हा एक पदार्थ चावून खा सतत लघवी येणे बंद गजकर्ण खाज समूळ कमी हळद उपयोग

बरेच लोक सांगत असतात की घरगुती उपाय चांगले असतात तर याबद्दल आपल्याला खात्री आहे जवळजवळ पन्नास टक्के घरगुती उपाय पंचकर्माचे उपाय औषधी उपाय केल्यास वेगवेगळ्या आजारावर आराम मिळत असतो स्वयंपाक गृहातील काही वस्तू असतात ते अत्यंत उपयोगी असतात

त्याचे महात्म्य महत्त्व बऱ्याच लोकांना माहीत नसते तर आता स्वयंपाक गृहातील जी हळद असते त्या हळदी चे वैशिष्ट्य हे चार-पाच घरगुती उपाय सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण बऱ्याच लोकांना माहीत नसते आणि ते उपाय करत नसतात त्या विषयी जनजागृती झाली पाहिजे तर बघा सर्दी-खोकला वाटला पूर्वीच्या काळी आजीबाई म्हणायचे आहे ते थोडे दूध गरम करून त्यात चिमूटभर हळद टाकून ते पी

याने सर्दी खोकला कमी होतो हा उपाय बऱ्याच लोकांना माहित आहे परंतु लोक करत नाही पण त्याचा खरोखर फायदा होतो कुठे लागलं तर आजही गावाकडे हळकुंड उगाळून लेप लावायचा रक्त साकळलेलं तसेच वेदना कमी होतात साधा सोपा उपाय आहे परंतु हे माहीत नसते

कांजण्या वगैरे आल्या तर त्याचे डाग चेहऱ्यावर राहत असतात तर त्याच्यासाठी साधा आणि सोपा उपाय हळद घ्या हळदीमध्ये थोडी कात टाकायची उगाळून जर आपण लावलं चार-पाच दिवस लावलं तर ते डाग कमी होण्यास मदत होते हळदीचा अंगी रक्त शुद्ध करण्याचा गुणधर्म आहे हळद पोटातून आपण घेतो स्वयंपाकात वापरत असतो तर एक प्रयोग सांगतो

साधारण दहा ते पंधरा कडुलिंबाची पाने घ्यायची आहेत आणि त्यामध्ये पाव ते अर्धा चमचा हळद टाकायची आहे ओली हळद कंद आणायचे वाळवायचे आणि त्याची पावडर करायचे बाजारातील हळदी पेक्षा घरी केलेली हळद गुणकारी असते वेगवेगळ्या आजारांमध्ये त्याचा फायदा होतो तर ते हळद आणि कडुलिंबाची पाने कुटून जिथे फंगल इन्फेक्शन

त्वचाविकार झालेले आहेत झालेले आहेत तिथे लावा खूप चांगला फायदा होतो जंत झाले तर त्यावर हळदीचा काय गुणधर्म आहेत तर पाहूयात हळद साधारण चमचाभर घ्यायची आहे तीन ते चार चमचे सेंद्रिय गुळ घ्यायचा आहे त्याच्या गोळ्या तयार करायच्या आणि दोन दोन गोळ्या तुम्ही सेवन केल्या तर दोन ते तीन वेळा आणि तिसर्‍या चौथ्या दिवशी वावडिंग चूर्ण घेतले तरीही फायदा होत असतो बरच लोकांना जास्त लघवी ला येते

सारखे सारखे जावे लागते आणि हिवाळ्यात तर बऱ्याच वेळा जावे लागते तर त्यासाठी बरीच कारणे असतात ते कारणे शोधावे लागतात तर आपल्या तिळगुळ असतं त्याला थोडेसे हळद घालून चावून-चावून जर खाल्लं तर वारंवार लघवीला येणे या समस्या पासून फायदा होत असतो हे प्रयोग फायदेशीर आहेत त्यामुळे हळदीच्या गुणधर्मामुळे हळदीचा या तीन ते चार प्रयोगांमध्ये जरूर वापर करा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.