास तुम्हाला देखील जाणवत असेल तर या पासून सुटका करण्यासाठी सुंठ घ्या. सुंठ म्हणजे कोरडे केलेले आले. आणि याची घरीक पावडर करून घ्यायची आहे. बाहेरची पावडर यासाठी वापरायची नाही. ज्या वेळेस तुम्हाला मुंग्या येतील त्यावेळेस फक्त चमचा भरून सुंठ पावडर घ्या,

आणि त्यामध्ये एक चमचा भरून मध टाकायचे आहे. आणि ते मिक्स करायचे आहे. आणि ज्या व्यक्तींना मुंग्या येत आहेत, अशा व्यक्तीनीं ते लगेचच चाटून चाटून खायचे आहे. यामुळे मुंग्या येणे लगेचच बंद होते. आणि जर वारंवार हा त्रास होत असेल तर दिवस भरातून एक वेळेस असे सात दिवस तरी हा उपाय करावा. सात दिवसात कितीही वेळा मुंग्या येत असतील, कितीही त्रास होत असेल तर ते निघून जाण्यास मदत होते. किंवा मोहरी चे तेल घ्यायचे आहे.

आणि ते थोडेसे कोमट करून घायचे आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला वारंवार मुंग्या येतात त्या ठिकाणी अलगत हातानें मसाज करून घ्यायची आहे. तर मसाज केल्याने नसा मोकळ्या होतात. आणि वारंवार मुंग्या येणे बंद होते. किंवा गरम पाण्याने गरम पाण्यामध्ये मीठ घालून देखील याचा शेक देऊ शकता.

आणि जर घरात ओवा असेल तर कच्चा ओवा फक्त अर्धा मिनिटे तोंडात ठेवायचा आहे. फक्त थोडा ओवा चावून चावून खायचा आहे. आणि त्यानंतर कोमट पाणी प्यायचे आहे. यामुळे देखील मुंग्या येणे थांबते. फक्त पाव चमचा ओवा एकावेळेस यासाठी वापरायचे आहे. तुमच्याकडे जे असेल तो उपाय तुम्ही करू शकता. एकत्र सर्व उपाय करू नका. कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकतात. परंतु मोहरीच्या तेलाने मसाज केली तरी चालेल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.